ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » व्हॉटस अ‍ॅपवर आरोप निश्‍चिती!

व्हॉटस अ‍ॅपवर आरोप निश्‍चिती!

►सर्वोच्च न्यायायाचा संताप, हा कसला विनोद?,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ९ सप्टेंबर –

Whatsapp Logo

Whatsapp Logo

न्यायालयाचे कामकाज हे न्यायाधीशांच्या कक्षातच होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, अलीकडेच एका प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयही आश्‍चर्यचकित आणि संतप्त झाले. कारणही तसेच आहे. झारखंड येथील विशेष न्यायालयाने चक्क व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आरोप निश्‍चिती करून खटल्याचा मार्ग मोकळा केला!
आपल्या देशातील कोणत्या कायद्यात अशा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे, तुम्ही केलेला हा कोणत्या प्रकारचा विनोद आहे, असा संतप्त सवाल न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने उपस्थित केला.
२०१६ मधील दंगल व जाळपोळ प्रकरणात आरोपी असलेले झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव आणि त्यांची आमदार पत्नी निर्मला देवी यांचे हे प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाही गेल्या वर्षी जामीन मंजूर करताना, भोपाळमध्येच मुक्कामी राहण्याची आणि न्यायालयीन खटल्यातील उपस्थिती वगळता, झारखंडमध्ये पायही न ठेवण्याची अट ठेवली होती. या दाम्पत्याने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला असे सांगितले की, विशेष न्यायालयाने आमच्यावर गेल्या १९ एप्रिल रोजी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आरोप निश्‍चित केले आहेत. आम्ही या प्रकारावर आक्षेप घेतला, पण न्यायालयाने आमचे काहीच ऐकून घेतले नाही.
त्यांनी दिलेल्या माहितीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि झारखंडमध्ये नेमके काय सुरू आहे. अशा प्रकारची आरोप निश्‍चित कदापि मान्य केली जाणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेचा असा अपमानही आम्ही सहन करणार नाही. न्यायाशी केलेली ही केवळ एक थट्टा आहे, असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. आमच्यावरील खटला हजारीबाग येथून दिल्लीला वर्ग करण्यात यावा, अशी विनंती या दाम्पत्याने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकारला नोटीस जारी केली आणि दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी झारखंड सरकारची बाजू मांडताना वरिष्ठ वकिलांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने साव यांना भोपाळमध्येच राहण्याचा आदेश दिला असतानाही, त्यांनी अनेकदा या आदेशाचे उल्लंघन केले आणि झारखंडमध्येही गेले. आरोप निश्‍चितीची प्रक्रिया त्यांच्यामुळेच ताटकळत आहे. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. आरोपींनी आदेशाचे उल्लंघन केले, ही जर मूळ समस्या असेल, तर त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी तुम्ही वेगळा अर्ज सादर करायला हवा होता. कायद्याचे पालन न करणार्‍या लोकांविषयी आम्हाला कुठलीही सहानुभूती नाही, ही बाब आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (357 of 1774 articles)

Amit Shah Bjp National Meet September 2018
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे थाटात उद्घाटन, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, ८ सप्टेंबर - भाजपाच्या विरोधात तयार होत असलेल्या विरोधकांच्या महाआघाडीतील खोटारडेपणा, ...

×