ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण •
►राहुल गांधी यांना जबरदस्त चपराक,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर –

Dassault Aviation Rafel

Dassault Aviation Rafel

राफेल लढाऊ विमानांच्या सौद्याची धग थेट फ्रान्सपर्यंत गेली असताना, राफेलची निर्मिती करणार्‍या डासॉल्ट कंपनीने आज शनिवारी मोठा खुलासा करून या व्यवहारावरून टीका करणार्‍यांची तोंडे बंद केली आहेत. या व्यवहारात आमचा भागीदार म्हणून रिलायन्स कंपनीची निवड भारत सरकारने नव्हे, तर आम्हीच केली होती, असे या कंपनीने आज स्पष्ट केले.
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी एका जर्नलला दिलेल्या मुलाखतीत, ऑफसेट भागीदाराची निवड भारत सरकारनेच केली होती, त्यात आमचा हात नाही, असे म्हटल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. यावरून वादळ उठले.
यावर राफेल तयार करणार्‍या डासॉल्ट कंपनीने म्हटले आहे की, आम्ही केवळ रिलायन्ससोबतच ऑफसेट करार केलेला नाही, तर महिन्द्र, सॅमटेल, बीटीएसएल, कायनेटीक, डेफ्सीस या कंपन्यांसोबतही करार केला आहे. सोबत आणखी १०० कंपन्यांशी ऑफसेट कराराविषयी चर्चा चालू आहे.
ओलांद यांची मुलाखत फ्रान्स भाषेत असल्याने सत्य समोर आले नसतानाही देशात राफेलवरून वादळ उठले असतानाच, या विमानांची निर्मिती करणार्‍या डासॉल्ट कंपनीनेच या सर्व टीकाकारांना सडेतोड चपराक हाणली आहे. २०१६ मध्ये राफेल विमानांची खरेदी करण्याचा सौदा झाला. मेक इन इंडियाच्या चौकटीत हा व्यवहार पूर्ण व्हावा, अशी भारत सरकारची इच्छा होती. त्यानुसार, ऑफसेट भागीदार म्हणून आम्ही स्वत:च रिलायन्सची निवड केली. हा संपूर्ण निर्णय आमचा असून, यात भारत आणि फ्रान्स सरकारची कुठेही भूमिका नाही, असे या कंपनीने आज केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रिलायन्सच्या निवडीत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप होत आहे. आम्हाला भारतातील राजकारणात काहीच रस नाही. रिलायन्सला भागीदार म्हणून निवडण्याचा निर्णय आमचाच आहे. रिलायन्सच्या नावाची शिफारस भारत सरकारने केली नव्हती. या विमानांची निर्मिती भारतात करायची असल्याने, भारतातील आघाडीची कंपनी म्हणून आम्ही रिलायन्सला प्राधान्य दिले आहे, असेही डासॉल्टने म्हटले आहे.
रिलायन्सच्या निवडीत भूमिका नाही : संरक्षण मंत्रालय
राफेल व्यवहारात फ्रान्सच्या डासॉल्ट कंपनीची भारतीय ऑफसेट भागीदार म्हणून रिलायन्स कंपनीची निवड करण्यात आम्ही कोणतीही भूमिका पार पाडलेली नाही, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने आज शनिवारी दिले.
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या फ्रान्स भाषेतील मुलाखतीवरून देशात अनावश्यक वाद निर्माण केला जात आहे. सत्यता यापेक्षा फार वेगळी आहे. रिलायन्स कंपनीची शिफारस सरकारने केली नाही, हे याआधीही स्पष्ट करण्यात आले असून, आताही आम्ही तीच भूमिका मांडत आहोत, असे मंत्रालयाने केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (273 of 1774 articles)


गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक नाही ►जेपीसी चौकशी व्हावी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २२ सप्टेंबर - फ्रान्सचे ...

×