ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भारत बंदकाळात हिंसाचार, जाळपोळ

भारत बंदकाळात हिंसाचार, जाळपोळ

►दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये प्रतिसादच नाही •
►रेल्वे वाहतूकही रोखली,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० सप्टेंबर –

Bharat Bandh Patna

Bharat Bandh Patna

काँगे्रस हा महात्मा गांधींच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे भारत बंदकाळात पक्षाचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करणार नाहीत आणि हिंसाचारात सहभागी देखील होणार नाहीत, हा काँगे्रसचा दावा आज सोमवारी अक्षरश: फोल ठरला. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी विविध राज्यांमध्ये जाळपोळ, दगडफेक यासारख्या हिंसाचाराचा मार्ग स्वीकारून पक्षाच्या हिंसक प्रवृत्तीचे दर्शन घडविले. काही राज्यांमध्ये काँगे्रसच्या हिंसक प्रवृत्तीची तीव्रता फार जास्त होती. बसेस आणि अन्य वाहनांची जाळपोळ करणार्‍या या कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्याही ठिकठिकाणी रोखून धरल्या होत्या. काँगे्रसचे वरिष्ठ नेते स्वत: कार्यकर्त्यांसोबत जाऊन लोकांवर बळजबरीने बंद लादत होते.
२२ राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासह काँगे्रसने पुकारलेल्या बंदला काँगे्रसचे अस्तित्व आणि सरकार असलेल्या राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, तर भाजपाची सत्ता असलेल्या असलेल्या बहुतेक सर्वच राज्यांमध्ये बंदचा फज्जा उडाला. राजधानी दिल्लीत बंदचा सामान्य जनजीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. शाळा आणि महाविद्यालये तसेच खाजगी कार्यालये नेहमीप्रमाणेच सुरू ठेवण्यात आली होती. वाहनांची चाकेही नेहमीच्या गतीने सुरू होती.
भाजपाची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. बंदकाळात कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये संपूर्ण उपस्थिती होती. राज्यातील कोणत्याही शहरात हिंसाचाराची घटना घडली नाही.
पंजाब, हरयाणातही बंदकाळात हिंसाचाराचे वृत्त नाही. सकाळच्या सुमारास काही दुकानदारांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले होते, दुपारनंतर मात्र सर्व काही सुरळीत दिसून आले. प. बंगालमध्येही बंदचा पुरता फज्जा पडल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामे ममता बॅनर्जी सरकारने सुरक्षेचे कडक उपाय योजले होते. रेल्वे आणि मेट्रोची सेवाही सुरळीत होती.
बिहारमध्ये हिंसाचार, बालिकेचा मृत्यू
काँगे्रस आणि राजदच्या हिंसक कार्यकर्त्यांनी बिहारच्या बहुतांश भागांत गुंडशाहीचे दर्शन घडवले. जाळपोळ, तोडफोड यासह ठिकठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक अडवून ठेवली होती. जेहानाबाद जिल्ह्यात रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असलेल्या तीन वर्षीय बालिकेचा वाहतुकीच्या कोंडीमुळे वाटेतच मृत्यू झाला. काँगे्रस आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
इतरत्र शांतता
काँगे्रसचे अस्तित्व असलेली देशातील तीन-चार राज्ये वगळता देशाच्या इतर राज्यांमध्ये काँगे्रसच्या बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. ओडिशा, मिझोरम, आसाम, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये जनजीवन सुरळीत होते.
शेकडो बंदसमर्थकांना अटक
बंदच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी अटक केली. काही ठिकाणी बंद समर्थकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला.
बंद यशस्वी : काँगे्रस
केवळ तीन-चार राज्यांमध्येच बंदला प्रतिसाद मिळाला असताना, काँगे्रसने मात्र देशभरातच बंद शंभर टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा केला. या बंदचे यश पाहून केंद्र सरकार आपल्या धोरणांमध्ये बदल करेल, असे काँगे्रसच्या नेत्यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (681 of 1873 articles)


यांचा खुलासा ►सरकारच्या धोरणाशी दरवाढीचा संबंध नाही, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १० सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय कारणांमुळे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती ...

×