ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » वरवरा राव नक्षल्यांचे मार्गदर्शक

वरवरा राव नक्षल्यांचे मार्गदर्शक

►नक्षलवादी कमांडरचा दावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Varvara Rao

Varvara Rao

शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी देशातील विविध भागांमधून पाच जणांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. हे पाचही जण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नजरकैदेत आहेत. त्यापैकी एक असलेले लेखक आणि कवी वरवरा राव यांचे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा दावा प्रत्यार्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे. नक्षलवादी वेट्टी रामा याने वरवरा राव यांचा शहरी जाळे सांभाळण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती तपास अधिकार्‍यांना दिली असल्याचे कळते.
एका वृत्तानुसार, रामा याने दिलेल्या माहितीमध्ये त्याने २००७ ते २०१८ पर्यंत अनेक लोकांना नक्षल चळवळीमध्ये भरती केले आहे. तसेच कमांडरचे प्रशिक्षणही दिले आहे. नक्षल चळवळीशी जोडला जात असताना मी १६-१७ वर्षांचा होतो. १९९५ मध्ये नक्षल चळवळीमध्ये सहभागी झालो. त्यानंतर जवळपास २३ वर्षे जंगलात काढल्याचेही त्याने म्हटले आहे.
यावेळी रामा याला शहरी भागातील नक्षलवादाबाबत विचारले असता त्याने केंद्रीय समितीचे नेते, प्रमुख नेते आणि पत्रकार यासाठी मदत करत असल्याचा खुलासा केला. तसेच वरवरा राव आणि काही पत्रकारांसारख्या लोकांनी पुढे येत शहरी नेटवर्कसाठी मदत केल्याचे सांगितले. वरवरा राव यांनी चकमकींमध्ये मारल्या जाणार्‍या कॉम्रेडांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. या काळात त्यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले. आम्ही संघटनेच्या मजबुतीसाठी आणि सदस्यांसाठी काम केले. मात्र, वरवरा राव यांची अटक आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रत्यार्पणामुळे संघटना कमकुवत बनत चालली असल्याचेही रामा याने सांगितले. रामा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिल्याचेही पोलिसांकडून कळते.
३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी याआधीच शहरी नक्षलवादाशी संबंधित पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी २८ ऑगस्टला कवी वरवरा राव यांना हैदराबाद येथून, इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा यांना दिल्लीतून, मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद येथून व व्हर्नोन गोन्साल्विसला मुंबई, तर अरुण फरेराला ठाणे येथून अटक करण्यात आली होती.
यानंतर देशभरात टीका होऊ लागली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पाच जणांना त्यांच्याच निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (296 of 1770 articles)


दिला होता इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याने स्विस ...

×