ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही

राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही

►मायावतींची राजधानीत घोषणा
►दिग्विजयसिंह भाजपाचे एजंट असल्याचा आरोप
►काँग्रेस बसपाला संपवू इच्छिते,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Mayawati Pti

Mayawati Pti

काँग्रेस पक्षाशी ‘हात’मिळवणी न करता बहुजन समाज पार्टीने (बसपा) राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपला हत्ती एकट्यानेच दौडविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची औपचारिक घोषणा बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाआघाडी कमकुवत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मध्यप्रदेशमध्ये बसपा आणि काँग्रेसमध्ये आघाडी न होण्याचे खापर त्यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर फोडले आहे. दिग्विजय सिंह हे भाजपाचे एजंट आहेत, असा आरोप मायावतींनी केला. बसपा आणि काँग्रेसची आघाडी होऊ नये, असे सिंह यांना वाटते. केंद्र सरकारच्या दबावामुळे मी आघाडी करीत नाही, असा दिग्विजय सिंह यांचा आरोप खोटा असल्याचेही मायावती म्हणाल्या.
मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बाजू त्यांनी लावून धरली. आघाडीसाठी सोनिया आणि राहुल गांधी प्रामाणिक आहेत, असे एकीकडे सांगून मायावतींनी दुसरीकडे काँग्रेसवर हल्ला बोल केला. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस एकटीच भाजपाला हरवू शकते, असा काँग्रेसला गैरसमज झाला आहे. खालच्या स्तरावर काँग्रेसची स्थिती वेगळी आहे. काँग्रेसने केलेल्या चुका आणि भ्रष्टाचार जनता विसरू शकत नाही, असेही मायावतींनी यावेळी म्हटले.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसपा काँग्रेसशी आघाडी करेल का? यावर आता संभ्रम निर्माण झाला आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा बसपाने याआधीच काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यामुळे मोदी सरकार विरोधात सर्व पक्षीय महाआघाडीचे स्वप्न भंगते की काय, असा प्रश्‍न आता राजकीय पटलावर उपस्थित केला जात आहे.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (730 of 2060 articles)

Modi Man Of Earth Pti
ऑफ द अर्थ पुरस्कार प्रदान, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - स्वच्छ व हिरवेगार पर्यावरण हे सरकारी धोरणांचे मूळ असते, असे ...

×