ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मोदींची हत्या व केंद्र सरकार उलथवण्याचा शहरी नक्षल्यांचा कट

मोदींची हत्या व केंद्र सरकार उलथवण्याचा शहरी नक्षल्यांचा कट

►देशविरोधीच आहेत शहरी नक्षलवादी!
►शहरी नक्षल्यांविरुद्ध ठोस पुरावे
►अतिरिक्त पोलिस महासंचालकांचा दावा
►जप्त पत्रांचे केले जाहीर वाचन,
वृत्तसंस्था
मुंबई, ३१ ऑगस्ट –

Paramveer Sing Additional Ig

Paramveer Sing Additional Ig

सात शहरांमध्ये धाडी टाकून ज्या पाच कथित सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती, त्या सर्वांचेच नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे महाराष्ट्र पोलिसांनी आज शुक्रवारी पत्रपरिषदेत सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा व केंद्र सरकार उलथविण्याचा व्यापक कट या नक्षली समर्थकांनी आखला होता. इतकेच नव्हे, तर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडविण्यासाठी या लोकांना नक्षलवादी नेत्यांनी पाच लाख रुपये रोख दिले होते, असा दावा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी केला.
रोना जेकब विल्सन आणि माओवादी नेता कॉम्रेड प्रकाश यांच्यात जो ई-मेल पत्रव्यवहार झाला, त्यात ‘राजीव गांधी यांच्या हत्येच्या धर्तीवर नरेंद्र मोदी यांचीही हत्या करून, त्यांचे सरकार पाडण्यात यावे’, असा स्पष्ट उल्लेख आहे, असे सांगताना परमवीर सिंग यांनी हे पत्रच पत्रपरिषदेत वाचून दाखविले. यामुळे अटकसत्रावर टीकेची झोड उठविणार्‍या ढोंगी मानवीहक्कवाद्यांना मोठी चपराक बसली आहे.
या पत्रात गे्रनेड लॉन्चर खरेदी करण्यासाठी किमान आठ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. नक्षली गटाच्या सक्रिय आणि स्लीपर सेलच्या सदस्यांमध्ये आदानप्रदान झालेली हजारो पत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. स्वत:ला मानवी हक्क कार्यकर्ता म्हणविणार्‍या रोना विल्सनला कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी जून महिन्यात दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या, हे विशेष!
तुमचे पत्र मिळाले…
रोना जेकबने कॉम्रेड प्रकाशला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘येथील विद्यमान स्थितीसंदर्भात तुमचे शेवटचे पत्र मिळाले. अरुण फरेरा, वेरनॉन गोन्सालविस आणि इतर सदस्यही शहरी भागातील नक्षली चळवळीबाबत चिंतीत आहेत. आम्हाला गे्रेनेड लॉन्चर्स आणि चार लाख बॉम्ब हवे असून, त्यावर आठ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यावर तुमचे (प्रकाश) मत कळवावे. याच पत्रात कॉम्रेड किसान आणि इतरांनी मोदीराज संपुष्टात आणण्यासाठी मजबूत पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आपण राजीव गांधी हत्याकांडाच्या धर्तीवर विचार करायला हवा, असे सुचविले.’
याशिवाय याच आठवड्यात आम्ही ज्या नक्षलसमर्थक नेत्यांना अटक केली आहे, त्यांच्या घरातून मिळालेल्या पत्रातील मजकूरही तितकाच गंभीर आहे, असे सांगताना परमवीर सिंग यांनी यातील काही पत्रांमधील मजकूरही वाचून दाखविला. आम्ही जे पुरावे गोळा केले, त्यावरून या लोकांचे नक्षली नेत्यांशी असलेले संबंध असल्याचे सिद्ध झाले आणि त्यानंतरच आम्ही धाडसत्र राबवून त्यांना अटक केली. माओवाद्यांची केंद्रीय समिती या लोकांना सांकेतिक भाषेतून पत्र पाठवित होते आणि हा पत्रव्यवहार कुरिअरच्या माध्यमातून व्हायचा, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
आमची कारवाई योग्यच
या लोकांवर आम्ही केलेली कारवाई अतिशय योग्य अशीच होती. या नक्षली समर्थकांच्या घरातून आम्ही हजारावर कागदपत्रे, संगणक आणि लॅपटॉप ताब्यात घेतले असून, त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. फार मोठ्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला, असा दावा त्यांनी केला.
हिंसाचारासाठी पाच लाख
कोरेगाव भीमा येथे हिंसाचार भडकवण्यासाठी नक्षली नेत्यांनी आपल्या स्थानिक समर्थकांना पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख एका पत्रात आहे. हा हिंसाचार परिणामकारक झाल्याचा उल्लेख, नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेल्या पत्रात केला आहे.
शहरी नक्षलवादाची कल्पना
मी २० वर्षांपूर्वी चंद्रपूर, भंडारा येथे काम केले आहे. तेव्हापासूनच शहरी नक्षलवादाबाबत मला कल्पना आहे आणि त्याविरोधात मी कामही केले आहे, असेही परमवीर सिंह यांनी स्पष्ट केले.
दगडफेकीची योजना
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावादी आणि मणिपूरमधील बंडखोरांशी संबंध असल्याचेही तपासात उघड झाले आहे. काश्मीर खोर्‍यात ज्याप्रकारे दगडफेक करण्यासाठी तरुणांना एकत्र आणले जाते, तशीच कल्पना देशभरात कशी राबविता येईल, असा उल्लेखही पत्रात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जेएनयूमधील विद्यार्थ्यांनाही नक्षलवादाकडे आकर्षित करण्यासाठी या लोकांचे प्रयत्न सुरू होते, असेही तपासात उघड झाले असल्याचे ते म्हणाले.
पैसे सुरक्षित आहेत, काळजी नको
गडचिरोलीत देण्यासाठी पैसे पाठवले होते, मात्र ते अजून का पोहोचले नाही, अशी विचारणा वरावरा राव यांनी गडलिंग यांच्याकडे केली होती. पैसे नसल्याने चळवळ थंडावल्याचेही राव यांनी पत्रात लिहिले होते. गडलिंग यांनी राव यांना पत्र लिहून काळजी करू नका, पैसे कुठेच गेले नाही. नोटबंदीमुळे तपासणी जोरात सुरू होती, त्यामुळे पैसे पोहोचविण्यात अडचण येत आहे. दुसरे काही नाही आणि आता प्रकरण मार्गी लागले असून, पैशाच्या काही खेपा पोहोचविल्या आहेत, असे स्पष्टीकरण गडलिंग यांनी दिले होते. त्यामुळे नोटबंदीच्या सुरवातीच्या काळात नक्षल्यांमध्ये मतभेद झाल्याचे उघड झाले.
भाजपशासित राज्यात घातपात
तेलतुंबडे यांनी विल्सन यांना लिहिलेल्या पत्रात कोरेगाव-भीमा दंगलीमध्ये महत्त्वाची ठरलेली एल्गार परिषद यशस्वी झाली असून, आता भाजपशासित राज्यात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा उल्लेख केला आहे. जगातील अन्य संघटनांशी हे लोक संपर्कात होते आणि मोठा घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. तो पोलिसांनी हाणून पाडला असल्याचा दावाही सिंग यांनी केला.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (733 of 1862 articles)


नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - टीकाकार विरोधकांचे तोंड बंद करीत भारतीय अर्थव्यवस्थेने सुस्साट वेगाने वाटचाल सुरू केली आहे. चालू आर्थिक ...

×