ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » रामजन्मभूमी-बाबरी खटल्याचा मार्ग मोकळा

रामजन्मभूमी-बाबरी खटल्याचा मार्ग मोकळा

►मशिदीतील नमाजाच्या निर्णयावर फेरविचार नाही
►सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

मशिदीत नमाज अदा करणे हा इस्लामचा अंतर्गत भाग असू शकतो काय, याबाबत १९९४ मध्ये दिलेल्या निकालावर फेरविचार करण्यास आणि हा मुद्दा मोठ्यग घटनापीठाकडे सोपविण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्पष्ट नकार दिला. या निर्णयामुळे रामजन्मभूमी-बाबरी मशीद या मुख्य प्रकरणी सुनावणी करण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबरपासून यावर नियमित सुनावणी करण्यात येणार आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नाझीर यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने २ विरुद्ध १ अशा बहुमताने आपला निकाल दिला. १९९४ मधील इस्माईल फारुकी प्रकरणात पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला निकाल आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारावर त्या वेळच्या निकालाची नव्याने समीक्षा करण्याची किंवा हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्याची काहीच गरज नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे, असा निकाल न्यायालयाने दिला.
न्या. नाझीर यांचे वेगळे मत
न्या. अशोक भूषण यांनी स्वत:चा आणि सरन्यायाधीशांचा निकाल वाचून दाखवला. घटनापीठाच्या निकालाशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत, असे न्या. भूषण यांनी स्पष्ट केले.
न्या. नाझीर यांनी मात्र या निकालाच्या विरोधात भूमिका घेतली. ते म्हणाले की, मुस्लिम धर्मातील लोकांची श्रद्धा विचारात घेऊनच मशिदीतील नमाजाचा मुद्दा निकाली काढावा लागणार आहे आणि त्यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने बोहरा मुस्लिम समाजातील मुलींच्या खतना प्रथेवर निकाल दिला. मशिदीतील नमाजाचे प्रकरण महत्त्वाचे आणि धार्मिक भावनांशी निगडित असल्याने त्यावर घटनापीठानेच निर्णय घ्यायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक निर्णय वेगवेगळ्या स्थितीत दिला जातो. १९९४ मधील निकाल वेगळ्या परिस्थितीत दिला गेला होता. मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अविभाज्य भाग नाही, या १९९४ मधील निकालाच्या काळात स्थितीत पूर्णपणे वेगळी होती. न्यायालयाचा तो निकाल धार्मिक भाष्य नव्हते, असे न्या. भूषण यांनी म्हटले.
२९ ऑक्टोबरपासून नियमित सुनावणी
न्यायालयाच्या या बहुमताच्या निकालामुळे आता रामजन्मभूमी-बाबरी मशीद या मुख्य शीर्षकावरील सुनावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबरपासून ही सुनावणी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, सरन्यायाधीश दीपक मिश्रा येत्या २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांची जागा घेणारे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे.
काय आहे इस्माईल फारुकी प्रकरण
६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी पाडण्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारने ७ जानेवारी १९९३ रोजी एक अध्यादेश जारी करून अयोध्येतील ६७ एकर जागा ताब्यात घेतली होती. याच अध्यादेशांतर्गत वादग्रस्त जमिनीचा १२०८० फुटाचा भागही ताब्यात घेण्यात आला होता. याच भागाला रामजन्मभूमी-बाबरी मशीद परिसर असे संबोधले जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला इस्माईल फारुकीने आव्हान दिले होते. धार्मिक स्थळांवर सरकार आपला अधिकार कसा दाखवू शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. त्यावर, मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अंतर्गत भाग नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.
संघाकडून स्वागत
मशिदीतील नमाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. मुख्य मुद्यावरील निकालही लवकरच येईल, असा विश्‍वास संघाने व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने येत्या २९ ऑक्टोबरपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर नियमित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सदस्यीय न्यायासनापुढेच ही सुनावणी होणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असाच आहे, असे रा. स्व. संघाने एका निवेदनात म्हटले आहे.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (93 of 1621 articles)


न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ...

×