ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिराजवळ मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील

राममंदिराजवळ मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील

►उमा भारती यांचा इशारा,
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर –

Umabharti

Umabharti

अयोध्येतील ज्या जागेला वादग्रस्त म्हटले जाते, तीच प्रभू श्रीरामांची खरी जन्मभूमी आणि तिथेच राममंदिर व्हायला हवे. हेच माझे स्वप्न आहे. जगभरात हिंदूंची ओळख सर्वाधिक सहिष्णू अशीच आहे, पण रामाच्या मंदिराजवळ मशीद बांधण्यात आल्यास हिंदू असहिष्णू झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आज रविवारी येथे विशद केली.
अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणीत माझ्यासोबत काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सहभागी व्हावे, यामुळे त्यांनी व त्यांच्या पक्षाने आजवर केलेले सर्व पाप धुवून निघतील, असे उमा भारती यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
हिंदू हा जगातील सर्वाधिक सहिष्णू समाज आहे. राममंदिराच्या बाजूला मशीद बांधण्याच्या गप्पा करून राजकीय पक्षांनी त्यांना असहिष्णू बनवू नये, असे माझे कळकळीचे आवाहन आहे. ज्या प्रमाणे मदिनात मंदिर आणि व्हॅटिकन सिटीत मशीद बांधली जाऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे अयोध्येतही रामाच्या मंदिराजवळ मशीद असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्या वाद हा जमिनीच्या तुकड्यावरून आहे, श्रद्धेसाठी नाही आणि तसेही अयोध्या हीच प्रभू रामांची जन्मभूमी आहे, हे सिद्ध झाले आहे. हा वाद जमिनीचा असल्याने त्यावर न्यायालयाबाहेर तोडगा काढला जावा. यात राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती आणि ममता बॅनर्जी यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रामजन्मभूमी आंदोलनात मी सक्रिय सहभागी होते. यासाठी माझ्यावर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांच्यावर खटलाही दाखल झाला आहे. पण, मला याची खंत नाही, तर अभिमानच वाटतो. अयोध्येतील त्याच वादग्रस्त जागेवर रामाचे मंदिर व्हायला हवे. यासाठी माझ्याकडून जर काही सहकार्याची अपेक्षा असेल, तर मी नक्कीच करेल, असे त्या म्हणाल्या.
एक दिवा रामाच्या नावाने : आदित्यनाथ
या दिवाळीत एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने लावा, अयोध्येत राममंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, अशी भूमिका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे विशद केली. राजस्थानच्या जयपूर येथे शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात आदित्यनाथ बोलत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अयोध्येत अधिक उत्सवात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीची जोरदार तयारी सुरू झाली असून, सुमारे तीन लाख दिवे लावण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मंदिराचे बांधकाम कोणीही रोखू शकत नाही : मौर्य
अयोध्येत रामाचे मंदिर बांधण्यापासून हिंदूंना या जगातील कोणतीही क्ती रोखू शकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी लखिमपूर खेरी येथे व्यक्त केले. रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी भाजपा वचनबद्ध आहे, पण सध्या हा मुद्या न्यायप्रविष्ट असल्याने मी जास्त काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (380 of 1862 articles)

Facebook1
दिल्ली, ४ नोव्हेंबर - फेसबुकवरील ८१ हजार अकाऊंट हॅक करून त्यातील डेटा अर्थात माहिती चोरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

×