ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-पाक सीमेवर उभी झाली अदृश्य भिंत

भारत-पाक सीमेवर उभी झाली अदृश्य भिंत

►•शेजारी बदलता येत नाही, हे पाकने समजून घ्यावे •
►राजनाथसिंह यांची स्पष्ट भूमिका,
वृत्तसंस्था
जम्मू, १७ सप्टेंबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी भारत-पाकिस्तान सीमेवर देशातील पहिल्या स्मार्ट लेझरयुक्त अदृश्य भिंतीचे लोकार्पण केले. भारत-पाकिस्तान सीमेवर प्रत्येकी पाच किलोमीटरच्या दोन अतिशय संवेदनशील भागांमध्ये ही भिंत उभी करण्यात आली असून, यामुळे अतिरेक्यांचे भारतात घुसखोरी करण्याचे मार्ग कायमचे बंद होणार आहेत.
राजनाथसिंह आज सोमवारी सकाळी जम्मूत आले. त्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. ही लेझरयुक्त भिंत एकप्रकारे अदृश्य स्वरूपात राहणार आहे. त्यात वीजप्रवाह देखील संचारित केला जाणार आहे. घुसखोरीच्या स्थितीत ही भिंत कशी सक्रिय होते आणि ती कसा प्रतिसाद देते, याचे सादरीकरणही यावेळी राजनाथसिंह यांच्यापुढे करण्यात आले.
या स्मार्ट लेझर भिंतीत अतिशय अत्याधुनिक उपकरणांसोबतच निगराणी आणि संदेशवहन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. ही भिंत उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. हे तंत्रज्ञान अद्ययावत असून हवा, पाणी व जमिनीत विजेचा प्रवाह असलेला थर त्यापासून उभारता येणार आहे. यामुळे घुसखोरी होत असल्याचे समजणार आहे. या प्रणालीला कॉम्प्रेहेन्शिव इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम असे नाव देण्यात आले आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी, पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले, पण पाकने कधीच प्रतिसाद दिला नाही. शेजारी बदलता येत नाही, त्यामुळे आपल्या शेजार्‍यांशी कसे राहायला हवे, ही सत्यता पाकने समजून घ्यावी आणि त्यानुसारच वागावे, असे मत व्यक्त केले.
बहिष्कार मागे घ्या, निवडणुकांमध्ये सहभागी व्हा
जम्मू-काश्मिरातील आगामी पंचायत आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील बहिष्कार मागे घ्यावा आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले.
राज्यातील नागरिकांना विशेषाधिकार देणार्‍या घटनेतील कलम ३५-ए बाबत केंद्र आणि राज्य सरकार भूमिका स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुकांमध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणा नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी केली आहे. याच अनुषंगाने राजनाथसिंह यांनी हे आवाहन केले.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचाच एक भाग आहे आणि त्यात सहभागी होणे प्रत्येक राजकीय पक्षाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन या राजकीय पक्षांनी बहिष्कार मागे घ्यावा, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (820 of 2053 articles)

Vk Singh
केवळ बदलांची प्रतीक्षा करू : व्ही.के. सिंह, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार आले असले, ...

×