ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » शहरी नक्षल्यांची अटक राजकीय नाही, एसआयटीलाही ना

शहरी नक्षल्यांची अटक राजकीय नाही, एसआयटीलाही ना

►सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
►नजरकैदेला मुदतवाढ,
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पाच जणांना करण्यात आलेली अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप करणार्‍या कथित मानवी हक्क कार्यकर्त्यांना (म्हणजेच शहरी नक्षल्यांना) सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी जोरदार चपराक दिली. अटकेची कारवाई राजकीय नाही, असे स्पष्ट करताना, या प्रकरणी विशेष तपास पथक अर्थात् एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. सोबतच, त्या पाचही जणांची नजरकैद आणखी चार आठवड्यांनी वाढवली.
महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईत आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि या अटकेचा तपास करण्यासाठी एसआयटीही गठित करणार नाही, असा निकाल सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने दोन विरुद्ध एक अशा बहुमताने दिला. सोबतच, गेल्या २९ ऑगस्टपासून त्यांच्याच घरात नजरकैदेत असलेले वरवरा राव, अरुण फरेरा, वेर्नान गोन्सालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या पाचही जणांच्या नजरकैदेची आणखी चार आठवड्यांनी वाढवली. या काळात आरोपी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आमच्या अटकेची चौकशी नेमक्या कोणत्या तपास संस्थेमार्फत व्हायला हवी, याची निवड करण्याचा अधिकार आरोपींना मुळीच नाही. अटकेची ही कारवाई केवळ राजकीय मतभेदातून झालेली नाही. पोलिसांनी कारवाईदरम्यान बळाचा गैरवापर केलेला नसल्याचेही न्यायालयाने निकालात नमूद केले. तसेच, पुणे पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, असा आदेशही न्यायालयाने दिला.
न्या. खानविलकर यांनी स्वत:चा आणि सरन्यायाधीश मिश्रा यांचा निकाल वाचून दाखवला, तर न्या. चंद्रचूड यांनी या निकालाशी आपण सहमत नसल्याचे सांगितले. ही अटक राजकीय मतभेदांचाच परिणाम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रपरिषदेवरही त्यांनी आक्षेप नोंदविला.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना गेल्या २८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर लगेच अनेक मानवी हक्क कार्यकर्त्यांनी आणि प्रख्यात वकिलांनी या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या आरोपींना तुरुंगात न ठेवता, त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.
यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणी त्यांच्याकडे असलेले सर्व पुरावे आणि केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने समाधान व्यक्त करीत, तपास पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
असे आहे प्रकरण : यावर्षीच्या १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे आयोजित एल्गार परिषदेच्या काळात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची चौकशी करताना धक्कादायक माहिती समोर आली होती. हा हिंसाचार देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रचलेला कट असल्याचे तपासात समोर आले होते. शहर नक्षलवादही मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी पुराव्यांच्या आधारावर २८ ऑगस्टला पाच शहरांमध्ये धाडी घालून उपरोक्त पाच जणांना अटक केली होती.
निकालातील ठळक मुद्दे
अटक राजकीय असल्याचे मान्य नाही. केस डायरीचा अभ्यास केला आहे. अटकेच्या कारवाईचा विशिष्ट तपास संस्थेमार्फतच तपास व्हावा, असा आग्रह आरोपी करू शकत नाही. : न्या. खानविलकर
योग्य तपास झाला नाही, तर घटनेने प्रदान केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याला काहीच अर्थ उरणार नाही. हे प्रकरण राजकीयच असल्याने एसआयटी गठित करणे आवश्यक आहे : न्या. चंद्रचूड
आमचा निर्णय योग्यच आहे. यावर फार काही बोलणे तपासावर परिणाम करणारे ठरेल : न्या. खानविलकर

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (98 of 1636 articles)


आधारावर भक्तीचा अधिकार नाकारता येत नाही ►सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर - केरळच्या शबरीमला येथील स्वामी अयप्पा ...

×