ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटल युगान्त

अटल युगान्त

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका सक्षम होईपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचे साक्षीदार राहिलेले भाजपाचे श्रद्धेय नेतृत्व, कविहृदयाचे सर्वमान्य असे अजातशत्रू नेते, संघस्वयंसेवक, अमोघ वाणीचे ओजस्वी वक्ता आणि देशाचे माजी पंतप्रधान, ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपात एका युगाचा गुरुवारी अस्त झाला. गेली काही वर्षे विविध आजारांचा सामना करणारे अटलजी मागील सुमारे दोन महिने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात थेट मृत्यूशीच झुंज देत होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला त्यांचा कडवा संघर्ष मात्र नियतीपुढे थिटा पडला अन् गुरुवार १६ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजून ३ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यसमरातील एका सामान्य सैनिकापासून तर पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येकच टप्प्यावर कायम संघर्ष करीत जगलेला अटलजींच्या रूपातला एक पथिक आपल्या असंख्य चाहत्यांना पोरके करून अनंताच्या प्रवासाला निघून गेला…मृत्यूलाही, ‘कालके कपालपे लिखता हूं -मिटाता हूं’ असं निक्षून सांगत ते स्मृतिशेष झाल्याची अधिकृत घोषणा रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी केली अन् सारा देश शोकसागरात बुडाला….
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ ऑगस्ट –
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्कृष्ट संसदपटू, तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे, आपल्या अमोघ वक्तृत्वाने देशातील कोट्यवधी लोकांना भारावून टाकणारे, अजातशत्रू, ओजस्वी कवी, भारतरत्न अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी यांचे आज गुरुवारी सायंकाळी दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षांचे होते. वाजपेयी यांच्या निधनानेे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. वाजपेयींच्या निधनाने भारतीय राजकारणातील दैदिप्यमान अशा अटलयुगाचा अस्त झाला आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांची मृत्युशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली लढाई आज सायंकाळी संपली. ‘हार नही मानूंगा’ म्हणणार्‍या वाजपेयी यांनी अखेर मृत्युपुढे हार मानली. वाजपेयी यांनी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) सायंकाळी ५.३० च्या आपल्या वैद्यकीय बुलेटिनमधून केली. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. वाजपेयी यांच्या सन्मानार्थ सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले. दिल्ली सरकारनेही उद्या शुक्रवारी एक दिवसाची सुटी जाहीर केली असून, उद्या सर्व सरकारी कार्यालये, तसेच खाजगी सरकारी शाळा व महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
वाजपेयी यांना ११ जूनला युरिन इन्फेक्शन तसेच मूत्रपिंडाच्या त्रासामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरू होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची एक चमू त्यांच्यावर उपचार करीत होती. गेल्या ४८ तासापासून त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली होती. डॉॅक्टरांच्या चमूने त्यांना वाचविण्यासाठी उपचारांची शर्थ केली, पण त्याला यश आले नाही. दीर्घकाळापासून मधुमेहाने आजारी असणार्‍या वाजपेयी यांची एकच किडनी काम करीत होती.
१५ ऑगस्टच्या सकाळपासूनच वाजपेयी यांची प्रकृती ढासळत होती. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. वाजपेयी यांच्यासाठी सर्वोत्तम उपचार करा, कोणतीही कसर ठेवू नका, असे मोदी यांनी सांगितले होते. वाजपेयी यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे समजताच देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एम्सने गुरुवारी सकाळी पहिले वैद्यकीय बुलेटिन जारी केले, त्यात वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचा उल्लेख होता. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभर पूजापाठ, प्रार्थना आणि यज्ञ सुरू झाले, पण त्याचा उपयोग झाला नाही. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’ या उक्तीप्रमाणे वाजपेयी देवाघरी निघून गेले. वाजपेयी अविवाहित होते, मात्र त्यांच्यामागे भावाचे तसेच बहिणीची मुले, मुली आणि आणि मोठा आप्तपरिवार आहे.
अंत्यदर्शन
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सायंकाळी एम्समध्ये जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले.
तीनदा भूषवले पंतप्रधानपद
अटलबिहारी वाजपेयी यांनी तीनदा देशाचेपंतप्रधानपद भूषवले. पहिल्यांदा ते १९९६ मध्ये पंतप्रधान झाले. मात्र यावेळचे त्यांचे पंतप्रधानपद औटघटकेचे ठरले. फक्त १३ दिवसच ते पंतप्रधानपदावर होते. दुसर्‍यांदा १९९८ मध्ये वाजपेयी पंतप्रधान झाले. यावेळी ते १३ महिने पंतप्रधान होते. तिसर्‍यांदा म्हणजे १९९९ मध्ये वाजपेयी यांनी पाच वर्ष पंतप्रधानपद भूषवले. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान होेते. वाजपेयी दहा वेळा लोकसभेचे, तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. लोकसभा तसेच राज्यसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सरकारला अनेकवेळा सळोकी पळो केले होते. उत्कृष्ट संसदसदस्य म्हणून त्यांना अनेकवेळा सन्मानित करण्यात आले. जनता पक्षाच्या राजवटीत परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी यांना आपली छाप पाडली होती.
