ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मल्ल्याला भेटण्याचा प्रश्नच येत नाही : जेटली

मल्ल्याला भेटण्याचा प्रश्नच येत नाही : जेटली

►देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची घेतली होती भेट : कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा न्यायालयात दावा
►विजय मल्ल्याने केलेला दावा खोटा ः जेटली
►२०१४ पासून त्याला भेटण्याची परवानगीच दिली नव्हती ः जेटली,
वृत्तसंस्था
लंडन/नवी दिल्ली, १२ सप्टेंबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटल्याचा दावा, हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याने लंडन येथील न्यायालयात सुनावणीदरम्यान केला. तर विजय मल्ल्याने खोटा दावा केला. मल्ल्याला भेटण्याचा प्रश्नच येत नाही. वस्तुस्थितीच्या विपरीत चुकीची माहिती त्याने दिली आहे. यामध्ये कोणतीही सत्यता नाही. २०१४ पासून त्याला भेटण्याची परवानगीच दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे जेटली यांनी फेसबूकवर स्पष्ट केले आहे.
या भेटीविषयी मला अधिक तपशील द्यायचे नाहीत, असे त्याने सुनावणीनंतर पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
भारतीय अधिकार्‍यांनी वेस्टमिनिस्टर कोर्टात मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी केलेल्या विशेष सेलचा व्हिडीओ दाखवला. भारतीय कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये, अशी विनंती मल्ल्याने केली होती. न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली, तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे सोपवण्यात येईल. मल्ल्या न्यायालयाच्या निर्णयाला पुढील न्यायालयात आव्हानही देऊ शकतो. किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला विजय मल्ल्या मागील वर्षी एप्रिल महिन्यात जारी कऱण्यात आलेल्या प्रत्यार्पण वॉरंटनंतर जामिनावर आहे. त्याच्यावर सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी भारतीय अधिकार्‍यांना आर्थर रोड कारागृहाच्या बरॅक क्रमांक १२ चा व्हिडीओ जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार हा व्हिडिओ दाखवण्यात आला. प्रत्यार्पणानंतर ब्रिटनच्या मानवाधिकारासंबंधी नियमांची पूर्तता होते वा नाही याची खातरजमा करण्यासाठी तुरुंगाच्या चित्रीकरणाची मागणी करण्यात आली होती.
विजय मल्ल्याने केलेला दावा खोटा
नवी दिल्ली – विजय मल्ल्याने केलेला दावा चुकीचा आहे. राज्यसभेचा सदस्य असताना केवळ ४० सेकंद तो माझ्यासोबत बोलला, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. विजय मल्ल्याने खोटा दावा केला. वस्तुस्थितीच्या विपरीत चुकीची माहिती त्याने दिली आहे. यामध्ये कोणतीही सत्यता नाही. २०१४ पासून त्याला भेटण्याची परवानगीच दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे जेटली यांनी फेसबूकवर स्पष्ट केले आहे.
तो राज्यसभेचा सदस्य असताना कधीतरी सभागृहात उपस्थित असायचा. एकदा मी सभागृहातील माझ्या कक्षाबाहेर फिरत होतो. त्यावेळी त्याने त्याला असलेल्या अधिकाराचा गैरवापर केला. मी चालत असताना वेग वाढवून माझ्याजवळ आला. मी कर्जफेडीसाठी प्रस्ताव देत आहे, असे त्याने सांगितले.
मल्ल्याने पूर्वी दिलेल्या खोटारड्या प्रस्तावांप्रमाणेच मला माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी, हा प्रस्ताव मला देण्यात काहीच अर्थ नाही. हा प्रस्ताव तू बँकांसमोर ठेव, असे स्पष्टपणे त्याला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
त्याच्या हाती असलेले दस्तऐवजही मी स्वीकारले नाहीत. राज्यसभेचा सदस्य म्हणून त्याला असलेल्या अधिकारांचा गैरवापर त्याने केला, असेही जेटलींनी सांगितले. बँकांचे कर्ज चुकवण्यासाठी स्वतःचा व्यावसायिक फायदा क रून घेण्यासाठी त्याने माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भेटीसाठी परवानगी देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 13 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1026 of 2226 articles)


आयोग, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमधून ‘नोटा’ (यापैकी कोणीही ...

×