ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन,
नागपूर, १९ ऑक्टोबर –

Dr Mohan Bhagwat Dasara

Dr Mohan Bhagwat Dasara

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी तातडीने संसदेत कायदा तयार करण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी नागपुरात व्यक्त केली. संघाचा नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव गुरुवारी रेशीमबाग मैदानावर उत्साहात साजरा झाला. त्यावेळी सरसंघचालक बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, तसेच महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या उद्बोधनाच्या प्रारंभी डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुनानक यांचे ५५० वे प्रकाश वर्ष आणि महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त या महापुरुषांचे कार्य, योगदान आणि त्यागाचे स्मरण करून, त्यांना आदरांजली अर्पण केली. या महापुरुषांच्या स्मरणामुळे नैतिक शक्ती जागृत होत असल्याचे ते म्हणाले.
सरसंघचालक म्हणाले, अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी देशातील कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. मंदिर उभारणीच्या सर्व सकारात्मक प्रयत्नात रा. स्व. संघाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. अयोध्येत पूर्वी मंदिर होते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, अद्यापही मंदिर उभारण्यासाठी जन्मभूमी उपलब्ध झालेली नाही. देशातील काही शक्ती न्यायालयात नवनवीन मुद्दे उपस्थित करून यासंदर्भातील ठोस निर्णय होऊ देऊ नये, यासाठी हरप्रकारे प्रयत्न करताहेत. अकारण राजकारण केले जात आहे.
देशाच्या आत्मसन्मानासाठी राममंदिराची निर्मिती गरजेचीआहे. या संदर्भात हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा पाहणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यामुळे सरकारने संसदेत कायदा संमत करून मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा.
सीमासुरक्षा
देशाच्या सीमासुरक्षेची गरज सरसंघचालकांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, कुठल्याही देशासाठी सीमांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षेसंदर्भातील चिंता व समस्या मांडण्यात आणि जागतिक सहकार्य प्राप्त करण्यात देशाला यश मिळाले आहे. परंतु, आमच्या शेजारी देशातील सत्तापरिवर्तनामुळे काही विशेष फरक पडलेला नाही. त्यांच्या छुप्या कुरापती आणि जाहीर कारवाया तशाच सुरू आहेत. त्यामुळे संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवून स्वत: सामर्थ्यवान बनणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. भारताने इतके सक्षम आणि बलशाली बनावे की, आपल्याकडे कुणालाही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमतच व्हायला नको. संरक्षणासाठी युद्धसाहित्याबाबत कुणावरही अवलंबून राहून चालणार नाही. युद्धसामुग्रीसुद्धा स्वदेशनिर्मित हवी.
शहरी नक्षलवाद
देशात फोफावणार्‍या शहरी नक्षलवादाबद्दल चिंता व्यक्त करताना डॉ. मोहनजी म्हणाले की, देशात अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. या घटनांना सुनियोजित पद्धतीने विशेष रूप दिले जाते. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. तसेच तरुणांचे चुकीच्या पद्धतीने ब्रेन-वॉश करवले जात आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे नारे बुलंद केले जातात. विशेष म्हणजे आपल्या स्वतःच्या देशाचे वातावरण बिघडवण्यासाठी सीमेपार बसलेल्या शत्रुंची मदत घेतली जाते. पाकिस्तान, अमेरिका, इटली येथून जारी होणारे संदेश आमच्या मोबाईपर्यंत पोहचवून एक प्रकारचे मनोयुद्ध सुरू आहे. अशा घटना निपटण्यासाठी प्रसंगी अधिक सजग व दक्ष राहण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यावर सोशल मीडिया उपलब्ध आहे. चांगल्या-वाईटाचा विवेक नसल्याने तरुणाई वाहवत चालली आहे. म्हणून कुटुंबातच मुलांवर योग्य संस्कार करण्याची नितांत गरज आहे.
शबरीमला
शबरीमला संदर्भात ते म्हणाले, धर्माचे कार्य समाजातील प्रथा, परंपरा, लोकमान्यता आणि श्रद्धेवर अवलंबून असते. त्यामुळे शबरीमला मंदिरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरांमध्ये परिवर्तन करण्यासंबंधीचे निर्णय घेण्यापूर्वी धर्माच्या क्षेत्रात काम करणार्‍यांचे मत विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते. ही बाब निदर्शनास आणून देत, तसे न झाल्यामुळेच याप्रकरणी असंतोषाची लाट हिंदू समाजात उसळली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आगामी निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले. मतदारांनी जाती, धर्म, पंथ, संप्रदाय अशा संकुचित स्वार्थात न पडता विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांसह सरसंघचालकांनी शस्त्रपूजन केले. स्वयंसेवकांनी नियुद्ध, दंडव्यायाम योग, योगासने आदींची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली, तर घोषपथकाने विविध रचनांचे वादन केले. सांघिक व वैयक्तिक गीतानंतर महानगर संघचालक राजेश लोया यांनी उपस्थितांचा परिचय करून देत आभार मानले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे हे पूर्ण गणवेशात याप्रसंगी उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जी. अल्फोन्स, सुमेधा सत्यार्थी, भुवन सत्यार्थी, ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. विकास महात्मे, आ. अनील बोंडे, आ. डॉ. मिलींद माने, आ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, माजी खा. अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम्, शास्त्रीय गायक उस्ताद रशीदखाँ, त्यांच्या पत्नी सुहा खान, वारकरी संप्रदायाचे राणूजी महाराज, एनडीएचे वरिष्ठ संचालक अन्वर अलीम, इंडिगो एअरलाईन्सचे उपाध्यक्ष विक्रम जोलानी, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदा, भारत मेरा घर उपक्रमांतर्गत पूवार्र्ंचलातून आलेले नागरिक, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी आदींसह विविध क्षेत्रातील अनेक गणमान्य याप्रसंगी उपस्थित होते.

Posted by : | on : 20 Oct 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (448 of 1861 articles)

Supreme Court 1
न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर - ‘मी टू’ ही चळवळ केवळ पीडित महिलांसाठी आहे. बाकी कुणीही त्याआडून आपली मते मांडणे ...

×