ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार

मोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत निर्णय,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि देशातील शेतकर्‍यांच्या स्थितीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध सडकेपासून संसदेपर्यंत देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यसमितीच्या आज शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
काँग्रेस कार्यसमितीची बैठक २४, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित नव्हत्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टोनी, पी. चिदम्बरम्, मोतीलाल वोरा, अहमद पटेेल, अशोक गहलोत यांच्यासह कार्यसमितीचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते.
नंतर एका पत्रपरिषदेत अशोक गहलोत आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती दिली. गेल्या १५ दिवसांत झालेली काँग्रेस कार्यसमितीची ही दुसरी बैठक आहे. याआधीची बैठक २२ जुलैला झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दर महिन्यात काँग्रेस कार्यसमितीची बैठक घेण्याचा निर्णयाही यावेळी घेण्यात आला.
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत एनआरसी, राफेल, बेरोजगारी, देशाची आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्रातील समस्यांवर व्यापक चर्चा करण्यात आल्याचे सुर्जेवाला यांनी सांगितले. जिल्हा पातळीवरील काँग्रेसचे अध्यक्ष तसेच प्रदेश अध्यक्षांशी चर्चा करून या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात येईल, असे सुर्जेवाला यांनी सांगितले.
एनआरसीची प्रक्रिया आसाम करारानुसार सुरू झाली आणि आसाम करार १९८५ मध्ये केंद्रात आणि आसाममध्ये काँग्रेसचे शासन असताना करण्यात आला होता, असे स्पष्ट करत सुर्जेवाला म्हणाले की, बेकायदेशीर मार्गाने आसाममध्ये आलेल्या घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी एनआरसीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय आसाम करारानुसार घेण्यात आला होता. एनआरसी हे आसाम कराराचे अपत्य आहे. काँग्रेसचे तरुण गोगोई मुख्यमंत्री असताना मे २०१६ पर्यंत एनआरसीचे ८० टक्के काम पूर्ण करण्यात आले होते.
आसाम कराराबद्दल काँग्रेस प्रतिबद्ध आहे, असा निर्वाळा देताना सुर्जेवाला म्हणाले की, मसुदा यादीत ४० लाख लोकांच्या नावांचा समावेश नाही. यात देशातील अनेकांचा समावेश आहे. या लोकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशी तर्कसंगत संधी मिळाली पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यादीत ज्यांचे नाव नाही, त्यांना एनआरसीच्या यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत काँग्रेस करणार आहे.
एनआरसीच्या माध्यमातून देशातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आणण्याचे भाजपाचे षडयंत्र असून विविध आघाड्यांवरील आपल्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा याचा फायदा घेत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाचे हे षडयंत्र हाणून पाडतील, असा निर्वाळा सुर्जेवाला यांनी दिला.
आसाममधील बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येबद्दल काँग्रेस गंभीर असून २००५ ते २०१३ या काँग्रेसच्या कार्यकाळात ८२,७२८ बांगलादेशी घुसखोरांना परत पाठविण्यात आले, तर २०१४ ते २०१८ या भाजपा सरकारच्या चार वर्षांच्या काळात फक्त १८२२ बांगलादेशी घुसखोर बाहेर पाठविण्यात आले, मोदी सरकारने स्वत: संसदेतच ही माहिती दिली आहे, असे सुर्जेवाला यांनी स्पष्ट केले. राफेल व्यवहार, बँकांमधील घोटाळे तसेच मेहुल चौक्सीच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सुर्जेवाला म्हणाले.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (532 of 1765 articles)

Amitshah2
कोलकाता, ४ ऑगस्ट - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमधील जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय ...

×