ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » मोदींच्या मुत्सद्देगिरीचा विजय

मोदींच्या मुत्सद्देगिरीचा विजय

एच-१ बी व्हिसा प्रकरण, झुकली अमेरिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट –

Narendra Modi 5

Narendra Modi 5

एच-१ बी व्हिसाबाबत वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. एच-१ बी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे ट्रम्प प्रशासनाने दिल्ली येथे होणार्‍या बैठकीपूर्वी स्पष्ट केले आहे. या मुद्यावरील भारताची खंबीर भूमिका लक्षात घेऊन अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. राजधानीत होणार्‍या बैठकीदरम्यान भारत हा मुद्दा उचलू शकतो, असे अमेरिकेला वाटते. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचे यश मानले जात आहे.
सप्टेंबरमध्ये होणार्‍या बैठकीत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज हा मुद्दा उचलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. एच-१ बी व्हिसाचा मुद्दा कित्येक व्यासपीठांवर उचलला जात आहे आणि याबाबत व्हाइट हाऊससह अमेरिकेतील प्रांतीय प्रशासन व खासदारांच्या संपर्कात असल्याचे सुषमा स्वराज यांनी मागील महिन्यात राज्यसभेत सांगितले होते. दिल्ली येथे होणार्‍या बैठकीत भारताने हा मुद्दा उचलण्याची तयारी केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे अमेरिकी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, एच-१ बी व्हिसाच्या धोरणात कोणताही बदल होणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
अमेरिकी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, अमेरिकेत काम करण्यासाठी व्हिसा कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात विश्‍लेषण करण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकी कर्मचारी आणि त्यांना मिळणारे वेतन यामुळे प्रभावित होऊ नये हे निश्‍चित करण्यासाठी व्हिसा धोरणाचे विश्‍लेषण करण्याचे आदेश देण्यात आले. एच-१ बी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाही, असे अमेरिकी अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या प्रणालीत बदल होईल अथवा नाही, हे सांगणे मला कठीण आहे. भारतासाठी निश्‍चितच हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
एच-१ बी व्हिसा नियमांमध्ये होत असलेल्या बदलांबाबत आम्ही ६ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार्‍या बैठकीत हा मुद्दा उचलू, असे सुषमा स्वराज यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मूळ मुद्दा भरकटून ही बैठक व्हिसा धोरणाच्या मुद्यावर केंद्रित होऊ शकते, अशी शंका अमेरिकेला आली. मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे हे यश आहे.
व्हिसा धोरण कठोर करण्याचा प्रयत्न
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी इमिग्रेशन धोरणात बदल करण्याच्या केलेल्या घोषणेंतर्गत व्हिसा नियम कठोर करीत अमेरिकी कंपन्यांमधील विदेशी कामगारांसाठी व्हिसा शिफारसींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धोरणामुळे विदेशी नागरिकांना अमेरिकेत नोकरी करणे दुरापास्त झाले असते. या व्यतिरिक्त एच-४ व्हिसा धोरण संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांच्या माध्यमातून एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला अमेरिकी नोकरीचे दरवाजे कायम बंद होण्याची शक्यता होती.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (736 of 1862 articles)


नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेषाधिकार देणार्‍या कलम ३५ अ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च ...

×