ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय » मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
►आयआयटी मुंबईचे देशातील नामांकित संस्थांमध्ये स्थान,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ११ ऑगस्ट –

Pm Narendra Modi At Mumbai Iit2

Pm Narendra Modi At Mumbai IIT

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईला केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून, संशोधन आणि नाविन्यावर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे केले. आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते. प्रारंभीच पंतप्रधान मोदी यांनी दीक्षांत समारंभात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या सहा दशकात आयआयटीने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, ज्यांची आयआयटी ही प्रेरणा आहे, यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले असल्याचेही मोदी म्हणाले.
गेल्या चार वर्षांमध्ये आपल्या सर्वांसाठी शिकण्याचा एक अद्भूत अनुभव होता, महाविद्यालय उत्सव, वसतिगृहे, आंतर विद्याशाखा, संघटना आदी गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. दर्जेदार, सर्वोत्कृष्ठ शिक्षण आपल्याला या शिक्षणप्रणालीद्वारे प्राप्त झाले आहे. येथे विद्यार्थी भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करतात, विविध भाषा, अनेकविध प्रकारची पार्श्‍वभूमी असलेले विद्यार्थी ज्ञान आणि शिकण्यासाठी येथे एकत्र होत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. आयआयटीला देशात, जगात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तरी आज त्याची व्याख्या बदलली आहे, हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही तर, आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्र्यूमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आपल्या आयआयटीत आहेत, असे सांगून आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्ट अप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे. नाविन्यता आणि उद्योगांच्या माध्यमातून भारताची विकसित अर्थव्यवस्थेची पायाभरणी होत आहे. या पायाभरणीतून शाश्‍वत आणि दीर्घकाळ तंत्रज्ञानावर आधारित आर्थिकवृद्धी होणार आहे. नाविन्यता हा एकविसाव्या शतकातला एक महत्त्वाचा शब्द आहे. कोणतीही संस्था नाविन्यतेशिवाय स्थिर होऊ शकत नाही. याच नाविन्यतेच्या शोधातून भारत हे स्टार्टअपचे केंद्र म्हणून उदयास आले आहे, नाविन्यता आणि उद्योगासाठी भारत हे जगाचे आकर्षण केंद्र व्हावे, यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असून, हे केवळ शासनाच्या प्रयत्नांतून नाही होणार, तर त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची आवश्यकता आहे, असे सांगून, केवळ शासकीय कार्यालय किंवा झगमगीत कार्यालयांमधून हे होणार नाही, तर अशा नाविन्यपूर्ण संकल्पना आयआयटीसारख्या कॅम्पसमधून आणि आपल्यासारख्या युवकांच्या मनातून निर्माण होतील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आपले लक्ष्य नेहमी उच्च असू द्या, केवळ महत्त्वाकांक्षाच नाही तर आपले लक्ष्य, उद्दिष्ट हे सुद्धा महत्त्वाचे असते, असे सांगून, इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप परिश्रम केले आहेत, अनेक लोक प्रतिकूल परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलेत, आपल्यात असलेल्या अभूतपूर्व क्षमतेमुळे आपल्याला त्याचे प्रभावी परिणाम पाहायला मिळत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. आज प्रदान झालेली पदवी ही आपल्या समर्पण आणि बांधिलकीचे प्रतीक आहे, हा केवळ एक टप्पा असला तरी, खरे आव्हान अजून आपल्याला पेलायचे आहे. आज आपण जे काही मिळवले आहे आणि जे मिळवायचे आहे, त्यामागे तुमच्या, परिवाराच्या आणि सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशा-अपेक्षा जोडल्या गेल्या असल्याचेही मोदी म्हणाले.
प्रारंभी आयआयटी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष दिलीप शंघवी यांनी दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक केले. तर संचालक प्रा. देवांग खक्कर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. सिम्फनी एआय ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रोमेश वाधवानी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. आयआयटी मुंबईच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाधारित प्रदर्शनाला पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या प्रदर्शनातील उपकरणे, शोध पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
२६२१ विद्यार्थी सन्मानित
आज आयआयटी मुंबईच्या झालेल्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात २६२१ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली, तर ३८० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरू तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते २९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय (1026 of 2105 articles)

Sansad Bhavan2
सगळेच रेकॉर्ड मोडले, वृत्तसंस्था नवी दिल्ली,११ ऑगस्ट - संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन मागील १८ वर्षांत सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरले आहे. ...

×