ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिर : प्रतीक्षा खूप झाली, हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान व्हावा

राममंदिर : प्रतीक्षा खूप झाली, हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान व्हावा

मुंबई, २ नोव्हेंबर –

Bhaiyyaji Joshi

Bhaiyyaji Joshi

राममंदिरप्रकरणी प्रतीक्षा खूप लांबली आहे. २०१० साली या मुद्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला, त्यानंतर २०११ पासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्तींचे न्यायासन याबाबत सुनावणी करत होते. मात्र नंतर ते अनिश्‍चित काळासाठी टाळले गेले. जेव्हा न्यायालयाला विचारले गेले तेव्हा ‘आमच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत’ असे उत्तर देण्यात आले. हा न्यायालयाचा अधिकार आहे. मात्र, सदर उत्तरामुळे संपूर्ण हिंदू समाजात अपमानित झाल्याची भावना आहे व ही गोष्ट समस्त हिंदू समाजासाठी वेदनादायी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर पुनर्विचार केला पाहिजे. तसेच समाजाच्या भावनेचा सन्मान केला पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी आज शुक्रवारी येथे केले.
राममंदिराचा मुद्दा कोट्यवधी हिंदुंच्या भावनांशी व श्रद्धेशी जोडलेला संवेदनशील मुद्दा आहे, त्यामुळे न्यायालयाने यावर शीघ्रतेने विचार केला पाहिजे. आम्ही राममंदिरासाठी गेली ३० वर्षे आंदोलन करीत आहोत. मात्र, आता हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने आंदोलनाची आवश्यकता नाही. अयोध्येत राम मंदिर व्हावे व त्याच्याशी संबंधित सर्व अडचणी दूर व्हाव्यात, ही हिंदू समाजाची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील भाईंदर येथील केशवसृष्टी येथे तीन दिवस चाललेल्या रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रपरिषदेत भय्याजी जोशी यांनी सदर भूमिका विशद केली.
राममंदिराबाबत कायदा आणि अध्यादेशाच्या प्रश्‍नाला उत्तर देताना भय्याजी म्हणाले, यावर केव्हा विचार करायचा हा सरकारचा अधिकार आहे. नरसिंहरावप्रणीत केंद्र सरकारने शपथपत्र दिले होते की, उत्खननात त्या भूमीवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले तर सरकार मंदिर बांधण्यासाठी साह्य करेल. सर्वोच्च न्यायालयात पुरातत्त्व विभागाने दिलेल्या पुराव्यांवरून त्या जागेवर मंदिर होते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तेथे राममंदिर बांधण्यात काही अडचण असण्याचे कारण नाही.
ते म्हणाले, राममंदिरावरून आमचा सरकारवर कोणताही दबाव नसून, परस्पर सहमतीने यावर तोडगा काढला जावा असे आमचे म्हणणे आहे. कोणतेही सरकार सहमती आणि कायदा या दोन्हीच्या संतुलनातूनच चालते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत सरकारने संयमाने न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली आहे. यातूनच सरकारचा न्यायपालिकेबद्दल असलेला आदराचा दृष्टिकोन दिसून येतो. परंतु न्यायालयानेही या मुद्याची संवेदनशीलता लक्षात घ्यावी.
शबरीमलैबद्दल बोलताना भय्याजी म्हणाले की, हा मुद्दा केवळ महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दल असेल तर आम्ही त्याचे समर्थन करतो. हिंदू धर्मात कोणतीही पूजा पती-पत्नीशिवाय पूर्ण होत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यातही भेदभाव केला जात नाही. परंतु मंदिरांचे काही नियम असतात आणि कोणताही समाज अधिकारांवर नाही, तर परंपरा आणि मान्यतांच्या आधाराने चालतो. मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे, परंतु मंदिर व्यवस्थापनाशी जोडलेल्या व्यक्तींशी चर्चा न करता जर कोणता निर्णय घेतला जात असेल तर योग्य नाही. अशा बाबींमध्ये निर्णय देताना न्यायालयाने या विषयांशी जोडलेल्या सर्व घटकांचे एकमत करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.
संघकार्यात दीडपट वाढ
संघ कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीची चर्चा करताना भय्याजी जोशी यांनी संघाच्या कार्याची समीक्षादेखील केली. ते म्हणाले की, गेल्या ६ महिन्यात ज्या गतीने आम्ही पुढे चाललो आहोत त्याप्रमाणे संघकार्यात दीड पटीने वाढ झाली आहे. आज देशातील ३५ हजार ५०० गावांमध्ये रा. स्व. संघाचे निरनिराळे प्रकल्प सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आम्ही नव्या १ हजार ४०० जागांपर्यंत पोहोचलो आहोत. शाखांची संख्याही ५५ हजार ८२५ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार २०० शाखांची वाढ झाली आहे.
एका वर्षात एक लाख स्वयंसेवक
संघाचे साप्ताहिक मिलन १७ हजार गावांमध्ये नियमित सुरू आहे. मासिक मिलनाचे कार्यही सध्या ९ हजार ठिकाणी सुरू आहे, तर ५१ हजार ठिकाणी रा. स्व. संघ कार्यरत आहे. गतवर्षीच्या तुलनेत स्वयंसेवकांची संख्याही एक लाखाने वाढली आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुका, ब्लॉक आणि १०-१५ गावांचे युनिट तयार करून संघाचे कार्य सुरू आहे. सध्या अशी ५७ हजार ६०० युनिट तयार करण्यात आली असून, यापैकी ३२ हजार युनिट्सवर प्रत्यक्षरीत्या आपण पोहोचलो आहोत. ६१ हजार गावांमध्ये ५७ हजार क्लस्टर तयार करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून आपण ३१ हजार गावांपर्यंत पोहोचलो असल्याचे ते म्हणाले.
१ लाख ७० हजार सेवाप्रकल्प
देशात सध्या रा. स्व. संघाचे १ लाख ७० हजार प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण, वनवासी आणि शहरी क्षेत्रांमध्ये हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. सध्या संघाद्वारे २५ मोठी रुग्णालये, १२ रक्तपेढ्या, वनवासी क्षेत्रात शाळा चालवल्या जात आहेत. अनेक गावांमध्ये प्राथमिक उपचाराची सेवा आणि १० हजार आरोग्यरक्षक आपली सेवा बजावत आहेत. सामान्य नागरिकांना तत्काळ सुविधा पोहोचवणे हे यामागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच महिलांसाठी २० हजार स्वयंसहायता गटदेखील चालवण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त हॉस्टेल, कोचिंग क्लाससारख्या सुविधादेखील पुरविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
अमित शाह सरसंघचालकांना भेटले
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी सकाळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली. अमित शाह सोहराबुद्दिन शेख चकमकप्रकरणी न्यायालयात हजर होण्यासाठी आले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते भायंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत गेले. तिथेच त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१३ लाख वृक्षलागवड
गेल्या वर्षी ३० हजार स्वयंसेवकांनी देशभरात १३ लाख वृक्षांची लागवड केली. पुढील काळातही असे कार्य अविरतपणे सुरू राहणार आहे. कार्यकाळी मंडळाने, जलसंधारण आणि पर्यावरणाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहत यावर येत्या काळात या क्षेत्रातही कार्य करण्यात येणार असल्याचेही भय्याजी यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (399 of 1873 articles)

Pm Narendra Modi
मध्यम उद्योजकांना दिवाळी भेट; रोजगार क्षेत्राची भरभराट होणार, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - रोजगार देणारे देशातील दुसरे सर्वांत मोठे क्षेत्र ...

×