ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; उत्तर भारतात मात्र तीव्र पडसाद

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; उत्तर भारतात मात्र तीव्र पडसाद

►मध्यप्रदेशात संचारबंदी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Bharat Band

Bharat Band

केंद्र सरकारने केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी) दुरुस्तीच्या निर्णयाविरोधात आज विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी उत्तर भारतात मात्र या बंदचे तीव्र पडसाद उमटले. एकूणच परिस्थिती पाहाता मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचाराची घटना घडल्यानंतर आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर एफआयआर दाखल करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयामुळे हा कायदा कमकुवत झाल्याचे सांगत अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनी रोष व्यक्त केला होता. या निर्णयाचा निषेध म्हणून अनुसूचित जाती/जमातीने २ एप्रिल रोजी भारत बंदही पुकारला होता. त्यामुळे केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून हा कायदा पूर्ववत् केला होता. त्याचा निषेध म्हणून आज अनेक संघटनांनी भारत बंद पुकारला होता. या बंदमध्ये सवर्णांच्या अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. उत्तर भारत वगळता देशाच्या इतर भागात कोठेही या बंदचा परिणाम दिसून आला नाही.
या बंदच्या पृष्ठभूमीवर मध्यप्रदेशातील ३५ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता, तर अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करून संचारबंदी करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी सुरक्षा दलाच्या ३४ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. एकूण तणावपूर्ण परिस्थिती पाहाता राज्यातील अनेक भागांमधील शाळा-महाविद्यालयांना आधीच सुटी जाहीर करण्यात आली होती. आंदोलकांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, काँग्रेस नेते कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासह अनेक नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवित आपला रोष प्रकट केला. या बंददरम्यान काही ठिकाणसी आंदोलक हिंसक झाल्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या होत्या व काही जणांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. काही तुरळक घटना वगळता बंद राज्यात शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातही ठिकठिकाणी जाळपोळ करून निदर्शने करण्यात आली. बिहारमध्येही बंद परिणाम चांगला दिसून आला. राज्यातील बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. दरभंगा रेल्वे स्थानकाजवळ आंदोलकर्त्यांनी रेल्वे सेवा रोखली होती. बिहारच्या लखीसरायमध्ये राष्ट्रीय महामार्ग ८० रोखून धरण्यात आला होता, तसेच छपरा येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मधुबनीतही आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे तेथेही वाहतुकीची कोंडी झाली होती. चिघळलेली परिस्थिती पाहाता बिहाराच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राजस्थानमधील जयपूर शहरामध्ये शाळा, महाविद्यालय आणि मॉल बंद ठेवण्यात आले होते. उत्तरप्रदेशातही ११ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बिजनौर, अलाहाबाद, आझमगड आणि बरेलीमध्येही या बंदचे पडसाद दिसून आले.
या आंदोलनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहे, तेथेच थोडा प्रभाव दिसून आला. जे लोक भाजपाला पाण्यात पाहतात, त्यांनीच हे सर्व घडवून आणले, असा आरोप भाजपाचे खासदार उदित राज यांनी केला. तसेच हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होता, असा आरोप राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रमुख रामशंकर कठेरिया यांनी केला.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रमुख स्थळी नारे-निदर्शने करून या बंदला समर्थन देण्यात आले. मात्र, बंदचा प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला नाही.

Posted by : | on : Sep 7 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (71 of 2043 articles)

Indian Passport1
वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - [caption id="attachment_50188" align="alignleft" width="300"] Indian Passport1[/caption] बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही आणि ते बुडविण्याचा ...

×