ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

►जेटलींच्या घोषणेनंतर लगेच परिणाम
►तेल कंपन्याही करणार एक रुपयाची कपात,
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Arun Jaitley 1

Arun Jaitley 1

पेट्रोल आणि डीझेलवरील अबकारी कर दीड रुपयाने कपात करून या दोन्ही इंधनांच्या प्रती लिटर किमतीत अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी जाहीर केला. यानंतर लगेच महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी, तर डीझेल अडीच रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. गुजरात सरकारनेही महाराष्ट्राच्याच पावलावर पाऊल ठेवत पेट्रोल व डीझेल पाच रुपयांनी स्वस्त केले आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरकपात लागू होणार आहे.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या काळात पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी करात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे देशातही इंधनाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. यापासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री जेटली यांनी आज अबकारी करात अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर करतानाच, तेल कंपन्यांनाही आणखी एक रुपयाने किमतीत कपात करण्याची सूचना केली.
केंद्राचा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. आम्ही पेट्रोलच्या किमतीत सरसकट पाच रुपयांची आणि डीझेलमध्ये अडीच रुपयांची कपात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर दिली.
अनेक पर्यायांवर केला विचार
पेट्रोल व डीझेलच्या किमतीमुळे सरकार चिंतेत आहे. इंधनदरांच्या वाढत्या किमतीचा अर्थव्यवस्थेवर पडणार्‍या परिणामांना रोखण्यासाठी सरकारने अनेक पर्यायांवर विचार केला, असेही जेटली म्हणाले. दरम्यान, जेटली यांनी याच मुद्यांवर बुधवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती.
१०,५०० कोटींचा महसूल बुडणार
पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत अडीच रुपयांची कपात करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारला १०,५०० कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे आवश्यक होते. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सद्यस्थितीत महसूल आवश्यक असला, तरी देशवासीयांच्या समस्यांवर तोडगा काढणेही तितकेच महत्त्वाचे होते, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांचे आभार
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात करून देशवासीयांना दिलासा दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांचे आभार मानले. केंद्र सरकारने अडीच रुपयांनी दरकपात केली. आम्ही आमच्याकडून व्हॅटमध्ये अडीच रुपयांची कपात केली. यामुळे राज्यातील जनतेला एकूण पाच रुपयांचा फायदा होणार आहे.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (291 of 1862 articles)

Pm Modi Vladimir Putin
दिल्ली, ४ ऑक्टोबर - रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या भारत दौर्‍यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा प्रकरणाच्या कॅबिनेट समितीने ...

×