ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » रोपवे, केबल कार देशाच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य

रोपवे, केबल कार देशाच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
►डॉपलमायर आणि वॅप्कोज कंपनीत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या,
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर –

Nitin Gadkari During A Press Conference

Nitin Gadkari During A Press Conference

रोपवे आणि केबल कार हे देशाच्या पर्वतीय, दुर्गम तसेच वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या शहरी क्षेत्राचे भविष्य आहे, यामुळे वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भृपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोमवारी केले.
पर्वतीय, दुर्गम अणि वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असलेल्या शहरी भागात रोपवे आणि केबलकार उभारण्याबाबत मेेसर्स डॉपलमायर या ऑस्ट्रियन तसेच भारत सरकारच्या वॅप्कोज या कंपनीत आज सामंजस्य करारावर हॉटेल ताज पॅलेसमध्ये स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. डॉपलमायर इंडियाचे प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सिंघल तसेच वॅप्कोजचे प्रबंध संचालक आर. के. गुप्ता यांनी नितीन गडकरी, डॉपलमायरचे अध्यक्ष मायकेल डॉपलमायर, उत्तराखंडचे मंत्री सत्पाल महाराज आणि जलसंसाधन, नदीविकास तसेच गंगासंरक्षण मंत्रालयाचे सचिव यु.पी. सिंग यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
देशाच्या वाहतूक क्षेत्राच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असा आहे. या सामंजस्य करारामुळे देशाच्या वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. बोल्व्हिया, व्हिएतनाम, स्वित्झर्लंड आणि अन्य अनेक देशांमध्ये रोपवे आणि केबलकार यशस्वी ठरल्या आहेत, असे गडकरी म्हणाले.
रोपवे आणि केबलकार या वाहतुकीच्या पर्यायी साधनामुळे देशात एका नव्या वेगवान युगाचा प्रारंभ होणार आहे. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषणमुक्त तसेच कमी खर्चाची आहे. यामुळे पर्वतीय तसेच दुर्गम भागात वाहतुकीची नवी सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे, तसेच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या शहरी भागातील समस्यांतून मार्ग काढता येणार आहे. ही सेवा इलेक्ट्रिकवर चालणार असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर आपण मोठ्या प्रमाणात खर्च करत असलेल्या परकीय चलनाचीही बचत होणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला उत्तराखंड, हिमाचलप्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमध्ये याचा उपयोग केला जाईल. प्रवाशांची सुरक्षा तसेच विश्‍वासार्हततेच्या जागतिक निकषानुसार देशात रोपवे उभारण्याचे काम या सामंजस्य करारामुळे लवकरच सुरू केले जाईल. यामुळे या भागातील पर्यटनाला गती मिळेल, त्याबरोबर रोजगारही निर्माण होऊ शकेल, असे गडकरी यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये यमनोत्री आणि केदारनाथसह १४ ठिकाणी रोपवे उभारण्याची मागणीवजा सूचना उत्तराखंडचे मंत्री सत्पाल महाराज यांनी यावेळी केली.
सामंजस्य करारामुळे आता डॉपलमायर आणि वॅप्कोज रोपवे उभारण्याबाबतचा व्यवहार्य अभ्यास करून याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतील, तसेच त्यानंतर रोपवे उभारण्याच्या काामला सुरुवात केली जाईल, असे गडकरी म्हणाले. डॉपलमायर ही रोपवे उभारणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, आतापयर्र्ंत या कंपनीने जगात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह १५ हजारावर रोपवे उभारले आहेत.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (57 of 1774 articles)

Ravishankar Prasad
प्रसाद यांचा पलटवार, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर - लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ...

×