ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » विधानसभा निवडणुकांचा बिगुल

विधानसभा निवडणुकांचा बिगुल

►छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान
►मध्यप्रदेश, मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला
►राजस्थान, तेलंगणात ७ डिसेंबरला
►पाचही राज्यांमध्ये ११ डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर –

Electioncommission Building1

Electioncommission Building1

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने आज शनिवारी येथे केली. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात तर मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला, तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. पाचही राज्यांतील मतमोजणी मात्र एकाच दिवशी म्हणजे ११ डिसेंबरला होणार आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्याबरोबर या पाचही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज एका भरगच्च पत्रपरिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली. यावेळी निवडणूक आयुक्तद्वय अरोरा आणि अशोक लवासा उपस्थित होते. या पाचही राज्यात ईव्हीएमद्वारे मतदान होणार असून, व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे, असे रावत यांनी सांगितले.
छत्तीसगड हे नक्षलप्रभावित राज्य असल्यामुळे उमेदवार तसेच मतदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या राज्यात दोन टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. या सर्व राज्यात मतदान सुरळीत पार पडावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेची चोख व्यवस्था राहणार असल्याचे रावत म्हणाले. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा २८ लाख राहणार असून, मिझोरामध्ये २० लाख असल्याचे रावत यांनी सांगितले.
छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या १८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला तर दुसर्‍या टप्प्यात विधानसभेच्या ७२ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर
आयोगाने आज कर्नाटकातील शिमोगा, बेल्लारी आणि मांड्या या लोकसभेच्या तीन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांचीही घोषणा केली.
राजकीय दबाव नाही
निवडणूक आयोगावर सरकारचा कोणाताही दबाव नसल्याचे तसेच निवडणूक आयोग स्वायत्ततेनुसार आपले सर्व निर्णय घेत असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात रावत यांनी सांगितले. काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणुकीची घोषणा करण्याबाबतच्या पत्रपरिषदेची वेळ बदलावी लागली, यात कोणत्याही राजकीय दबावाचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे रावत यांनी अन्य एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.
आयोगाची यंत्रणा सज्ज
पाचही राज्यातील निवडणूक खुल्या आणि निष्प:क्ष वातावरणात घेण्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज असल्याचे तसेच यासाठी निवडणूक आयोगाजवळ नवीन ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन पुरेशा संख्येत असल्याचा दावा त्यांनी केला.
छत्तीसगड : एकूण जागा ९०
पहिला टप्पा : १८ जागा
निवडणूक अधिसूचना : १६ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तिथी : २३ ऑक्टोबर
उमेदवारी अर्जाची छाननी : २४ ऑक्टोबर
माघार घेण्याची अंतिम तिथी : २६ ऑक्टोबर
प्रत्यक्ष मतदान : १२ नोव्हेंबर
दुसरा टप्पा : ७२ जागा
निवडणूक अधिसूचना : २६ ऑक्टोबर
अर्ज भरण्याची अंतिम तिथी : २ नोव्हेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी : ३ नोव्हेंबर
माघार घेण्याची अंतिम तिथी : ५ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान : २० नोव्हेंबर
मध्यप्रदेश (२३०), मिझोराम (४०)
निवडणूक अधिसूचना : २ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची अंतिम तिथी : ९ नोव्हेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी : १२ नोव्हेंबर
माघार घेण्याची अंतिम तिथी : १४ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान : २८ नोव्हेंबर
राजस्थान (२००), तेलंगणा (११९)
निवडणूक अधिसूचना : १२ नोव्हेंबर
अर्ज भरण्याची अंतिम तिथी : १९ नोव्हेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी : २० नोव्हेंबर
माघार घेण्याची अंतिम तिथी : २२ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान : ७ डिसेंबर

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (44 of 1626 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचा काँगे्रसवर जोरदार हल्ला ►सोशल मीडिया, टीव्हीवरच व्यक्त होते का चिंता, नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर - केंद्र सरकारने पेट्रोल ...

×