ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांना भीती सायबर सुरक्षेची

भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांना भीती सायबर सुरक्षेची

►सर्वेक्षणात समोर आली माहिती
►दोन तृतीयांश कंपन्यांनी व्यक्त केला धोका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर –

Cyber War

Cyber War

भारतातील जवळपास दोन तृतीयांश कॉर्पोरेट कंपन्यांनी सायबर सुरक्षेवरील व्यवस्थापन पुरेशे चोख नसल्याची भीती व्यक्त केली आहे. ही माहिती सल्लागार कंपनी डेल्लॉइटने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली. भरीव आर्थिक तरतूद नसणे, तसेच अकुशल कर्मचार्‍यांमुळे सायबर सुरक्षा व्यवस्थापन धोक्यात असल्याची भीती कंपन्यांना आहे. सायबर सुरक्षा चोख नसेल तर, कंपनीची गोपनीय माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.
कॉर्पोरेट क्षेत्राला असलेल्या सर्वाधिक तीन धोक्यांपैकी सायबर सुरक्षा हा प्रमुख मुद्दा असल्याचे डेल्लॉइट कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. उर्वरित दोन धोक्यांमध्ये नियामक जोखीम आणि तंत्रज्ञानाच्या विघ्नाचा समावेश असल्याचे कंपनीने सर्वेक्षणात म्हटले आहे.
नव्या माहिती गोपनीयता कायद्यांतर्गत कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर जाऊ नये, याची जबाबदारी कॉर्पोरेट कंपन्यांवर आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा व्यवस्थापन चोख ठेवण्यावर कॉर्पोरेट क्षेत्र भर देत आहे, असे डेल्लॉइट कंपनीच्या जोखीम सल्लागार विभागाचे अध्यक्ष रोहित महाजन यांनी सांगितले.
सायबर सुरक्षेच्या व्यवस्थापनात संचालक मंडळ पातळीवरील अधिकार्‍यांचा समावेश कॉर्पोरेट कंपन्या करीत असल्याचेही सर्वेक्षणात निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनी कायद्याप्रमाणे संचालक मंडळ पातळीवरील अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित केली जात असल्याने ते सायबर सुरक्षा व्यवस्थापनात लक्ष घालत आहेत. एखादी विपरित घटना घडल्यास कंपनी कायद्याप्रमाणे संचालक मंडळातील जबाबदारी असलेल्या अधिकार्‍याला दोषी धरले जाते, असे त्यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना ६१ टक्के उत्तरे देणार्‍यांमध्ये निफ्टीतील ५० कंपन्यांचा सहभाग होता. विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना जोखीमेची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांनी उत्तरे दिली. कित्येक प्रकरणांमध्ये, झालेल्या गडबडीबाबत त्यांनीच कंपनीच्या संचालक मंडळाला माहिती दिली, असेही त्यांनी सांगितले. सायबर हल्ल्यांमुळे कंपन्यांच्या बौद्धिक संपदेची हानी होते, तसेच ग्राहकांची माहिती नष्ट होत असल्याचे या सर्वेक्षणातील अहवालात म्हटले आहे. या सायबर हल्ल्यांचा कंपन्यांवर दीर्घकालीन परिणाम होतो आणि कंपनीची प्रतिष्ठाही धुळीस मिळते. त्यामुळे कंपनीला निधी उभारण्यास अडचण जाते, असेही या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.
या सर्वेक्षणामध्ये ग्राहक वस्तू उत्पादन, अर्थविषयक सेवा, आयुर्विज्ञान, माध्यम आणि दूरसंचार क्षेत्रातील १०० कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
सर्वेक्षणातील सहभागी कंपन्यांची वार्षिक उलाढाल ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त.
तीन मोठ्या धोक्यांपैकी सायबर सुरक्षेचा मुद्दा प्रमुख
उर्वरित दोन धोक्यांमध्ये नियामक जोखीम आणि तंत्रज्ञानातील विघ्न

Posted by : | on : 13 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (345 of 1774 articles)


नरेंद्र मोदी यांची घोषणा ►विमा योजनांचाही लाभ, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ११ सप्टेंबर - आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात ...

×