कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » यंदा ९७ टक्के पाऊस

यंदा ९७ टक्के पाऊस

►भारतीय वेधशाळेचा अंदाज,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ एप्रिल –
स्कायमॅटच्या पाठोपाठच आता भारतीय वेधशाळेनेही देशात यावर्षी मान्सूनचा पाऊस समाधानकारक राहणार असल्याचे सुखद भाकीत वर्तविले. दुष्काळाची चिंता मिटविणारी आणि बळीराजाला मोठा दिलासा देणारीच ही बातमी आहे.
जून आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या संपूर्ण कालावधीत देशात यावर्षी ९७ टक्के इतका पाऊस पडणार आहे, अशी माहिती वेधशाळेचे महासंचालक के. जी. रमेश यांनी आज सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
यावर्षी मान्सूनच्या पावसात तूट होण्याची शक्यता फारच कमी आहे. देशातील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस पडेल, असे रमेश यांनी यांनी स्पष्ट केले. मान्सूनचे देशात नेमके केव्हा आगमन होणार आहे, याबाबतची तारीख मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात आणि त्यानंतरचा अंदाज प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
९६ ते १०४ टक्क्यांच्या घरात पाऊस पडल्यास देशात मान्सून समाधानकारक असल्याचे मानले जाते. तर, ९० ते ९६ टक्क्यांच्या घरात पाऊस झाल्यास समाधानकारक पातळीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला, तसेच ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास पावसाची तूट झाली, असे मानले जाते. मान्सून समाधानकारक राहणार असल्याने देशाच्या कोणत्याही भागांमध्ये यंदा दुष्काळाचे सावट राहण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी अपेक्षाही वेधशाळेने व्यक्त केली. मान्सूनबाबतचा अंदाज वेधशाळेकडे असलेल्या मागील ५० वर्षांतील नोंदीच्या आधारे काढला जातो.
स्कायमेटचा अंदाज
काही दिवसांपूर्वी यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामानविषयक संस्थेने वर्तविला होता. यंदा मान्सूनची सरासरी समाधानकारक राहील, तसेच यात थोडाफार बदल होऊ शकतो. तथापि, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी इतका पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले होते. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि रायपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाजही स्कायमेटने वर्तवला होता.

Posted by : | on : Apr 17 2018 | Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (9 of 2161 articles)


►रेल्वे हॉटेल्स देखभाल घोटाळा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ एप्रिल - आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट आपल्या मर्जीतील खाजगी कंपनीला देऊन ...

×