ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » विरोधी महाआघाडीतील खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहोचवा : अमित शाह

विरोधी महाआघाडीतील खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहोचवा : अमित शाह

►भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे थाटात उद्घाटन,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर –

Amit Shah Bjp National Meet September 2018

Amit Shah Bjp National Meet September 2018

भाजपाच्या विरोधात तयार होत असलेल्या विरोधकांच्या महाआघाडीतील खोटारडेपणा, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा तसेच विविध मुद्यांवर संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडावा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे केले.
राजधानी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन करताना अमित शाह बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भाजपाविरोधात काँग्रेसच्या पुढाकाराने तयार होत असलेल्या महाआघाडीतील सहभागी प्रत्येक पक्षाला कोणत्या न कोणत्या निवडणुकीत भाजपाने पराभूत केले आहे. भाजपासमोर कोणतेही आव्हान अभे करण्याची ताकद या महाआघाडीत नाही, त्यामुळे या महाआघाडीचा भाजपाला कोणताच धोका नाही, असे अमित शाह म्हणाले.
काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी ‘मेक इन इंडिया’ घडवत असताना काँग्रेस पक्ष मात्र ‘ब्रेक इन इंडिया’ करीत आहे, देशात फूट पाडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या एका विधानाचा उल्लेख करीत अमित शाह म्हणाले की, मनमोहनसिंग काँग्रेसचे आदेश पाळत असतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे म्हणजे भाजपाचे नेतृत्व करीत असतात, हा मोदी आणि मनमोहनसिंग यांच्यातील फरक आहे.
आर्थिक तसेच अन्य मुद्यांवर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम् तसेच अन्य काँग्रेस नेते जनतेते संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न करीत आहे, त्याला भाजपा कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीच्या आधारे आव्हान द्यावे, असे आवाहन शाह यांनी केले.
मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या काळातील उपलब्धी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे आवाहन करीत शाह म्हणाले की, देशातील १९ राज्यांत भाजपाची सरकारे आहेत, या ठिकाणी भाजपाची कामगिरी निश्‍चितच चांगली राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यात अ‍ॅण्टिइन्कमबन्सीचा फायदा भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे २०१४ पेक्षाही जास्त बहुमताने २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपा जिंकेल, असा विश्‍वास शाह यांनी व्यक्त केला.
भाजपा हा कार्यकर्ताधिष्ठित पक्ष आहे, त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा सर्व निवडणुका संघटनेच्या बळावरच लढवल्या जातील. सत्ता नसलेल्या राज्यात पक्षाची कामगिरी सुधारण्याचे आव्हान कार्यकत्यार्र्नी स्वीकारले पाहिजे. निवडणुका होत असलेल्या राज्यात मतदार यादीच्या कामाकडे, त्यात काही गैरप्रकार तर होत नाही ना याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवण्याचे आवाहनही शाह यांनी केले.
आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) वरून उद्भवलेल्या वादाचा उल्लेख करीत अमित शाह म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ९ बैठकांमध्ये पारित राजकीय ठरावात आसाममधील परिस्थितीचा तसेच एनआरसीचा उल्लेख करण्यात आला होता, त्यामुळे हा मुद्दा आमच्यासाठी नवीन नाही.
अफगाणिस्तान, बांगला देश तसेच पाकिस्तानमधील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन तसेच अन्य कोणीही शरणार्थी म्हणून भारतात आश्रय मागत असेल तर त्याला आश्रय दिला पाहिजे, याचा शाह यांनी पुनरुच्चार केला. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनाचा शाह यांनी आपल्या भाषणात सविस्तर आढावा घेतला. यात शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा प्रामुख्याने समावेश होता.
केरळमधील पूरग्रस्तांसाठी भाजपाने आतापर्यंत चार रेल्वेगाड्या भरून मदत सामग्री पाठवली आहे, याचा उल्लेख करत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा कार्यकर्त्यानी संवेदनशील असले पाहिजे, त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असे आवाहन शाह यांनी केले.
अमित शाह यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केलेल्या भाषणाची माहिती भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी नंतर पत्रपरिषदेत दिली. यावेळी भाजपा माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलुनी, सहप्रमुख संजय मयुख तसेच भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव
अमित शाह यांनी आपल्या भाषणात भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा तसेच भारतीय राजकारणात त्यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. वाजपेयी यांच्या योगदानाचे तसेच कर्तृत्वाचे वर्णन करण्यास माझ्याजवळ शब्द नाही, असे अमित शाह म्हणाले. वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणारी नाही, असे शाह म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनुपस्थितीत होत असलेली भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे, असे शाह म्हणाले. वाजपेयी यांच्या कार्यकाळात ईशान्य भारताच्या विकासासाठी तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, याकडे शाह यांनी लक्ष वेधले.
तीन राज्यांची निर्मिती तसेच पोखरणचा अणुस्फोट ही वाजपेयी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे, असे शाह म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांना प्रारंभी श्रद्धांजलीही वाहण्यात आली. सदैव अटल असा उल्लेख असणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे फुलांनी तयार केलेले होर्डिंग्ज बैठक परिसरात सर्वत्र लावण्यात आले होते.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (677 of 1862 articles)

Rbi Reserve Bank Of India
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर - नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश ...

×