ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » भारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र

भारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र

►खलिस्तान टेरर नेटवर्कचा चेहरा उघड
►आपलाही निधी पुरवला,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Khalistan Terror Network Expose Said India Is Our Enemy And Pakistan Is True Friends

Khalistan Terror Network Expose Said India Is Our Enemy And Pakistan Is True Friends

खलिस्तान टेरर नेटवर्कने भारताविरुद्ध युद्ध छेडले आहे. एका टीव्ही वाहिनीने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या तपासाचे ‘स्टिंग’ करून एक जबरदस्त माहिती समोर आणली आहे. यात नॅशनल शीख युथ फेडरेडशनचा प्रमुख शमशेर सिंग याने म्हटले आहे की, भारत आमचा नंबर एकचा शत्रू आहे आणि पाकिस्तान आमचा शंभर टक्के खरा मित्र आहे.
आम्ही भारताच्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेना प्रमुखांना मारून टाकले आहे. कारण, ते आमचे सर्वात मोठे शत्रू होते. यापुढेही असे कृत्य करताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही. खलिस्तान टेरर नेटवर्कचा उद्देशच भारताचे विभाजन करणे आहे, असेही शमशेरने म्हटले आहे. दिल्लीबाबत बोलताना शमशेर म्हणतो, जे लोक दिल्लीत बसले आहेत ते आमचे शत्रू आहेत आणि आम्ही त्यांचा खातमा करणार आहोत.
मोदी पुन्हा विजयी झाले तर ते जास्त धोकादायक ठरू शकते, असे सांगून शमशेर म्हणतो की, आमचा शस्त्रांसह कठोर संघर्ष सुरू आहे. संघाच्या नेत्यांची हत्या करण्यामागेही केसीएफचा हात आहे. जो कोणी भारताच्या विरोधात असेल त्याला आम्ही मदत करू, सर्व ते सहकार्य करू. आम्ही काश्मिरात असलेले फुटीरवादी, माओवादी आणि नक्षलवादी यांच्या संपर्कात आहोत. कारण, या लोकांनीही भारताच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही आम आदमी पक्षालाही (आप) निधी पुरविला होता, असेही शमशेर सिंगने म्हटले आहे. दहशतवादी, उग्रवाद्यांची मदत करून भारतात दहशत निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. आम्हाला भारताचे तुकडे करायचे आहे. त्यासाठी गरज पडल्यास पाकिस्तान, चीन आणि माओवाद्यांचीही मदत घेतली जाईल, असेही शमशेर बोलला असल्याचे या स्टिंगमध्ये दाखविण्यात आले आहे.
शमशेरसारखीच भाषा दल खालसा या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असलेल्या गुरुचरण सिंग यांनीही वापरली आहे. शत्रूचा शत्रू हा आमचा मित्र राहणार आहे. आमच्या विचारसरणीच्या संघटनांना भारतात एकत्रित केले जाणार आहे. त्यांना आर्थिक रसद पुरविली जाईल. मग तो काश्मिरी असो की माओवादी… भारतविरोधातील प्रत्येकाला ही मदत दिली जाईल, असेही गुरुचरण याने म्हटले आहे.
आपच्या निधीची चौकशी करणार : अमरिंदर
दरम्यान, शमशेर सिंगच्या या व्यक्तव्यामुळे पंजाबमधील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
ते म्हणाले, निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाकडे (आप) निधी कोठून आला, ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत त्याची चौकशी केली जाईल. देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍यांला कोणत्याही परिस्थिती माफी दिली जाऊ शकत नाही. अकाली दल दिल्लीचे प्रमुख मनजित सिंग यांनीही आपला निवडणुकीसाठी निधी कोठून मिळाला, हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून राजकारण ढवळून निघाले असताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या सर्व प्रकरणाला उजेडात आणणार्‍या टीव्ही वाहिनीच्या वार्ताहराला ब्लॉक करून टाकले आहे. या दोघांमध्ये जेव्हा बातचित झाली तेव्हा शिविगाळपर्यंत प्रकरण गेले असल्याचे बोलले जात आहे.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (64 of 1621 articles)

Pm Narendra Modi 3
सिद्धांतांमध्ये मानवतेला एकजूट करण्याची शक्ती, नवी दिल्ली, २ ऑक्टोबर - देशातील पाच लाख गावे हागणदारीमुक्त झाली असून भारतात उघड्यावर शौचाला ...

×