ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » शस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण

शस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण

►भूदल प्रमुख बिपीन रावत यांची स्पष्टोक्ती,
नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर –

Bipin Rawat

Bipin Rawat

रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्याने अमेरिका भारतावर प्रतिबंध लादण्याची शक्यता वर्तवली जात असताना भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी, शस्त्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण असून, यापुढेही रशियाकडून कामोव्ह हेलिकॉप्टर आणि इतर शस्त्रास्त्र यंत्रणा खरेदी करण्यास भारत उत्सुक असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारत व रशियाने शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे अमेरिका काट्सा कायद्यांतर्गत भारतावर प्रतिबंध लादण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कायद्याचा मूळ हेतू रशिया, इराण आणि उत्तर कोरियाला रोखण्याचा आहे.
अमेरिकेने दिलेल्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करीत भारत-रशियाने हा करार केला. जनरल बिपीन रावत शनिवारी रात्री रशियाच्या सहा दिवसीय दौर्‍यावरून परतले. त्यांनी या दौर्‍यादरम्यान रशियन सैन्य अधिकार्‍यांसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी चर्चा केली.
भारतीय सैन्यासोबत सहकार्य वाढवण्यास रशिया उत्सुक आहे. भारतीय सैन्य सशक्त आहे. आपल्या धोरणात्मक वैचारिक प्रक्रियेनुसार जे योग्य आहे, त्यासाठी उभे राहण्याची क्षमता भारतीय सैन्यात असल्याची जाणीव रशियाला असल्यानेच ते सहकार्य वाढवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.ते जनरल के. व्ही. कृष्णा राव यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलत होते.
ज्या देशाने रशियावर निर्बंध लादले त्या देशाकडे भारत झुकत असल्याचे दिसत आहे आणि रशियासोबत क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा करार केल्यास भारतावरही प्रतिबंध लादण्याचा इशारा देण्यात आला, असा प्रश्‍न रशियाच्या एका अधिकार्‍याने विचारल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याला भारतावर प्रतिबंध लादले जातील याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, शस्त्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण असल्याचे त्याला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
काही तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आम्ही अमेरिकेसोबत आहोत. पण, आमचे धोरण स्वतंत्र आहे, असे त्यांना आश्‍वस्त केले, असेही त्यांनी सांगितले.
आपण प्रतिबंधाबाबत चर्चा करीत आहोत. तुम्ही प्रतिबंधाबाबत प्रश्‍नही विचारत आहात. भविष्यात दोन्ही देशांवर अमेरिका प्रतिबंध लादू शकते या वस्तुस्थितीची जाणीव असतानाही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करीत आहेत, असेही रशियन अधिकार्‍याला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीच्या पुढे जात भारत रशियाकडून कामोव्ह हेलिकॉप्टर आणि इतर शस्त्रास्त्र यंत्रणाही घेण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (35 of 1621 articles)

Rajnath Singh 1
७ ऑक्टोबर - केंद्रीय सुरक्षा पथकाच्या अलिकडच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ते दिवस दूर ...

×