ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत
►थरूर नीच माणूस; स्वामी कडाडले,
नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर –

Shashi Tharoor

Shashi Tharoor

राममंदिराच्या मुद्यावरून ज्येष्ठ काँग्रेसनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या विधानामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसने त्यांच्या विधानापासून स्वत:ला दूर केले. म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर हे शशी थरुर यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेस पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, विरोध वाढल्यानंतर शशी थरुर यांनीही आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, अशी सारवासारव केली आहे.
चैन्नईतील एका कार्यक्रमात बोलतांना शशी थरुर यांनी पाडलेल्या मशिदीच्या जागेवर राम मंदिर व्हावे, असे देशातील कोणत्याही चांगल्या हिंदूला वाटणार नाही, असे विधान केले होते. शशी थरुर यांच्या या विधानावरुन खळबळ उडाली. भाजपापासून विविध हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शशी थरुर यांच्या विधानामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत आली. त्यामुळे शशी थरुर यांनी ट्विट करत आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
अयोध्या ही भगवान श्रीराम यांची जन्मभूमी असल्यामुळे याठिकाणी राममंदिर उभारावे, अशी देशातील बहुतांश हिंदूची इच्छा आहे, पण मशीद पाडलेल्या जागेवर मंदिर उभारावे, असेे देशातील कोणत्याही चांगल्या हिंदूला वाटणार नाही, असे मी बोललो होतो. हे माझे व्यक्तिगत मत आहे, मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता नाही, त्यामुळे याचा संबंध पक्षाशी जोडू नये, असे थरुर यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे शथी थरुर यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे काँग्रेस प्रवक्ते आरपीएन सिंह यांनीही स्पष्ट केले. राममंदिराचा मुद्दा न्यायालयात आहे, त्यामुळे या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो सर्वांनी मान्य करावा, अशी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचा दावाही सिंह यांनी केला आहे. भाजपा नेते खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरुर यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला.
चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या ‘द हिंद लिट फॉर लाईफ डायलॉग २०१८’मध्ये शशी थरूर यांनी ही वायफळ बडबड केली. थरूर यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती होऊ नये, यासाठी काँग्रेस नेते अशी वादग्रस्त विधाने करीत असतात, अशी टीका भाजपा प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिराचे पुनर्निर्माण होऊ नये यासाठीच थरूर हे जाणूनबुजून एका समुदायाला अशाप्रकारचा संदेश देऊ इच्छितात, असे नरसिंह यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांनी शशी थरूर यांच्या विधानाला पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसरीकडे विश्‍व हिंदू परिदषेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनीही शशी थरूर यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला चुचकारण्यासाठीच काँग्रेस नेते अशी विधाने करतात, असे जैन यांनी म्हटले आहे.
‘द पॅराडॉक्सियल प्राईम मिनिस्टर’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले. याच पुस्तकासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी अशा एका इंग्रजी शब्दाचा वापर केला होता, जो पाहता केवळ त्याचा अर्थ समजणे तर दूरच राहिले, साधा त्याचा उच्चार करणेदेखील युजर्सना कठीण झाले आहे. परिणामी, या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी युजर्सनी शब्दकोशाची मदतही घेतली. पण, काहीही फायदा झाला नाही. कारण याचा अर्थ शेवटपयर्र्त त्यांना सापडला नाही. अखेर युजर्सनी थरूर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही वापरलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीची मदत घेत आहोत’, असे खोचक ट्विट करत नेटिझन्सनी थरूर यांना लक्ष्य केले होते.
थरूर नीच माणूस; स्वामी कडाडले
दरम्यान, भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही थरूर यांच्यावर कडाडून टीका करीत ‘नीच माणूस’ अशा शब्दात त्यांचा उद्धार केला आहे. थरूर यांच्यावर आरोपपत्र दाखल आहे. मी अशा नीच माणसाविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करणार, अशा उपरोधिक स्वरात स्वामी यांनी थरूर यांच्यावर टीका केली.

Posted by : | on : 16 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (458 of 1851 articles)

Dr Mohan Bhagwat22
प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर, १५ ऑक्टोबर - जीवनात येणार्‍या अनुभवांकडे त्रयस्थपणे बघता यावे. चांगल्यात वाईट आणि ...

×