ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला
►भारताचा स्पष्ट आरोप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ सप्टेंबर –

India Pak Flag

India Pak Flag

न्यू यॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अनुषंगाने भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमध्ये बैठक आयोजित करण्यास मान्यता दिल्यानंतरच्या २४ तासांत घडलेल्या भीषण घडामोडींमुळे ही बैठक रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने आज शुक्रवारी जाहीर केला. भारतासोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तान पत्र पाठवतो आणि देशाचे सैनिक आमच्या जवानांची कत्तल करून, त्याच्या मृतदेहाची विटंबना करतात, शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या बुरहान वाणीवर टपाल तिकिट काढतात, हा सर्व प्रकार मैत्रीपूर्ण व्यवहाराचा नसून, दहशतवादाचे गोडवे गाणारा असल्याचा स्पष्ट आरोप भारताने केला आहे.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे समपदस्थ शाह महमूद कुरेशी यांच्यात न्यू यॉर्क येथे बैठक व्हावी, अशी विनंती करणारे पत्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. हे पत्र दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्यावतीने सार्वजनिक करण्यात आले. तथापि, त्यावर आक्षेप न घेता, भारत सरकारने स्वराज आणि कुरेशी यांच्यात बैठक आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र गेल्या २४ तासांमध्ये बीएसएफच्या जवानाची कू्रर हत्या आणि आज सकाळी हिजबुलच्या अतिरेक्यांनी आयएसआयच्या आदेशानुसार तीन पोलिसांची केलेली हत्या यामुळे संतप्त झालेल्या भारताने ही बैठक तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
पाकमधील आजवरच्या सर्वच सरकारने दहशतवादाला पाठबळच दिले आहे. इम्रान खान यांच्या सरकारचाही नापाक चेहरा आज जगापुढे आला आहे. भारतापुढे शांतता चर्चेचा प्रस्ताव पाठविण्यामागील पाकचा कुटील उद्देश उघड झाला आहे. दहशतवाद्यांना पोसणे, त्यांचे गोडवे गाणे हेच पाकचे धोरण आहे आणि म्हणूनच २० अतिरेक्यांचे गुणगान करणारी टपाल तिकिटे या सरकारने जारी केली आहेत. आम्ही चर्चेची घोषणा केल्यानंतर पाकमध्ये ज्या काही घडामोडी सुरू झाल्या, त्या मैत्रीपूर्ण असल्याचे मुळीच वाटत नाही. चर्चा रद्द करणे हाच एकमेव उपाय आमच्याकडे होता, असेही रवीश कुमार यांनी स्पष्ट केले.
इम्रान खान आणि कुरेशी यांनी भारताला जे पत्र लिहिले होते, त्यावरून पाकमधील नवीन सरकार भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यास इच्छुक असल्याचे वाटले होते आणि म्हणूनच आम्ही चर्चेचा त्यांचा प्रस्ताव स्वीकारला होता. मात्र, एकीकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवायचा आणि त्याचवेळी भारतविरोधी कारवाया करायचा, हा गुणधर्म इम्रान खान यांच्या सरकारनेही स्वीकारला असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत पाकसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही आणि झाली तरी ती अर्थपूर्ण ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (274 of 1770 articles)

Amit Shah Bjp
शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर - पंतप्रधानांच्या हत्येचा आणि हिंसाचाराचा कट रचणार्‍या शहरी नक्षलवादाचे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी ...

×