ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » राफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख

राफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख

►हवाईदलाची क्षमता वाढणार,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Air Marshal B S Dhanoa

Air Marshal B S Dhanoa

राफेल विमाने आणि एस-४०० एअर डिफेन्स प्रणाली यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद व क्षमता वाढणार आहे. त्यामुळेच मला म्हणावेसे वाटते की, राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला करार हा सरकारने घेतलेला धाडसी निर्णय आहे, असे हवाईदल प्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ यांनी केले आहे.
एकीकडे राफेल विमानांवरून देशात काँग्रेस पक्षाने राजकीय वाद पेटविला असतानाच हवाईदल प्रमुखांनी फ्रेंच कंपनी दसाँ एव्हिएशनसोबत झालेल्या कराराला योग्य ठरवले आहे. राफेल करारामधून आम्हाला अनेक फायदे मिळणार असल्याचे हवाईदल प्रमुखांनी म्हटले आहे.
राफेल विमान करार योग्य असल्याचे सांगताना हवाईदल प्रमुख धनोआ म्हणाले की, आमच्यासमोर कठीण परिस्थिती होती. त्या परिस्थिती आमच्यासमोर काही तरी सकारात्मक घडण्याची वाट पाहणे, आरपीएफला विड्रॉ करणे किंवा आकस्मिक परिस्थितीत खरेदी करणे, असे तीनच पर्याय होते. अखेर आम्ही विमान खरेदीचा निर्णय घेतला.
राफेल एक उत्तम प्रतीचे विमान असून, ते जेव्हा उपखंडात येईल, तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राफेल विमान खरेदीचा करार हा सरकारने घेतलेला एक अत्यंत धाडसी निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी हवाईदलातील घटत असलेल्या स्क्वॉड्रनच्या संख्येबाबतही हवाईदल प्रमुखांनी चिंता व्यक्त केली.
राफेल विमानांचे कौतुक करतानाच धनोआ यांनी भारतीय कंपनीच्या निवडीबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. फ्रेंच कंपनी दसाँ एव्हिएशनला आपल्या ऑफसेट भागीदाराची निवड करायची होती. त्यामध्ये सरकार आणि भारतीय हवाईदलाची कोणतीही भूमिका नव्हती, अशी माहिती धनोआ यांनी दिली. एकीकडे रिलायन्सला भागीदारी मिळवून देण्यासाठी सरकारने दबाव बनवल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असतानाच हवाईदल प्रमुखांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. एचएएल म्हणजे विलंब!
हिंदुस्थान एरोनॉटिक्ससोबत करार करूनही डिलिव्हरीमध्ये होत असलेल्या विलंबावर त्यांनी बोट ठेवले. सुखोई विमानांच्या डिलिव्हरीला तीन वर्षे उशीर झाला. जग्वार या लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीसाठी सहा वर्षे उशीर झाला आहे. एलसीए तेजस विमानाच्या डिलिव्हरीसाठी पाच वर्षे आणि मिराज २०००च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षे उशीर झाला आहे, अशी माहितीही हवाईदल प्रमुखांनी यावेळी दिली.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (206 of 1765 articles)

Aadhar Cards
सुरक्षेची चिंता होणार दूर, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - खासगी गोपनीयता आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारनेआधार ...

×