२००५ मध्ये राजकारण संन्यास
वाजपेयी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे २००५ मध्येच राजकारणातून संन्यास घेतला होता. मात्र रालोआचे नेते म्हणून संसदभवनातील कार्यालयात त्यांचे नाव कायम होते. त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होता, त्यामुळे ते कोणाला ओळखतही नव्हते. त्यांना बोलायचाही भास होत होता. त्यामुळे सार्वजनिक जीवनात ते दिसत नव्हते. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
२०१५ मध्ये वाजपेयी यांना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांच्या निवासस्थनी जाऊन त्यांना ते सन्मानपूर्वक प्रदान केले होते. त्यावेळी काढण्यात आलेले त्यांचे शेवटचे छायाचित्र होते.
आणि ‘राम’ गेला!
वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच लालकृष्ण अडवाणी यांना दु:ख आवरता आले नाही. अडवाणी यांच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. भाजपात अटल-अडवाणी यांची जोडी ‘राम-लक्ष्मणाची जोडी’ अशीच ओळखली जात होती. या दोघांनी जनसंघापासून भाजपाला सत्तेत आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या दोघांचा राजकीय प्रवास आणि मैत्री ६५ वर्षांची होती. विशेष म्हणजे, अडवाणी यांनी वाजपेयी यांचे सचिव म्हणून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली. अडवाणी यांनीच वाजपेयी यांना १९९९ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. भाजपात वाजपेयी उदारमतवादी तर अडवाणी कट्टरपंथी नेता म्हणून ओळखले जात होते, पण याचा त्यांच्या मैत्रीवर कुठलाही परिणाम झाला नाही. सुरुवातीच्या दिवसात वाजपेयी व अडवाणी एकाच चळवळीत दिल्लीत फिरत होते आणि सोबत चित्रपटही पाहात होते.
आज अंत्यसंस्कार
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार १७ ऑगस्टला दुपारी ३ च्या सुमारास राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एम्समधून वाजपेयी यांचे पार्थिव सायंकाळी ७ च्या सुमारास ६, कृष्णमेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्याठिकाणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. रात्रभर वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानीच होते. वाजपेयी यांचे पार्थिव उद्या १७ ऑगस्टला सकाळी ९ वाजता दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपाच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाजपा मुख्यालयातूनच दुपारी दीड वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ येथे जाईल. अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारने राजघाटावर दीड एकर जागा आवंटित केली असून, या जागेवर अंत्यसंस्काराच्या दृष्टीने तयारीही सुरू झाली आहे.
अटलजींच्या निधनाने मी अतिशय दु:खी झालो आहे. विलक्षण नेतृत्व, दूरदृष्टी आणि अद्भुत भाषणशैली यातून त्यांचे विशाल व्यक्तिमत्त्व दिसून येत होते. त्यांचे विराट आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व देशवासीयांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. वाजपेयी दीर्घकाळपर्यंत देशवासीयांच्या स्मरणात राहतील, असे त्यांचे कर्तृत्व होते. त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा अंत देखील कायम स्मरणात राहील. ˆ– राष्ट्रपती रामनाथ कोविद
आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान अटलजी आता आपल्यात नाही. मी नि:शब्द आहे, शून्यात आहे; पण अटलजींची प्रेरणा, मार्गदर्शन प्रत्येक भारतीयाला आणि भाजपा कार्यकर्त्यांना नेहमीच मिळत राहील. त्यांचे कार्यदेखील अजरामर ठरणार आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना मी ईश्‍वराजवळ करतो. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
उत्तुंग व्यक्तिमत्त्व, दृढ व वैश्‍विव स्तरावर मान्य नेता, ज्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्ये सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित केलीत, आपल्या कार्यकर्तृत्वातून त्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडविले. असे अटलजी आपल्याला आज सोडून गेलेत. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती कधीही भरून येणार नाही. संपूर्ण राष्ट्रासह आम्ही दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. – सरसंघचालक मोहनजी भागवत
आज माझ्याजवळ शब्दच नाहीत. गेल्या ६५ वर्षांपासून आमची घनिष्ठ मैत्री होती. अटलजी माझ्यासाठी गुरू आणि प्रेरणास्रोत होते. त्यांचा सचिव म्हणूनच मी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून काम केले, याचा मला अभिमानच आहे. आपल्या विरोधकांनाही प्रेमाने जिंकण्याचे अद्भुत कौशल्य त्यांच्यात होते. – लालकृष्ण अडवाणी

Posted by : | on : 17 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1371 of 2426 articles)

Atal Bihari Vajpayee After Stroke
वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट - अटलबिहारी वाजपेयी अत्यवस्थ आहेत, हे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि सारा देशच व्हेंटिलेटरवर असल्यागत झाला ...

×