ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, फिचर, राष्ट्रीय » भौतिक सुविधांच्या लालसेतून ओझोनचा र्‍हास

भौतिक सुविधांच्या लालसेतून ओझोनचा र्‍हास

आज जागतिक ओझोन दिवस,
वृत्तसंस्था
नागपूर, १५ सप्टेंबर –

World Ozone Day

World Ozone Day

नाण्याला दोन बाजू असतात… तशाच मानवाने केलेल्या औद्योगिक प्रगतीच्याही आहेत. स्वत:साठी भौतिक सुविधा निर्माण करताना स्वत:च्याच पायावर कधी दगड पाडून घेतला. केलेल्या या औद्योगिक प्रगतीमुळे पृथ्वीचे, मानवांचे अतिनील किरणांपासून बचाव करणार्‍या ओझोनच्या थरांना यामुळे धक्का बसला. कार्बनडाय ऑक्साईडमुळे या थराचे प्रमाण आता कमी होत आहे. जागतिक ओझोन दिवसानिमित्त घेतलेला हा आढावा…
ओझोनचे थर क्षीण होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्यावर याचा धोका समजला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत मंथन सुरू झाले. पृथ्वीला पर्यायाने मानवजातीला सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी १६ सप्टेंबर १९८७ रोजी मॉन्ट्रियल करारावर स्वाक्षरी केली. ओझोनच्या थरांना नुकसान करणारे औद्योगिक प्रदूषण व घातक वायूंचे उत्सर्जन रोखण्याचा उद्देश या करारामागे आहे.
रासायनिक संयुगांमुळे ओझोनच्या थराचा क्षय
काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होऊ शकतो. या संयुगांमध्ये नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, हायड्रॉझायल, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरो फ्लोरो कार्बन, ब्रोमो फ्लोरो कार्बन यांचा समावेश होतो. उत्तर अर्धगोलातील ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला चार टक्क्याने कमी होत आहे. २००९ मध्ये नायट्रस ऑक्साईड हा ओझोनच्या थराचा क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता. हे रसायन मानवी कृतींतून निर्माण झाले होते.
१९७८ मध्ये अमेरिका, कॅनडा आणि नॉर्वेने क्लोरो फ्लोरो कार्बन असलेल्या एरोसॉल स्प्रेवर बंदी आणली. परंतु, युरोपीय राष्ट्रांनी एरोसॉल स्प्रेवर बंदी आणण्यास नकार दिला. अमेरिकेत क्लोरो फ्लोरो कार्बनचा वापर फ्रीजसारख्या इतर उपकरणांमध्ये चालू होता. १९८५ मध्ये अंटार्टिक येथील ओझोनच्या थराला छिद्र पडल्याचे समोर आल्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बनच्या वापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले. १९८७ मध्ये झालेल्या मॉन्ट्रियल करारामुळे क्लोरो फ्लोरो कार्बनचा वापर १९९६ पासून पूर्णपणे बंद करण्यात आला. या करारावर १६० देशांनी स्वाक्षरी केली आहे. क्लोरो फ्लोरो कार्बनवर आणलेल्या जागतिक बंदीमुळे ओझोन थराचा क्षय होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे शास्त्रज्ञांनी २ ऑगस्ट २०१३ रोजी जाहीर केले.
ओझोन म्हणजे…
पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हेन्री बुईसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सूर्याची मध्यम अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो. १९३० मध्ये भौतिक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन याने ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली. ३५ किमी उंचीवर डायऑक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे अतिनील किरणे शोषली जातात. अतिनील किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. ओझोनच्या थरामुळे अतिनील किरणे बर्‍याच प्रमाणात शोषली जातात.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : नागरी, फिचर, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, फिचर, राष्ट्रीय (319 of 1777 articles)


जामीन देण्याचा न्यायालयाला अधिकार ►सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात सुधारणा, नवी दिल्ली, १४ सप्टेंबर - हुंड्यासाठी होणार्‍या छळप्रकरणात पती व सासू-सासर्‍यांविरोधात कारवाई ...

×