ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले

राफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले

राहुल गांधी यांचा आरोप,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा संबंध राफेल प्रकरणाशी जोडत काँग्रेसने आज पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला. राफेल घोटाळ्यासंदर्भातील चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना पदावरून हटविण्यात आले, तसेच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी आलोककुमार यांच्या कार्यालयावर मध्यरात्री छापा घालण्यात आला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.
आज सायंकाळी काँग्रेस मुख्यालयात तातडीने बोलावलेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोपांची बरसात केली. सीबीआय संचालकांची नियुक्ती पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षाचा नेता असलेली तीन सदस्याची समिती करत असते. त्याचप्रमाणे त्यांना असे तडकफडकी हटवता येत नाही. वर्मा यांना मध्यरात्री हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर, घटनाबाह्य तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, हा घटनेचा, सरन्यायाधीशांचा आणि विरोधी पक्षनेत्याचा तसेच देशातील कोट्यवधी लोकांचा अपमान आहे.
राफेल सौद्याची सीबीआय चौकशी होणार होती, त्यामुळे अशी चौकशी सीबीआयला करता येऊ नये म्हणून आलोक वर्मा यांना मध्यरात्री हटवण्यात आले. सीबीआयने अशी चौकशी केली असती तर राफेल व्यवहारातील भ्रष्टाचार उघड झाला असता आणि मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात ३० हजार कोटी रुपये टाकले, ही सत्यता देशालाही कळली असती, असा तर्क राहुल गांधी यांनी काढला.
सीबीआय राफेल व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार आहे, असे तुम्हाला कसे समजले, या प्रश्‍नावर नेमके उत्तर देण्याचे नाकारत, सार्‍या देशाला ते जसे कळले तसेच मलाही कळले, अशी पळवाट राहुल गांधी यांनी काढली.
सीबीआय संचालकाच्या कार्यालयावर मध्यरात्री छापा घालत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. त्यात राफेल प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे. राफेल व्यवहारातील घोटाळा दडपण्यासाठी एकामागे एक अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले, मात्र शेवटी ही चोरी पकडली जाणार आहे. देशाच्या चौकीदाराने चोरी केली आणि आता नरेंद्र मोदी पकडले जाणार हे देशाला कळून चुकले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राफेल घोटाळ्याची चौकशी झाली, तर आपण संपून जाऊ याची जाणिव मोदींनाही झाली आहे, असे ते म्हणाले.
मनोज प्रसादला पाच दिवसांची कोठडी
नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या लाच प्रकरणात मध्यस्थ राहिलेल्या मनोज प्रसादच्या सीबीआय कोठडीत विशेष न्यायालयाने आज गुरुवारी पाच दिवसांची वाढ केली. आणखी बर्‍याच गोष्टी समोर यायच्या असल्याने प्रसादच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. याच प्रकरणात सीबीआयचे पोलिस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली असून, अस्थाना यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहे.
हटवले नाही, सुटीवर पाठविले, सीबीआयचा खुलासा
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना हटविण्यात आले नाही, ते आपल्या पदावर कायम आहेत, मात्र त्यांच्याविरुद्ध आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सुटीवर पाठवण्यात आले. त्यामुळे या काळात ते आपल्या पदाची जबाबदारी सांभाळू शकणार नाही. या दरम्यान नागेश्‍वर राव सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून काम पाहतील, असा खुलासा सीबीआयतर्फे आज करण्यात आला.
दरम्यान राफेल प्रकरणाच्या चौकशीशी सीबीआयचा काहीच संबंध नाही, या प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत नव्हती. असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहे, असा आरोप या प्रवक्त्याने केला.
सीबीआयची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता कायम ठेवण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागल्या, त्या केल्या नसत्या तर सीबीआयची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता रसातळाला गेली असती. त्याचा परिणाम सीबीआय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकरणांची चौकशी करत आहे, त्यावर झाला असता. त्यामुळे सीबीआयची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागले, असे सीबीआयच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
रोज खोटे बोलणे, हाच उपक्रम : भाजपा
सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना रजेवर पाठविण्याचा अर्थ त्यांची हकालपट्टी झाली, असा काढून राहुल गांधी यांनी या घडामोडीचा संबंध थेट राफेल व्यवहाराशी जोडला. दररोज खोटे बोलणे एवढाच त्यांचा एकमेव उपक्रम राहिला आहे. काँगे्रस आता कधीच उभी होऊ शकणार नाही, याची खात्री पटल्याने निराश होऊन राहुल गांधी आणि काँगे्रस नेत्यांनी खोट्या आणि काल्पनिक गोष्टींचा आधार घेतला आहे. या देशातील जनता राहुल गांधींपेक्षाही जास्त परिपक्व आहे, असा जोरदार पलटवार भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून नागेश्‍वर राव यांची नियुक्ती करण्याच्या तसेच आपल्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयाला आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वर्मा यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेरगिरीचे कथित प्रकरण
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाची हेरगिरी करण्याच्या आरोपावरून चार जणांना आज ताब्यात घेण्यात आले. या चौघांची विचारपूस केली असता ते गुप्तचर खात्याचे अधिकारी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना नंतर सोडून देण्यात आले. या चौघांना अटक केल्याच्या वृत्ताचा दिल्ली पोलिसांनी इन्कार केला.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (420 of 1851 articles)

Essar Steel
प्रवर्तकांच्या हाती जाणार?, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - एस्सार स्टील कंपनीवर असलेले ५४,००० कोटींचे कर्ज फेडण्याची हमी या कंपनीच्या प्रवर्तकांनी ...

×