ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » राममंदिर लवकर व्हावे : सरसंघचालक

राममंदिर लवकर व्हावे : सरसंघचालक

►गरज पडल्यास अध्यादेश काढावा
►आरक्षण, आंतरजातीय विवाहाला समर्थन
►जाती व्यवस्था हटविली जावी
►हिंदुत्वाला हिंदुइझम म्हणणे चुकीचे
►संघात सर्व जातींचे स्वयंसेवक,
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Mohan Bhagwatji

Mohan Bhagwatji

अयोध्येतील राम जन्मभूमीवर लवकरात लवकर राममंदिराची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केली. या संदर्भातील प्रश्‍नाला उत्तर देताना मोहनजी म्हणाले की, राममंदिराचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात आले तर हिंदू-मुसलमान यांच्यातील वाद संपुष्टात येईल. राममंदिर निर्मितीसाठी अध्यादेश काढण्याच्या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राममंदिरासाठी अध्यादेश काढायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. मात्र, संघाचा सरसंघचालक म्हणून माझे मत आहे की, अयोध्येत रामाचे भव्य मंदिर लवकर व्हावे. जेथे रामाचा जन्म झाला तेथे हे मंदिर व्हावे. हा कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा प्रश्‍न आहे. तेथे मंदिर होते, याचे पुरावे आढळले आहेत. या विषयाचे राजकारण केले जाऊ नये. ज्या प्रयत्नांमुळे राममंदिराचा मार्ग मोकळा होईल ते प्रयत्न करायला हवेत. या संदर्भात मुसलमानांकडे बोट दाखविले जाते तो प्रकारसुद्धा व्हायला नको. राजकीय कारणामुळेच मंदिर निर्मितीच्या कामात दिरंगाई होत आहे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्लीस्थित विज्ञान भवनमध्ये ‘भविष्यातील भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शेवटचा दिवस होता. सरसंघचालकांनी सुरुवातीचे दोन दिवस उद्बोधन केले आणि आज तिसर्‍या व शेवटच्या दिवशी उपस्थितांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नांना उत्तरे दिलीत.
शैक्षणिक धोरणात बदल
आज जगात आधुनिक शिक्षण पद्धतीचा बोलबाला आहे. असे असले तरी आपल्या देशातील शैक्षणिक धोरणात बदल करताना आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपला इतिहास यांचाही आधार घेतला जावा. हे नवे धोरण सर्वसमावेशक असावे, असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
शिक्षणामधील भारतीय मूल्य या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात आपले विचार व्यक्त करताना सरसंघचालक म्हणाले की, खाजगी क्षेत्रानेही शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. धर्माधारित शिक्षण पद्धती नसावी, मात्र मूल्याधारित शिक्षण पद्धती आवश्यक आहे. शिक्षणाचा स्तर घसरत चालला आहे, असे बोलले जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, शिक्षणाचा स्तर घसरत चालला नसून शिक्षण देणार्‍यांचा स्तर घसरत आहे, घेणार्‍यांचा नाही. सारे काही सरकारवर थोपवून चालणार नाही. नवीन शिक्षण पद्धतीची वाट पाहण्यापेक्षा आपल्या शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
हिंदी आणि इतर भाषेच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात मोहनजी म्हणाले की, इंग्रजीशी आमचे शत्रुत्व नाही. मात्र, आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपल्याला कोणत्याही भाषेला हटवायचे नसून आपल्या भाषेचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. इंग्रजीचा बागुलबुवा आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी आपल्या मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहिजे. कोणतीही एक भारतीय भाषा शिकण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. त्याबाबत कायदा करून चालणार नाही, कोणालाही सक्ती करता येणार नाही. हिंदी बोलणार्‍यांनीही दुसर्‍या प्रांतातील भाषा शिकली पाहिजे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
आरक्षण समस्या नाही
आरक्षण ही समस्या नसून त्याचे राजकारण केले जाणे, ही खरी समस्या आहे. सामाजिक विषमता दूर करून सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे, अशी व्यवस्था आपल्या संविधानाने केली आहे. संघ सामाजिक विषमतेच्या आधारावर दिल्या जाणार्‍या आरक्षणाच्या व्यवस्थेचे समर्थन करतो. आरक्षण कधीपर्यंत दिले जावे, याचा निर्णय ज्यांना ते दिले जाते त्यांनीच करायला हवा. तोपर्यंत ते कायम ठेवले पाहिजे, असेही मोहनजी म्हणाले. एससी-एसटी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत ते म्हणाले की, कायदेशीररीत्या त्याची अंमलबजावणी केली जावी मात्र त्याचा दुरुपयोग केला जाऊ नये. सामाजिक सद्भावना कायम ठेवून याबाबतच्या समस्येचे समाधान काढले गेले पाहिजे.
जाती व्यवस्था की अव्यवस्था?
संघ जाती व्यवस्थेकडे कसे बघतो, असा प्रश्‍न विचारला असता डॉ. भागवत म्हणाले की, आजही संघात विविध जातीच्या स्वयंसेवकांचा समावेश आहे. भविष्यात संघ अशी एक संघटना म्हणून समोर येईल की ज्यात सर्व जातींच्या स्वयंसेवकांचा समावेश असेल. जाती व्यवस्था म्हणणे चुकीचे आहे. जाती व्यवस्थेला हटविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. अंधारावर काठी उगारून तो जाणार नाही. त्यासाठी एक दीप लावला तरी सारे भेदभाव दूर होतील आणि संघ हेच करीत आहे, असे सांगून मोहनजी म्हणाले की, सामाजिक विषमता दूर करायला हवी. आमचा विषमतेवर विश्‍वास नाही. संघाचे काम जसजसे वाढत जाईल तसतशी संघातील अनुसूचित जाती-जमातीच्या स्वयंसेवकांची संख्या वाढत जाईल. आम्ही आपल्या स्वयंसेवकाला विचारत नाही की तू कोठून आला, तुझी जात काय? संघात असे वातावरणच नाही. आंतरजातीय विवाहाचे समर्थन करताना सरसंघचालक म्हणाले की, मनुष्य-मनुष्यात भेदभाव केला जाऊ नये. भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह स्वयंसेवकांनीच केले आहे.
महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरुषांनी बदलायला हवा, असे प्रतिपादन डॉ. मोहनजी यांनी यावेळी केले. महिलांच्या सुरक्षेबाबत संघाचा काय दृष्टिकोन आहे? गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नाही का? अशा आशयाच्या प्रश्‍नाच्या उत्तरात सरसंघचालक बोलत होते. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. किशोरवयीन मुला-मुलींच्या विकासासाठी काम केले जावे. महिलांना असुरक्षित तेव्हाच वाटते जेव्हा पुरुषांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो, असे सांगून डॉ. भागवत यांनी, महिलांनी स्वयंसुरक्षेवर भर दिला पाहिजे, असे म्हटले.
हिंदुत्वाला हिंदुइझम म्हटले जाऊ नये, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. हिंदुइझम हा चुकीचा शब्द आहे. इझम ही बंदिस्त अवस्था असते. सत्याचा सातत्याने होत असलेला शोध म्हणजे हिंदुत्व. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे त्याला हिंदुइझम म्हटले जाऊ नये.
या व्याख्यानमालेतील आजच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (295 of 1785 articles)


लाच प्रकरण, नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - ऑगस्टा-वेस्टलॅण्ड सौद्यातील मध्यस्थ व ब्रिटनचा नागरिक ख्रिश्‍चन मिशेलच्या प्रत्यार्पणाबाबत दुबईतील न्यायालयाने दिलेला निर्णय ...

×