ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » राफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा

राफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
►किंमत, तांत्रिक बाबी गोपनीय ठेवणार,
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

फ्रान्ससोबतच्या राफेल व्यवहारातील संपूर्ण निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती एका सीलबंद लिफाप्यातून २९ ऑक्टोबरपर्यंत आम्हाला सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी केंद्र सरकारला दिले. तथापि, राफेल विमानाची किंमत आणि अन्य तांत्रिक बाबींची माहिती सादर करणे मुळीच अनिवार्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने आपल्या आदेशात असेही स्पष्ट केले की, आम्ही केंद्र सरकारला कुठलीही नोटीस जारी करणार नाही. कारण, ज्या दोन याचिकांवर आम्ही ही सुनावणी करीत आहोत, त्यातील भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही कदापि विचारात घेणार नाही.
राफेल लढाऊ विमानांची किंमत आणि त्यातील तांत्रिक बाबी वगळून संपूर्ण व्यवहारातील निर्णय प्रक्रियेशी संबंधित माहिती आम्हाला सादर करता येऊ शकते काय, त्यात काही आक्षेपार्ह नाही ना, अशी विचारणाही न्यायालयाने केली. यावेळी केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेले महान्यायवादी के. के. वेणुगोपाल म्हणाले की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने या व्यवहारातील सविस्तर माहिती कुणालाही देता येणार नाही. हा संरक्षण खरेदी प्रक्रियेचा भाग आहे आणि तो गुप्त ठेवणे आवश्यक आहे. यानंतर न्यायालयाने त्यांना निर्णय प्रक्रियेतील माहिती सीलबंद लिफाप्यात २९ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यात यावी, असे निर्देश देताना, या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी करण्याचे निश्‍चित केले.
राफेलच्या किमती आणि त्यातील तांत्रिक बाबी हा संपूर्ण गोपनीयतेचा भाग आहे, याची जाणीव आम्हालाही आहे आाणि म्हणूनच आम्ही त्या विशिष्ट माहितीचा आग्रह करीत नाही. याचिकाकर्त्यांनी काय आरोप केले, हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. केवळ निर्णय प्रक्रिया योग्य होती की नाही, एवढेच आम्ही आपल्या समाधानाकरिता तपासणार आहोत, असे न्यायालयाने नमूद केले. यापूर्वीच्या सुनावणीत केंद्र सरकारने या प्रकरणी दाखल दोन्ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. या जनहित याचिका नसून, केवळ राजकीय स्वार्थासाठी त्या दाखल झालेल्या आहेत आणि तसेही हा सुरक्षेचा मुद्दा असल्याने तो न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही, असेही सरकारने स्पष्ट केले होते.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (168 of 1765 articles)

Tushar Mehta
दिल्ली, १० ऑक्टोबर - केंद्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी ...

×