ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती

‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती

मेनका गांधी यांची माहिती,
नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर –

Menaka Gandhi

Menaka Gandhi

‘मी टू’ संदर्भातील सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करू शकते, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज दिली.
‘मी टू’ संदर्भातील अनेक तक्रारींनी सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. चित्रपट, राजकारण आणि माध्यमक्षेत्रासह अन्य अनेक क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्तींवर महिलांनी लैंगिंक शोषणाचे आरोप केले आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही असे आरोप झाले. त्यामुळे सरकारला याची गंभीरपणे दखल घ्यावी लागली. ‘मी टू’ संदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेण्यासाठी तसेच त्याची चौकशी करण्यासाठी एक उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मी केंद्र सरकारकडे पाठवणार आहे. त्याला सरकारची अनुमती मिळेल, असा मला विश्‍वास आहे. या समितीत काही निवृत्त न्यायमूर्तीचा तसेच कायदे क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. ‘मी टू’ संदर्भातील तक्रारी करणार्‍या सर्व महिलांच्या वेदनांबाबत मला सहानूभूती आहे. त्यांच्या तक्रारींवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. महिलांनी समोर येत न घाबरता अशा तक्रारी कराव्या. त्यांना आम्ही सर्व ते सहकार्य करू, असे आश्‍वासनही गांधी यांनी यावेळी दिले.
लैंगिक शोषणाच्या सर्व तक्रारींची दखल घेत त्याची चौकशी कशी करायची, तसेच अशा प्रकरणात लवकरात आरोपपत्र कसे दाखल करायचे, याबाबत ही समिती उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास गांधी यांनी व्यक्त केला. महिला आणि बाल कल्याण मंत्रालय अशी समिती स्थापन करणार आहे.
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य
गुरुवारी एम. जे. अकबर यांच्यावरील लैगिंक शोषणाच्या आरोपाबाबत विचारले असता, अशा सर्व तक्रारींची गंभीरपणे दखल घेण्याची सूचना मेनका गांधी यांनी केली होती. कोणत्याही क्षेत्रातील ताकदवर व्यक्ती असे प्रकार करीत असतात. याला चित्रपट, राजकारण आणि माध्यमांपासून कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. अशा घटनांविरुद्ध महिला आवाज उठवत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे, महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असे मेनका गांधी यांनी म्हटले होते. महिलांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत आग्रही आहेत, त्यामुळेच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा आमच्या सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, असे गांधी म्हणाल्या.
एम. जे. अकबर यांनी आपल्यावरील आरोपांबाबत खुलासा करावा, अन्यथा राजीनामा द्यावा, ते राजीनामा द्यायला तयार नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
इंडस्ट्रीत सर्व सहमतीने होते : शिल्पा शिंदे
मुंबई – ‘मी टू’ मोहिमेमुळे बॉलीवूडमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. एक गट या घटनांना वाचा फोडण्यार्‍या महिलांच्या मागे उभा राहिला आहे तर, दुसरा या मोहिमेवर टीका करणारा आहे. बिग बॉस सीझन १०ची विजेती शिल्पा शिंदेनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कारासारख्या घटना होत नसतात. जे काही घडते ते दोन व्यक्तींच्या मर्जीने होतं असते. मीटू सारखी मोहीम म्हणजे निवळ मूर्खपणा आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान शिल्पा म्हणाली, ज्यावेळी गोष्टी घडतात तुम्हाला तेव्हाच त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे. नंतर बोलून त्याचा काहीच उपयोग नसतो. मलासुद्धा याचा धडा मिळाला आहे. जेव्हा गोष्टी तुमच्या सोबत घडतात तेव्हाच बोला. नंतर बोलून फक्त कॉन्ट्रोव्हर्सी होते, बाकी हाती काही लागत नाही. शिल्पाने सुद्धा ‘भाभी जी घर पर है’चे निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता, हे विशेष.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (23 of 1636 articles)

India Vishwa Hindu Parishad Vhp
साधण्याचे विहिंपचे केंद्राला आवाहन, तिरुनेलवेली, १२ ऑक्टोबर - अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा केव्हा तयार करायचा, ...

×