ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य

►केंद्राची भूमिका,
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर –

Rbi

Rbi

रिझर्व्ह बँक तसेच केंद्र सरकारमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आज कायद्याच्या चौकटीतील रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा पुरस्कार केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १९३४ च्या कलम ७ नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करत केेंद्र सरकारने काही मुद्यावर रिझर्व्ह बँकेला दिशानिर्देश पत्र पाठवल्याचे समजते. त्यामुळे या दोघांमधील संबंधात तणाव आल्याचे वृत्त आहे.
रिझर्व्ह बँक कायद्याच्या परिघात रिझर्व्ह बँकेला स्वायत्तता असलीच पाहिजे. आम्ही अशा स्वायत्ततेचा सन्मान करतो. रिझर्व्ह बँक कायद्यातील तरतुदींनुसार रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता आवश्यक आणि प्रशासकीय दृष्ट्या मान्य आहे. आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी समृद्धीच्या अपेक्षेसह याचा सन्मान केला आहे, असे अर्थ मंत्रालयाने आज जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १९३४ च्या कलम ७ नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करत केद्र सरकारने आर्थिक धोरणाच्या काही मुद्यावर रिझर्व्ह बँकेला दिशानिर्देश पत्र पाठवल्याचे वृत्त आहे. सरकारच्या या निर्देशांचे पालन करणे रिझर्व्ह बँकेवर बंधनकारक झाले आहे. त्यामुळे सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
रिझर्व्ह बँक तसेच सरकार यांना आपापल्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक हित आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गरजांचे भान ठेवणे आवश्यक ठरते. काही आर्थिक मुद्यावर सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात वेळोवेळी चर्चाही होत असते. हाच निकष अन्य नियामक संस्थांनाही लागू आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात होणार्‍या चर्चेचा विषय तसेच त्याचा तपशील सरकारतर्फे कधीच जाहीर केला जात नाही, फक्त काय निर्णय झाला, तेवढेच जाहीर केले जात असते. सरकार अशा चर्चांमधून अनेक मुद्यांवरची आपली भूमिका स्पष्ट करत असते आणि काही मुद्यावर संभाव्य तोडगाही सुचवत असते. सरकार यापुढेही असेच करत राहील, असे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. सरकारने या निवेदनातून रिझर्व्ह बँकेवरची आपली अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेतेकडे दुर्लक्ष केले तर ते धोकादायक ठरेल, असे विधान नुकतेच एका व्याख्यानातून केले होते. रिझर्व्ह बँकेबाबतचे कोणतेही धोरण नियमांवर आधारित असले पाहिजे, असे आचार्य यांनी म्हटले होते. विरल आचार्य यांच्या या भूमिकेवर सरकार नाराज झाल्याचे दिसत होते. रिझर्व्ह बँक बोर्डाचे सदस्य एस. गुरुमूर्ती यांनी विरल आचार्य यांच्या या भूमिकेबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याकडे तक्रारही केली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक तसेच केंद्र सरकार यांच्यातील हा संघर्ष कोणते वळण घेतो याकडे आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (772 of 2234 articles)

Supreme Court 1
न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर - फ्रान्सकडून विकत घेत असलेल्या राफेल विमानाच्या किंमतीबाबतची माहिती मोहरबंद लिफाफ्यातून न्यायालयात ...

×