ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले

शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले

►लैंगिक आधारावर भक्तीचा अधिकार नाकारता येत नाही
►सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल,
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

केरळच्या शबरीमला येथील स्वामी अयप्पा मंदिराचे दार सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले करणारा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला. परमेश्‍वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. लैंगिक आधारावर तो नाकारता येणार नाही. विशिष्ट वयोगटातील महिलांकरिता मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय स्त्री-पुरुष समानतेच्या सिद्धांताविरोधात आणि हिंदू महिलांवर अन्याय करणारा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला आहे.
धर्म हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे आणि तो स्वत:ला परमात्म्याशी संलग्न करीत असतो, असा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला. न्या. नरिमन, न्या. चंद्रचूड आणि न्या. खानविलकर यांनी सरन्यायाधीशांच्या मताचे समर्थन केले, तर या घटनापीठात एकमेव महिला असलेल्या न्या. इंदू मल्होत्रा यांनी या बहुमताच्या निकालाला विरोध दर्शविला. हा धार्मिक स्वरूपाचा मुद्दा असून, देशात धर्मनिरपेक्षतेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी त्याचा अशा प्रकारे संबंध जोडला जाऊ नये, असे मत न्या. मल्होत्रा यांनी व्यक्त केले. सतीसारख्या सामाजिक कुप्रथेशी संबंधित मुद्दे वगळता, कोणती धार्मिक प्रथा कायम ठेवायची आणि कोणती रद्द करायची, हा निर्णय न्यायालयांनी घ्यायला नको. समानतेचा अधिकार आणि स्वामी अयप्पाची पूजा करण्याचा अधिकार यांची सरमिसळ केली जाऊ नये. या प्रकरणातील मुद्दा केवळ शबरीमला मंदिरापुरता मर्यादित नसून, देशातील अन्य प्रार्थनास्थळांवरही त्याचे प्रतिकूल परिणाम उमटतील, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्या म्हणाल्या.
म्हणून होती प्रवेशबंदी
शबरीमला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रह्मचारी मानले जाते. शबरीमला यात्रेच्या आधी ४१ दिवस कडक व्रत करण्याचा येथे नियम आहे. मासिक पाळीमुळे युवा महिला हे व्रत करू शकत नाहीत आणि म्हणूनच १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
८०० वर्षांनंतर मिळाला पूजेचा अधिकार
या मंदिरात गेल्या ८०० वर्षांपासून १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना पूजा करण्याचा अधिकार नव्हता. मंदिरात पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी असंख्य याचिका गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात दाखल होत्या. केरळ सरकारनेही महिलांची बाजू घेणारी भूमिका अनेकदा न्यायालयात विशद केली आहे. आज न्यायालयाच्या निकालामुळे उशिरा का होईना, महिलांना न्याय मिळाला आहे.
निराशाजनक : मंदिर प्रशासन
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे, पण आम्ही न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून सर्व वयोगटातील महिलांसाठी मंदिराचे दार खुले करणार आहोत, अशी प्रतिक्रिया शबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू यांनी दिली.
मंदिर प्रशासनाची भूमिका
मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रह्मचारी मानले जातात, त्यामुळेच १० ते ५० वयोगटातील मुली व महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्याचा नियम तयार केल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे होते. हे भेदभावाचे प्रकरण नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, अशी विनंतीही प्रशासनाने केली होती. पण, न्यायालयाने प्रशासनाचे सर्व दावे खोडून काढले. सर्वांना भक्तीचा अधिकार आहे आणि तो लैंगिक आधारावर नाकारला जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीशांनी आपल्या निकालात स्पष्ट केले.
असा आहे निकाल
स्वामी अयप्पा कोणत्या दुसर्‍या धर्माचे किंवा पंथाचे देव नाही. ते हिंदूंचे देव आहेत आणि हिंदू महिलांना त्यांची पूजा करण्याचा अधिकार आहे : सरन्यायाधीश
मंदिरात महिलांना प्रवेशबंदी घटनेतील २५ आणि २६ या दोन्ही कलमांचे उल्लंघन करणारी आहे : न्या. नरिमन
महिलांना पूजेचा हक्क नाकारण्यासाठी धर्माचा वापर होऊ शकत नाही. ही बाब मानवी प्रतिष्ठेला अनुसरून नाही : न्या. चंद्रचूड
भारतात विविध धर्मातील लोक आपल्या परंपरा पार पाडत असतात. प्रत्येकांना आपल्या धार्मिक विश्‍वासानुसार आपल्या प्रथा पार पाडण्याचा अधिकार असावा : न्या. इंदू मल्होत्रा

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (89 of 1626 articles)

Justice Indu Malhotra
प्रकरणी न्या. इंदू मल्होत्रा यांची भूमिका, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर - केरळातील जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याची ...

×