अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपाने हिंमत दाखवली!

भाजपाने हिंमत दाखवली!

►आसाम करार काँग्रेसचा
►अमित शाह यांचा घणाघात,
नवी दिल्ली, ३१ जुलै –

Amit Shah Bjp

Amit Shah Bjp

२००५ मध्ये काँग्रेसने एनआरसी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण तो नंतर मतपेटीच्या राजकारणामुळे सोडून दिला. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोदी सरकारने एनआरसी स्थापन केली, जी हिंमत काँग्रेसचे सरकार दाखवू शकले नाही, ती आमच्या सरकारने दाखवली, असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला.
एनआरसीच्या मुद्यावर आज राज्यसभेत झालेल्या चर्चेत विरोधी पक्षांनी अमित शाह यांना बोलू दिले नाही, त्यामुळे भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत अमित शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.
बांगलादेशी घुसखोरांच्या मानवाधिकाराची चिंता करणार्‍या विरोधी पक्षांनी आसाममधील जनतेच्या मानवाधिकाराचीही चिंता करावी. बांगलादेशी घुसखोरांमुळे आसामी जनतेचे मानवाधिकार धोक्यात येत आहे, असा आरोप शाह यांनी केला.
एनआरसीची प्रक्रिया अतिशय निष्पक्षपणे आणि पारदर्शी पद्धतीने राबवली जात आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, या देशाचे नागरिक असणार्‍या कोणालाच यातून त्रास होणार नाही. अगदी देशाच्या कोणत्याही भागातून येऊन आसाममध्ये स्थायिक झालेल्यांचे नागरिकत्वही एनआरसीतून सुरक्षित राहणार आहे. मात्र जे इथले नागरिक नाही तर घुसखोर आहेत, त्यांना या देशात जागा मिळणार नाही.
बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शाह यांनी दिले.
एनआरसीच्या मुद्यावर विरोधक जाणीवपूर्वक जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहे, असा आरोप करत शाह म्हणाले की, एनआरसीत ज्यांची नावे नाहीत, ते भारतीय असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, ज्यांची नावे वगळण्यात आली, ते भारतीय नाहीत, तर संशयित बांगलादेशी घुसखोर आहेत. मात्र यानंतरही ज्यांची नावे वगळण्यात आली, त्यांना आक्षेप घेण्याची आणि दावा करण्याची संधी उपलब्ध आहे.
आपण भारतीय असल्याचे जे सिद्ध करू शकले नाही, त्यांचीच नावे एनआरसीतून वगळण्यात आली, असा आरोप करत अमित शाह म्हणाले की, राज्यसभेत मी आज सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणे ऐकली, पण एकाही नेत्याने, एनआरसीची ही अंतिम यादी नाही तर मसुदा यादी आहे, त्याचप्रमाणे एनआरसीची स्थापना कशी झाली, कुणामुळे झाली, ते सांगितले नाही.
हा करार राजीव गांधींचा
बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावर आसाममधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, या आंदोलनात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, याकडे लक्ष वेधत वेधत शाह म्हणाले की, या आंदोलनानंतर १४ ऑगस्ट १९८५ रोजी राजीव गांधी पंतप्रधान असताना एक करार करण्यात आला, आसाम करार म्हणून तो ओळखला जातो. त्यात एनआरसीच्या स्थापनेची तरतूद होती. एनआरसी तयार करताना देशात एकही बांगला देशी घुसखोर राहणार नाही, असा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. एनआरसी हा आसाम कराराचा आत्मा आहे.
देशाची सुरक्षा तसेच स्थानिक लोकांचे मानवाधिकार लक्षात घेऊन एनआरसीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे बांगला देशी घुसखोराच्या मुद्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
आसाममधील लोकसंख्यावाढ (टक्के)
वर्ष हिंदू मुस्लिम
१९५१-६१   ३३.७१   ३८.३५
१९६१-७१   ३७.१७  ३०.९९
१९८१ जनगणना झाली नाही
१९७१-९१   ४१.८९   ७७.४१
१९९१-२००१ वाढ नाही २९.३०
२००१-११  १०.९  २९.५९

Posted by : | on : Aug 1 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (78 of 1864 articles)

Kiren Rijiju
नवी दिल्ली, ३१ जुलै - [caption id="attachment_58897" align="alignleft" width="300"] Kiren Rijiju[/caption] भारतात आश्रयाला असलेल्या रोहिंग्य मुस्लिमांना निर्वासितांचा दर्जा देण्यात आलेला ...

×