ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ

मित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ

►राहुल गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा,
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

मित्रपक्षांची इच्छा असेल तर आपण निश्‍चितपणे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. सत्ता मिळाल्यास लहान उद्योजकांना आधार करणे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवणे, कमी खर्चात वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाहीही दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात दिली. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वढेराही उपस्थित होत्या.
विरोधी पक्षांसाठी आगामी लोकसभा निवडणूक ही दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल. पहिल्या टप्प्यात भाजपाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य असेल. त्यात यश आल्यावर दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधान कोण बनेल, याविषयी निर्णय घेतला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळेल, असा विश्‍वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. देशातील समस्या सोडवण्याबाबत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, आजच्या घडीला दोन समस्या आहेत. पहिली नोकर्‍या नाहीत आणि दुसरी म्हणजे छोट्या आणि मध्यम व्यापार्‍यांना सरकारकडून लक्ष्य करण्यात येत आहे, असे नमूद करत राहुल यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि विदेश नीतीवर टीका केली.
काँग्रेसची भाजपासोबत वैचारिक लढाई आहे. हा पक्ष देशातील १३० कोटी नागरिकांवर एकमेव विचारधारा लादू पाहात असून देशवासीयांशी दोन हात करण्याचा विचार करीत आहे. काँग्रेस मात्र १३० कोटी कल्पनांना चालना देणारा पक्ष आहे. आपले मंदिरात जाणे भाजपाला पसंत पडलेले नाही. मंदिर, मशीद आणि गुरुद्वारामध्ये आपण अनेक वर्षांपासून जात आहोत. आता मात्र त्याची अचानक चर्चा होत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
बहुजन समाजवादी पक्षासोबतच्या युतीबाबत त्यांनी सांगितले की, मायावती यांच्या पक्षासोबत राज्य आणि केंद्राच्या पातळीवर युतीचे प्रयत्न सुरू असताना बसपाने अचानक युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला.
युती झाली असती तर चांगले झाले असते. त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये फरक पडणार नाही आणि आमचाच विजय होईल. राजस्थान आणि तेलंगणमध्ये तर काँग्रेस विजयी होणारच आहे. लोकसभा निवडणुकीत मायावती नक्कीच सोबत येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (323 of 1901 articles)

Viral Acharya
६ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया आजवरच्या ऐतिहासिक नीचांकावर गेला. अशा स्थितीतही महागाईचा दर चार टक्क्यांवरच कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा ...

×