ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपाने दिला ‘अजेय भारत, अटल भाजपा’चा नारा

भाजपाने दिला ‘अजेय भारत, अटल भाजपा’चा नारा

►आमच्यासाठी सत्ता समाजपरिवर्तनाचे साधन
►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ९ सप्टेंबर –

Pm Modi Bjp National Meet September 2018

Pm Modi, Amit shah Bjp National Meet September 2018

आम्ही सत्तेकडे अधिकाराचे पद म्हणून पाहात नाही, तर लोकांच्या सेवेचे साधन म्हणून बघतो, त्यामुळेच आम्हाला कधी सत्तेचा अहंकार होत नाही, आम्ही आमच्या संकल्पासाठी जगत असतो, हीच आमची भूमिका आहे, विचारधारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केले. याच वेळी मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भारत, अटल भाजपा’ असा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा नाराही दिला.
राजधानी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी मोदी मार्गदर्शन करीत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मोदी यांनी बैठकीत केलेल्या भाषणाची माहिती केंद्रीय विधि आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नंतर पत्रपरिषदेत दिली. गुजरातमध्ये आमची ३१ वर्षांपासून सत्ता आहे, गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे, हे यासाठी आम्हाला शक्य झाले कारण आमच्यात सत्तेचा अहंकार नाही, सत्ता हे साध्य नाही, तर समाजपरिवर्तनाचे साधन आहे, असे आम्ही समजतो आणि जनतेच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करतो.
आमच्यासमोर कोणाचेच आव्हान नाही. मात्र, लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्‍न हे लोकशाहीची मजबुती आहे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, जे लोक सत्तेवर असताना अपयशी ठरले तेच विरोधी पक्ष म्हणूनही पूर्णपणे अपयशी ठरले आहे, हे आमचे दुर्दैव आहे. लोकांच्या हिताचा कोणताही योग्य मुद्दा उपस्थित करणे विरोधी पक्षांना जमले नाही. आमच्या कामावर आणि विचारधारेवर विरोधी पक्षांनी टीका केली पाहिजे, त्या टीकेचे समर्पक उत्तर द्यायची आमची तयारी आहे. त्यावेळी त्यांचे ४८ वर्षे आणि आमचे ४८ महिने असाही प्रश्‍न उपस्थित होईल. या काळात तुम्ही कोणासाठी काम केले याचे उत्तरही त्यांना द्यावे लागेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष खोट्या मुद्यांचे राजकारण करीत आहे, त्यावर लढण्याचा आव आणत आहे. खोट्या गोष्टींविरुद्ध लढणे आम्हाला येत नसले तरी आता रणनीतीचा भाग म्हणून आम्हाला याचा सामना करावा लागणार आहे, असे मोदी म्हणाले.
विरोधी पक्षांच्या प्रस्तावित महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवत मोदी म्हणाले की, महाआघाडी म्हणजे ज्यात नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट आहे. जे लोक एकदुसर्‍याकडे पाहू शकत नाही, एकदुसर्‍यासोबत चालू शकत नाही, त्यांना आज आमच्याविरोधात एकत्र यावे लागत आहे, हा आमचा विजय आहे. कोणत्याही संयुक्त कार्यक्रमाशिवाय त्यांना आमच्याविरुद्ध महाआघाडी तयार करावी लागत आहे.
राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाला स्वीकारण्याची तयारी आज कोणाचीच नाही, अगदी छोटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. अनेक जण तर ते ओझे असल्याचे समजत आहे. काँग्रेसमधील अनेक जणांनाही काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मान्य नाही.
गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने बँकांचे, कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण केले, मात्र त्याने कोणाचे भले झाले नाही, त्यानंतर आपली चूक झाल्याचे सांगत काँग्रेसने आर्थिक सुधारासाठी नवी दिशा पकडली, पण यातून गरिबांचा काहीच फायदा झाला नाही, असे मोदी म्हणाले.
२०१९ ची निवडणूक भाजपाच जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त करत मोदी म्हणाले की, निवडणूक आम्ही जिंकणार असा आमचा विश्‍वास आहे आणि त्याचा आधार आहे, १२५ कोटी भारतीयांचे आम्हाला मिळत असलेले प्रेम. आमच्या कामावर आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यासाठी एकेक बुथ आम्हाला जिंकायचा आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावायची आहे. बुथ हा आमच्या विजयाचा आधार आहे, सरकार आणि पक्षसंघटना यांचा पाया आहे.
आमच्याजवळ विचारांची प्रतिबद्धता आहे, नेतृत्व आहे, विचारधारा आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे, याच बळावर आम्हाला विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा सामना करायचा आहे, तो हाणून पाडायचा आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आम्हाला समता हवी आहे, ममता म्हणजे मानवता हवी आहे. देश वैभवशाली झालेला आम्हाला हवा आहे, मात्र तो साधेपणाच्या भरोशावर.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आपल्या भाषणातून मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अटलजींनी भाजपाचे विचार, संस्कार आणि नेतृत्वाला उंची दिली. पक्षाचा सूर्य आज आपल्याला सोडून गेला असला तरी कार्यकर्त्यांनी चांदण्या होत पक्षाच्या विचारधारेचा प्रकाश पुढे नेला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
एक राष्ट्र एक निवडणूक या मुद्यावर कोणत्याही दबावाशिवाय चर्चा झाली पाहिजे, ही चर्चा फक्त राजकीय पक्षांपुरतीच मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांनी यात सहभागी झाले पाहिजे, कारण हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा आहे, असे आवाहन मोदी यांनी केले.
तर पुढील ५० वर्षे भाजपाला कोणी हरवू शकणार नाही : अमित शाह
२०१९ ची निवडणूक भाजपाने जिंकली तर पुढील ५० वर्षे भाजपाला कोणी सत्तेवरून हटवू शकणार नाही, त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी अमित शाह मार्गदर्शन करीत होते. गुजरातमध्ये जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर अजूनपर्यंत कोणी आपल्याला तेथे हरवू शकले नाही. याचीच पुनरावृत्ती आपल्याला संपूर्ण देशाही करायची आहे.
देशातील २२ कोटी कुटुंबांशी संपर्क करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम कार्यकर्त्यांना देत अमित शाह म्हणाले की, एका कुटुंबात किमान तीन ते चार लोक असतात, असे गृहित धरले तर यापद्धतीने आपला ९० कोटी लोकांशी संपर्क होईल. भाजपाचे ९ कोटी कार्यकर्ते आहेत, त्यामुळे हे काम आपल्यासाठी कठीण नाही.
२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्रांती घेतली नाही, अव्याहतपणे ते काम करीत आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, मोदी यांनी आतापर्यंत देशातील ३०० लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. येत्या काळात त्यांनी आणखी २४३ मतदारसंघाचा दौरा केला की, देशातील ५४३ मतदारसंघाचा दौरा पूर्ण होईल. आगामी काळातील भाजपाच्या कार्यक्रमाची घोषणाही शाह यांनी यावेळी केली.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (486 of 1905 articles)


प्रस्तावातून मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ सप्टेंबर - २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केलेल्या ...

×