ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मल्ल्याचे आरोप एक षडयंत्र, उलट राहुल गांधींचाच हात

मल्ल्याचे आरोप एक षडयंत्र, उलट राहुल गांधींचाच हात

रविशंकर प्रसाद यांचा पलटवार,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर –

Ravishankar Prasad5

Ravishankar Prasad5

काँग्रेसच्या दबावामुळेच विजय मल्ल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे, असा प्रतिआरोप भाजपाने आज केला. विजय मल्ल्याच्या या आरोपामागे मोठे षडयंत्र आहे. मल्ल्याशी भाजपाचे नाही तर, काँग्रेसच्याच नेत्यांचे संबंध आहेत, असा घणाघाती आरोपही भाजपाने यावेळी केला.
विजय मल्ल्याचे आरोप आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा काही संबंंध आहे का, अशी विचारणा करत ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांच्या लंडन दौर्‍यानंतर विजय मल्ल्याने हा आरोप केला आहे. हा योगायोग नाही, तर एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. मल्ल्याचे आरोप पूर्णपणे खोडसाळ आणि निराधार आहे. संसदभवनात मल्ल्याने जबरदस्तीने माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्याला मी टाळले आणि तू बँकांकडे जा, असे ठणकावले होते, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे, याकडे रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले.
१९४७ ते २००८ या काळात देशातील सर्व बँकांनी मिळून १८ लाख कोटींचे कर्ज दिले होते, पण २००८ ते २०१४ या काळात या कर्जाची रक्कम ५२ लाख कोटींवर कशी गेली, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी दिले पाहिजे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
संबित पात्रा यांचाही हल्ला
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि विजय मल्ल्या यांच्यात व्यावसायिक संबंध तर नाही ना, अशी विचारणा भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली आहे. संपुआचे सरकार, तसेच गांधी कुटुंबांने विजय मल्ल्या तसेच त्याची विमान कंपनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी नियमांना बगल का दिली, अशी विचारणा करत डॉ. पात्रा म्हणाले की, गांधी कुटुंबाचे विजय मल्ल्याबद्दलचे प्रेम का उफाळून आले, याचे उत्तर राहुल गांधी यांनी देशाला दिले पाहिजे.
किंगफिशर कंपनी विजय मल्ल्याची होती की गांधी कुटुंबाची असा संशय येतो; कारण जेव्हा जेव्हा गांधी कुटुंबांतील कोणी परदेशात जात असेल तेव्हा त्यांचे तिकिट कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता किंगफिशरच्या बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड केले जात होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी किंगफिशरसाठी अनेक वेळा नियमात फेरबदल केले. काही वेळेला तर नियमच झुगारून लावले, असे स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकेतदरम्यान झालेल्या पत्रव्यवहारावरून दिसून आले. सामान्यपणे जेव्हा कायदा बनतो, तेव्हा तो संपूर्ण वर्गासाठी असतो, पण किंगफिशरसाठी कायद्यात सोयीस्कर बदल अनेकवेळा करण्यात आले, असा आरोप पात्रा यांनी केला.
जी व्यक्ती आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे, तिला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. अनेक अनावश्यक मुद्यावर राहुल गांधी आजकाल ट्विट करीत असतात, असा चिमटाही त्यांनी काढला.
डोटेक्स कंपनीकडून राहुल गांधी यांनी १ कोटींचे कर्ज घेतले होते, असे कोलकाताच्या आयकर विभागाच्या चौकशीत उघडकीस आले, याकडे लक्ष वेधत पात्रा म्हणाले की, डोटेक्सचे प्रवर्तक उदयशंकर महावार यांनी आपल्याकडे २०० शेल कंपन्या असल्याचे चौकशीत मान्य केले होते. यात डोटेक्स १९४ व्या क्रमांकावर होती. राहुल गांधी यांनी हवालामार्फत आपला किती काळा पैसा पांढरा केला, तसेच किती शेल कंपन्यात गांधी कुटुंबाचा पैसा गुंतला आहे, अशी विचारणा पात्रा यांनी केली.
