ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शालेय शिक्षण मातृभाषेतूनच असावे

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच असावे

►उपराष्ट्रपतींचा आग्रह
►राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरित,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –
देशात शालेय शिक्षण मातृभाषेतच मिळाले पाहिजे. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभावाखालून बाहेर येत आम्ही मानवी मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. आमच्या देशाला समृद्ध अशी प्राचीन परंपरा आणि संस्कृती लाभली आहे, या परंपरा आणि संस्कृतीत अनेक महापुरुषांचे योगदान आहे. मात्र या महापुरुषांची तसेच आपल्या प्राचीन इतिहासाची माहिती नवीन पिढीला नाही, ती शाळांतून शिकवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे विज्ञान भवनात आयोजित शिक्षक दिन समारंभात नायडू बोलत होते. मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि शिक्षण सचिव लीना रे यावेळी उपस्थित होत्या. नायडू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. ५० हजार रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
देशाच्या विकासात शिक्षकांचे (गुरू) योगदान महत्त्वपूर्ण असते. शिक्षकांमुळेच भारताची विश्‍वगुरूच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, गूगलवरून आपल्याला माहिती आणि ज्ञान मिळत असले तरी गूगल हा गुरूची जागा कधीच घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
गुरू लोकांच्या अज्ञानाच्या अंधकारात फक्त ज्ञानाचा प्रकाश आणत नाही, तर त्यांच्या जीवनात मूल्याची प्रतिष्ठापना करताना त्यांना नवी दृष्टीही देत असतो. गुरूला आमच्या संस्कृतीत देवाचे स्थान देण्यात आले आहे. संपूर्ण जग भारताकडे विश्‍वगुरू म्हणून पाहात आहे. असे नायडू म्हणाले.
शिक्षण हे फक्त नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त नाही. शिक्षणामुळे विवेकशील नागरिक घडू शकतो, अशा विवेकशील नागरिकामुळे देशाचा खर्‍या अर्थाने विकास होऊ शकतो, आमचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे नायडू यांनी सांगितले.
शिक्षण हे प्रकृती आणि संस्कृती याच्याशी जोडलेले असले पाहिजे, शिक्षणामुळे नैतिक आणि जीवन मूल्य विकसित होऊ शकतात, असे स्पष्ट करत नायडू यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, महर्षी अरविंद, रवींद्रनाथ टागोर तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या विचारांचा दाखला दिला.
शिक्षकाचे स्थान मोठे : जावडेकर
आई-वडिलांनंतर जीवनात शिक्षकाचे स्थान सर्वांत मोठे असते, कारण ते जीवनाला दिशा देत असतात. शिक्षक हा आयुष्यभर शिक्षकच असतो, असे प्रतिपादन मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहे. यापुढे कुणाच्या शिफारसींच्या आधारे नाही तर गुणवत्तेच्या आधारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यात आली. शिकवण्याच्या पद्धतीत नवीन प्रयोग करणार्‍यांना प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे आता यातून खर्‍या शिक्षकाचीच पुरस्कारासाठी निवड होईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील एकमेव शिक्षक
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील बंडगरवस्ती या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी महाराष्ट्रातून झाली आहे. अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अडसूळ यांनी आनंद व्यक्त करीत सांगितले की, या वर्षीची राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अधिक पारदर्शक होती. सहशिक्षकांच्या मदतीनेच शाळेत नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आणि त्यामुळेच आज हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (385 of 1774 articles)

Rafel
वस्तुस्थिती समजून घ्यावी : एअर मार्शल शिरीष देव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - राफेल हे वायुसेनेसाठी अतिशय उत्कृष्ट असे ...

×