ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » वनवासींनी संघर्ष करून हिंदू संस्कृती टिकवली

वनवासींनी संघर्ष करून हिंदू संस्कृती टिकवली

►विराट हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन,
तभा वृत्तसेवा
मुंबई, १६ एप्रिल –

Mohan Bhagwat Vijayadashami Speech 2017

Mohan Bhagwat Vijayadashami Speech 2017

जो शेवटपर्यंत लढला, पण दुष्ट शक्तींना शरण गेला नाही, तो वनवासी समाज होय. वनवासी समाजाने कायम सनातन हिंदुत्व आणि वैदिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
विश्‍व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून तळासरी येथे सुरू झालेल्या जनजाती वसतीगृह प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने डहाणू येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी सवितानंदजी महाराज, बालयोगी सदानंद महाराज, महामंडलेश्‍वर बाप्पा, अशोक चौगुले, देवकीनंदन जिंदल आदी मान्यवर उपस्थित होते.
वनवासी हा आपला बंधू आहे, पण आपण त्याला उपेक्षित ठेवले. असे करून चालणार नाही. आपल्या मुलाबाळांना, उर्वरित समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत हे संचित पोहोचविले पाहिजे. परस्परांतील एकता जपली पाहिजे. त्यांना प्रगतीची संधी दिली पाहिजे. स्वत:च्या उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा आणि आयुष्यातील एक तृतीयांश वेळ या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, तर लवकरच हा समाज मुख्य प्रवाहात येईल, असा विश्‍वासही डॉ. भागवत यांनी व्यक्त केला.
समाजातील एकजूट कायम राहिली तर अनेकांची स्वार्थाची दुकाने लवकरच बंद होतील. गोड बोलून, आपला कळवळा दाखवणारी आणि धर्मांतर करणारी ही मंडळी मायावी आहेत. दोन बोक्यांच्या भांडणात लोणी खाऊन जाणारी ही माकडाची प्रजात आहे. अशा लोकांपासून आपण सजग राहणे आवश्यक आहे, असा इशारा देतानाच, सरसंघचालकांनी तळासरी प्रकल्पाने असे अनेक सजग कार्यकर्ते तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
भाषा, प्रांत, जातीची ओळख सांगताना आपण हिंदू असणे ही मुख्य ओळख विसरत चाललो आहोत. आपल्या आयुष्याच्या प्रवासातील हिंदू असणे हे महत्त्वाचे जंक्शन आहे. आपल्यासारख्या पाथिकांना हे जंक्शन सापडू नये म्हणून, अनेक जण धडपडत आहेत. भारतात हिंदुत्वाचे स्मरण कोणाला होऊ नये, यासाठी मेकॉलेपासून अनेकांनी प्रयत्न केले आहेत. सध्या त्याचाच कित्ता ठराविक मंडळी गिरवत आहेत. त्यांच्यापासून दूर राहणे आणि हिंदू ही ओळख जपण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
सुमारे ६० हजार उपस्थिती असणार्‍या या विराट हिंदू संमेलनाला पालघर जिल्ह्याच्या सुदूर वनवासी भागांतून मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ‘वन-जन गाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सरसंघचालकांनी विराट हिंदू संमेलनानंतर तळासरी येथील ५० वर्षे पूर्ण करणार्‍या प्रकल्पाला भेट दिली
मंदिरे आपल्या अस्तित्वाची ओळख
अयोध्येतील राम मंदिर या संवेदनशील विषयावर डॉ. भागवत म्हणाले की, राममंदिर उद्ध्वस्त करणारा भारतातील मुस्लिम समाज नव्हता. भारतीय नागरिक असे करूच शकत नाहीत. परकीय शक्तींनी भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली, पण आज आपण स्वतंत्र आहोत. जे उद्ध्वस्त आहे, ते पुन्हा उभे करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण ही केवळ मंदिरे नव्हे, तर आमच्या अस्तित्वाची ओळख आहेत. राम मंदिर उभे राहिले नाही, तर आमच्या संस्कृतीचे मूळ कापले जाईल. मंदिर जिथे होते, तिथेच ते उभे राहणार, यात शंकाच नाही.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (774 of 2092 articles)


वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ एप्रिल - काँग्रेसच्या नेत्यांनी भगवा आतंकवाद शब्दाचा वापर करून देशातील हिंदूंचा अपमान केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या ...

×