जेटली-मल्ल्या भेटीचा भक्कम पुरावा : राहुल गांधी यांचा दावा
भारतातून परदेशात पळून जाण्याआधी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, या उद्योगपती विजय मल्ल्या याच्या दाव्यानंतर भाजपा आणि काँग्रेस यांनी परस्परांवर आरोपप्रत्यारोप सुरू केले आहेत. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. संसदभवनात झालेली मल्ल्या आणि अरुण जेटली यांची भेट अतिशय घनिष्ठ स्वरूपाची होती. काँग्रेस नेते पी. एल. पुनिया या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते, असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थंमंत्री जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्यावरून जेटली आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विविध विषयांवर आपल्या ब्लॉगमधून जेटली मतप्रदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांनी विजय मल्ल्या यांच्याशी झालेल्या आपल्या भेटीचा उल्लेख आपल्या ब्लॉगमधून का केला नाही, अशी विचारणा गांधी यांनी केली.
विजय मल्ल्या यांनी अनौपचारिकपणे माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला, असे आता जेटली म्हणत आहेत. पण प्रश्‍न हा आहे की, ही भेट जेटली यांनी आतापर्यंत लपवून का ठेवली, असे गांधी म्हणाले. विजय मल्ल्या आणि अरुण जेटली यांची भेट झाली होती, या भेटीचा पुरावा आमच्याजवळ आहे. पी. एल. पुनिया हा आमच्याजवळचा मोठा पुरावा आहे, असे ते म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर १ मार्च २०१६ ला संसदेच्या केंद्रीय कक्षात मी बसलो असताना अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांना एका कोपर्‍यात बराच वेळ चर्चा करताना मी पाहिले होते, त्यानंतर दोघेही संसदेच्या केंद्रीय कक्षात आले आणि आणि पुन्हा त्यांच्यात बर्‍याच वेळ चर्चा झाली, असे पुनिया म्हणाले. विजय मल्ल्या त्याआधी कधी संसदभवनात आले नव्हते. त्या दिवशीच ते अरुण जेटली यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते, असा दावा पुनिया यांनी केला.
३ मार्चला विजय मल्ल्या परदेशात पळून गेल्याची बातमी विविध वृत्तपत्रात तसेच वाहिन्यांवर पाहिल्यानंतर माझी तत्काळ प्रतिक्रिया होती की, दोन दिवसांपूर्वी तर मल्ल्या अरुण जेटलींना भेटले होते. या दोघांच्या भेटीबद्दल मी अनेकांना त्यावेळी सांगितलेही होते. जवळपास अडीच वर्षे जेटली यांनी मल्ल्यांसोबत झालेली भेट लपवून ठेवली. संसदेत या मुद्यावर अनेकवेळा चर्चाही झाली, पण त्यावेळीही जेटली यांनी याचा उल्लेख केला नाही, असा आरोप पुनिया यांनी केला.
संसदेच्या केंद्रीय कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे. त्याचे १ मार्चचे फूटेज पाहिले म्हणजे कोण खोटे आणि कोण खरे बोलतो, ते दिसून येईल, असे आव्हान देत पुनिया म्हणाले की, जो खोटे बोलत असेल त्याने राजकारण सोडून द्यावे. देशाच्या विश्‍वासावर हल्ला केला जात आहे, असे ते म्हणाले. अरुण जेटली यांचा सल्ला घेऊनच विजय मल्ल्या परदेशात पळून गेल्याचा आरोप गांधी यांनी केला.
अरुण जेटली यांनी एका अपराध्याची भेट घेतली होती, पण त्यांनी याची माहिती अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय तसेच दिल्ली पोलिस यापैकी कोणालाच दिले नाही. मल्ल्यांविरुद्ध अरेस्ट वारंट काढण्यात आले होते, ते इन्फर्मेशन वारंटमध्ये कोणी बदलले? जेटली यांनी हे स्तत:हून केले की, त्यांना असे करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर भाग पाडण्यात आले, हे जेटली यांनी सांगावे, असे राहुल गांधी म्हणाले.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (834 of 2042 articles)


घनिष्ठता असल्याचा पीयूष गोयल यांचा आरोप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - मल्ल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी ...

×