ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शिस्त पाळा म्हटले तर हुकूमशाह समजतात

शिस्त पाळा म्हटले तर हुकूमशाह समजतात

►पंतप्रधान मोदींनी काढला चिमटा
►व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकाचे विमोचन,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २ सप्टेंबर –

Pm Narendra Modi At Global Cyber World Conference

अलीकडील काळात शिस्तीने वागण्याचा सल्ला म्हणजे लोकांना हुकूमशाहीसारखा वाटतो. शिस्तीवर जर कुणी मत व्यक्त केले, तर त्याच्यावर हुकूमशाह असा ठपका ठेवला जातो, असा जोरदार चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी काढला.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून एम. व्यंकय्या नायडू यांच्या एक वर्षातील कारकीर्दीच्या अनुभवावर आधारित ‘मूव्ह ऑफ… मूव्हिंग फॉरवर्ड’ या २४५ पानांच्या पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. नायडू यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच शिस्तीचे काटेकोर पालन केले आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी जी पदे भूषवली, त्यात त्यांनी दूरदर्शी नेतृत्वाचेच दर्शन देशाला घडविले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
व्यंकय्या नायडूंचे आयुष्य शिस्तीवरच आधारित आहे. ते आजही शिस्त पाळतात, पण आजच्या काळात शिस्त या शब्दाचा नवा अर्थ काढण्यात आला आहे. शिस्त म्हणजे हुकूमशाही, अशी धारणाच झाली आहे. कुणी जर एखाद्याला शिस्तीचा पाठ दिला, तर ती व्यक्ती हुकूमशाहसारखी वागत आहे, असा ठपका ठेवला जात आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधताच उपस्थितांमध्ये हशा पिकल्या.
नायडू यांनी आपल्या आयुष्यात शिस्त पाळण्यावरच भर दिला. त्यांनी आजवर अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या. ते कधीच बेशिस्तीने वागले नाही. त्यांनी आपल्या सुमारे ५० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यातील १० वर्षे विद्यार्थी संघटनेत आणि ४० वर्षे राज्य व राष्ट्रीय राजकारणात घालवली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, त्यांनी नायडू यांना आपल्या पंतप्रधान कार्यालयातच स्थान देऊ केले होते, पण नायडू यांनी ग्रामीण विकास मंत्रालय मागितले. कारण, ते खरे शेतकरी होते. कृषी आणि शेतकर्‍यांचा विकास करण्याचा ध्यास त्यांना लागला होता. पंतप्रधान गाम सडक योजना ही नायडू यांच्या प्रयत्नांमुळेच अस्तित्वात आली, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. या कार्यक्रमात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली आणि काँगे्रसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्म, जातीच्या नावावर पक्षपात अमान्य : नायडू
धर्म, जात आणि वर्णाच्या नावावर होणारा पक्षपात कोणताही सच्चा राष्ट्रवादी कदापि मान्य करणार नाही. प्रत्येक नागरिकाने इतरांच्या धर्माचा मान करायलाच हवा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज रविवारी केले.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून एक वर्षाच्या कारकीर्दीत आलेले अनुभव कथन करणार्‍या नायडू यांच्या ‘मूव्हिंग ऑफ… मूव्ह फॉरवर्ड : अ ईअर इन ऑफिस’ या पुस्तकाचे आज विमोचन करण्यात आले. यावेळी नायडू बोलत होते.
राज्य विधिमंडळांच्या वरिष्ठ सभागृहांच्या गरजानुसारच राष्ट्रीय धोरण निश्‍चित केले जावे, असे नमूद करताना, संसद आणि विधिमंडळांमध्ये आपल्या सदस्यांचा व्यवहार कसा असायला हवा, याबाबत राजकीय पक्षांमध्ये मतैक्य निर्माण होणे आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
संसदेचे नुकतेच पार पडलेले पावसाळी अधिवेशन ‘सामाजिक न्याया’साठी लक्षात राहणार आहे. सामाजिक न्याय हा प्रत्येक राजकीय पक्षाचा सिद्धांत असायला हवा आणि त्यावर ठाम राहून, संसद व विधिमंडळात महत्त्वाचे विधेयक पारित करण्यात त्यांनी सरकारला आवश्यक ते सहकार्य करायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राजकारणाला गुन्हेगारीपासून मुक्त करण्याची, संसदीय व शासकीय व्यवस्था मजबूत करण्याची नितांत गरज आहे. आपला देश विविध संस्कृतींनी समृद्ध आहे. राष्ट्रवाद हा देशाचा कणा आहे. ते टिकविण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (883 of 2024 articles)


ग्वाल्हेर, २ सप्टेंबर - फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत महाघोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात असतानाच, आज रविवारी तीन ...

×