ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » राफेल विमान उत्कृष्टच!

राफेल विमान उत्कृष्टच!

►देशाने वस्तुस्थिती समजून घ्यावी : एअर मार्शल शिरीष देव,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –

Rafel

Rafel

राफेल हे वायुसेनेसाठी अतिशय उत्कृष्ट असे लढाऊ विमान असून त्यात आम्ही आवश्यक आणि आमच्या लाभाचे बदल करून घेतले आहेत. देशाने या विमानाबाबत वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे प्रतिपादन एअर मार्शल शिरीष बबन देव यांनी केले आहे.
रिपब्लिक टीव्हीसोबत बोलताना देव म्हणाले, राफेल विमानाबाबत विरोधकांनी, प्रामुख्याने राफेलच्या दराबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यावर देव यांनी सांगितले की, आधीच्या करारात ज्या बाबी नव्हत्या, त्या बाबी आम्ही आमच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार बसवून घेतल्या आहेत. किमान १५ असे बदल आम्ही या विमानात केले आहेत. हे बदल फ्रान्स वापरीत असलेल्या राफेल विमानांमध्येही नाहीत. तसेच या विमानांसोबत अनेक आधुनिक क्षेपणास्त्रे आणि अन्य उपकरणेही मिळणार आहेत. हे विमान अतिशय सक्षम आहे आणि आमची तातडीची गरज पूर्ण करणारे आहे. दोन इंजिने असलेल्या राफेलचा, जगात जी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत, त्यात समावेश होतो. हे अतिशय सक्षम असे विमान आहे आणि अनेक देशात त्याचा वापर सुरू आहे. या विमानातून एकाच वेळी शत्रूंच्या विमानांचा अचूक वेध घेणारी आणि त्यांच्या तळांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे असणार आहेत. या विमानाचे आणखी मोठे वैशिष्ट्य म्हणजे या विमानात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. या विमानात मेटिऑर हे अतिशय अत्याधुनिक असे क्षेपणास्त्र असणार आहे, जे शत्रूच्या दृष्टिक्षेपात येऊ शकत नाही. या विमानाचे इंजिन अवघ्या ३० मिनिटात बदलता येऊ शकते. सुखोई-३० विमानासाठी यासाठी आठ तास लागतात. यात वैमानिकासाठी इस्रायलनिर्मित विशेष हेल्मेट असणार आहे, जे अतिशय उष्ण अथवा शीत हवामानात, जसे लेह आणि अत्यंत उंचीवरील भागातही काम करू शकते. यासाठी उत्कृष्ट रडार, दिशानिर्देश करणारी उपकरणे आणि अन्य अत्याधुनिक सामुग्रीही बसविण्यात आली आहे. एका दिवसात या विमानाच्या पाच सॉर्टीज (उड्डाण करून परत येणे व पुन्हा शस्त्रसंभार घेऊन जाणे) करण्याची यात क्षमता आहे. अन्य विमाने फक्त तीनदा सॉर्टीज करू शकतात, याकडे देव यांनी लक्ष वेधले.
खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात संरक्षण उत्पादनांच्या मंजुरीबाबत एअर मार्शल देव म्हणाले, आधीच आम्हाला मोठ्या संख्येत स्क्वाड्रन्स हवे आहेत. राफेल खरेदीतच अनेक वर्षे निघून गेली. आणखी किती उशीर लावणार. हिंदुस्थान एरॉनॉटिक्समध्ये तेजस विमान तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रांच्या सहकार्याने भारतातच विमाने तयार होत असतील, तर या करारातील जी रक्कम खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रात येणार आहे, ती भारतातच राहणार आहे. दोन्ही क्षेत्रांच्या मदतीने जर लवकर विमाने तयार होणार असतील, तर त्यात गैर काय आहे? असे उत्तर देव यांनी दिले. आम्ही विदेशी गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे आणि येणारा पैसा भारतातच संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातच राहणार असेल तर ते आमचे धोरणच आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमानाच्या दराबाबत आरोप सुरू केले आहेत. त्याला देव यांनी दिलेले हे उत्तर आहे. सध्याच्या रालोआ सरकारने जे विमान खरेदी केले आहे, त्याची किंमत आधीच्या संपुआच्या काळात जो करार झाला होता, त्यापेक्षा कमी आहे, हे दर्शविणारी कागदपत्रे आमच्याजवळ असल्याचा दावा रिपब्लिक टीव्हीने केला आहे.
दुसरीकडे जे संरक्षणतज्ज्ञ आहेत, त्यांनीही रालोआने केलेला करार हा भारतासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी राफेल दराचा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांना कोणत्याच विरोधी पक्षाने सहकार्य केले नव्हते. राहुल गांधी यांनी या करारात फ्रान्स सरकारलाही विनाकारण ओढले. फ्रान्सच्या राष्ट्रपतींशी माझे बोलणे झाले आहे. त्यात गोपनीयता काहीच नव्हती, असे त्यांनी मला सांगितल्याचे विधान करतानाच, त्यावेळी माझ्यासोबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग होते, असे म्हणून त्यांनाही गोवले होते.
फ्रान्स सरकारने तत्काळ खुलासा करून राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले होते. डॉ. मनमोहनसिंग यांनीही आपल्या उपस्थितीबाबत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या आरोपांना कोणताही आधार नाही, हे एअर मार्शल शिरीष देव यांनी स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (254 of 1642 articles)


आठवड्यात सुनावणी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - भारत आणि फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराला आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ...

×