ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राम सुतार घडवणार बाबासाहेबांचा ३५० फूट उंच पुतळा

राम सुतार घडवणार बाबासाहेबांचा ३५० फूट उंच पुतळा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –

Padmashree Ram Sutar

Padmashree Ram Sutar

दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास गती मिळू लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्यावर सोपवली आहे. बाबासाहेबांचा पुतळा ३५० फूट उंचीचा असेल.
दोन वर्षांमध्ये या पुतळ्याच्या उभारणीचे कार्य पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आंबेडकरांचा पुतळा घडवण्याचे कार्य राम सुतार यांच्या नोएडातील स्टुडिओमध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या स्टुडिओमध्ये बनवण्यात येणार्‍या डिझाईनच्या आधारे चीनमध्ये त्याचा साचा तयार करण्यात येणार आहे. या साच्याद्वारे आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा बनवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इंदू मिलमध्ये आंबेडकरांच्या २५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठीही वेगळी जागा असणार आहे. हा पुतळा सुतार यांनी पूर्वीच तयार केला आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि गुजरातमधली भरूच येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचेही काम राम सुतारच पाहत आहेत.
इंदू मिलच्या १२.४ एकर जमिनीवर ४२५ कोटी रुपये खर्च करून आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येत आहे. १४ एप्रिल २०२० पर्यंत स्मारक उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. ही जमीन पूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात होती. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही जमीन महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केली.
असे असेल स्मारक
१. बाबासाहेबांचा ३५० फूट उंचीचा पुतळा.
२. प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग.
३. बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट.
४. संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, ग्रंथालय, परिषद सभागृह. बाबासाहेबांचा जीवनपट उलगडवून सांगणारी साहित्य संपदा.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1084 of 2226 articles)


मोदींनी काढला चिमटा ►व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकाचे विमोचन, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २ सप्टेंबर - अलीकडील काळात शिस्तीने वागण्याचा सल्ला ...

×