ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द

विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द

►सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिला आणि ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात असलेले भारतीय दंड विधानातील १५८ वर्षे जुने कलम ४९७ बेकायदेशीर ठरवून ते रद्द केले. महिलांना पतीची खाजगी संपत्ती समजणे आणि त्यांच्या वैयक्तिकतेवर आघात करणे घटनेला अनुसरून नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरविणारे भादंवितील कलम ४९७ रद्दबातल ठरविणारा निर्णय एकमताने घेतला. महिलांच्या समानतेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारे हे कलम आहे, असे घटनापीठाने आपल्या निकालात नमूद केले.
पती हा पत्नीचा मालक नाही. स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहेत. महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी ८ ऑगस्ट रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
सामाजिकदृष्ट्या चूकच
स्त्री किंवा पुरुषांचे विवाहबाह्य संबंध कायद्याच्या परिभाषेत गुन्हा ठरविता येणार नाही, पण हे संबंध सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहेत. विवाहबाह्य संबंध हे घटस्फोट मागण्याचा आधार ठरू शकतात. तसेच अशा संबंधात जोडीदारापैकी एक आत्महत्या करीत असेल, तर आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लैंगिक पसंतीचा महिलांना अधिकार
मी, तू आणि आम्ही हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे मत सरन्यायाधीशांनी नोंदविले. भादंविचे कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे. महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा. समाजाच्या इच्छेनुसार महिलांना विचार करण्यास सांगता येऊ शकत नाही. संसदेनेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा मंजूर केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले, तर हा कायदा मनमानी करणारा. स्त्रियांची मानहानी करणारा आणि लैंगिक पसंती रोखणारा आहे, त्यामुळेच तो घटनाबाह्य आहे. लग्नानंतरही स्त्रियांना लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही, असे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले.
सरकारची भूमिका
भादंवितील कलम ४९७ गुन्हा न ठरविल्यास विवाह संस्थांमध्ये वादळ निर्माण होईल. विवाहबाह्य संबंधाना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढल्यास विवाहाचे पावित्र्य संपुष्टात येईल आणि समाजात तणाव निर्माण होईल. तसेच विवाह संस्थांमध्ये वादळं येतील. या कलमांमुळेच देशातील विवाहसंस्था टिकून आहेत, अशी भूमिका केद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात मांडली होती.
व्यभिचार कायदा काय आहे?
विवाहित महिलेशी तिच्या पतीच्या सहमतीशिवाय दुसर्‍या विवाहित पुरुषाने शारीरिक संबंध ठेवणे व्यभिचाराच्या कक्षेत येते. भादंविच्या कलम ४९७ नुसार दोषी विवाहित पुरुषाविरुद्ध व्यभिचाराची तक्रार दाखल होऊ शकत होती. केवळ पुरुषालाच दोषी मानणार्‍या आणि विवाहित महिलेला दुष्कर्माची शिकार अर्थात् पीडित मानणारा कायदा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका इटलीत राहणार्‍या भारतीय नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. जोसेफ शाईन असे याचिकाकर्त्याचे नाव असून तो मूळ केरळचा रहिवासी आहे.
वडिलांचा निकाल ३३ वर्षांनी मुलाने बदलला
व्यभिचाराला गुन्हा ठरविता येणार नाही, निकाल देणार्‍या न्यायासनात असलेले न्या. डी. वाय. उर्फ धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत आगळाच योगायोग घडला आहे. ३३ वर्षांपूर्वी धनंजय चंद्रचूड यांच्या वडिलांनी म्हणजे तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांनी व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम ४९७ कायम ठेवले होते. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्याच वडिलांनी दिलेला निकाल ३३ वर्षांनंतर बदलला.
मग तिहेरी तलाक गुन्हा कसा? : असदुद्दीन ओवैसी यांचा सवाल
विवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता गुन्हा ठरत नाही, तर तीन तलाक तरी गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवाल करतानाच तीन तलाकचा अध्यादेश हा फ्रॉड असून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पाहिजे, असे मत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून व्यक्त केले आहे.
आधी कलम ३७७ आणि आता कलम ४९७ अवैध घोषित करण्यात आले. मात्र, तीन तलाक कायद्यात दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काय न्याय आहे? आता भाजपा काय करेल, असा सवालही त्यांनी केला आहे.
तीन तलाकला गुन्हा मानणे चुकीचे आहे. कारण इस्लाममध्ये निकाह हा करार आहे. आपला समाज पितृसत्ताक आहे. मग, स्त्रियांची मदत कोण करेल? जर पती तुरुंगात असेल तर पत्नीने त्याची वाट का पाहावी? सर्वोच्च न्यायालयानेही तीन तलाकला अवैध ठरवले नाही, असे सांगतानाच भाजपाने सर्वोच्च न्यायालयाकडून काही शिकले पाहिजे. त्यांनी तीन तलाकचा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (243 of 1770 articles)

Pmnarendramodi
राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ ...

×