ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » शेवटी लटकवलेच!

शेवटी लटकवलेच!

►जानेवारीत ठरणार अयोध्या सुनावणीची तारीख •
►सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरील आज सोमवारी होणारी सुनावणी आता दोन महिन्यांकरिता लांबणीवर गेली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर घटनापीठापुढे सुनावणी होईल, तसेच ती केव्हापासून सुरू करायची आणि ती नियमित असावी की नाही, आदी सर्व निर्णयही घटनापीठच घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने हा निकाल दिला. अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार्‍या अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्या सर्व याचिका आज एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्यात आल्या होत्या.
आज अयोध्येवर सुनावणी सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांतच सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या. यापूूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा बहुमताने, मशिदीत नमाज अदा करणे हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० रोजी, मशिदीच्या आधी अयोध्येतील त्या ठिकाणी रामजन्मभूमी असल्याची बाब मान्य करतानाच ती जमीन रामलला ट्रस्ट, निर्मोही अखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात विभागण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
अध्यादेश काढा, संघाची मागणी
अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दिला पाहिजे, यात काही अडचण येत असेल तर सरकारने अध्यादेश काढून राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करावा, तसेच मंदिर उभारण्यासाठी संबंधित भूमी रामजन्मभूमी न्यासाकडे सोपवावी, अशी मागणी रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी आज केली.
राममंदिरासंदर्भातील सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरुणकुमार म्हणाले की, रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले पाहिजे, ही संघाची भूमिका आहे. उपरोक्त भूमी रामललाचे जन्मस्थान असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. रामजन्मभूमीवर आधी मंदिरच होते, नंतर ते तोडून त्याठिकाणी वादग्रस्त वास्तू उभारण्यात आली, हे आतापर्यत अनेक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले पाहिजे, तसेच यासाठी ही भूमी रामजन्मभूमी न्यायाकडे सोपवली पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे.
रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यामुळेच देशात सदभावनेचे तसेच एकात्मतेचे वातावरण निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधत अरुणकुमार म्हणाले की, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर मंदिर उभारण्याबाबतचा आदेश दिला पाहिजे. यात काही अडचण येत असेल तर रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्याबाबत सरकारने अध्यादेश काढला पाहिजे आणि रामजन्मभूमीची जागा मंदिर उभारण्यासाठी रामजन्मभूमी न्यासाकडे सोपवली पाहिजे.
राममंदिरासाठी सुरू झालेले आंदोलन आतापर्यंत संत आणि धर्मसंसदेच्या नेतृत्वातच आहे आणि आम्ही त्याचे समर्थन करत आलो आहे. त्यामुळे आताही या आंदोलनाबाबत संत आणि धर्मसंसद जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य राहील, आम्ही त्याचे समर्थन करू, असे अरुणकुमार म्हणाले.
आता वाट पाहणार नाही : विहिंप
रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी अनंतकाळपर्यंत न्यायालयाची निर्णयाची प्रतीक्षा करता येणार नाही, न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारण्याला विलंब होत असेल तर सरकारने अध्यादेश काढून मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आज विश्‍व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली.
५ ऑक्टोबरला संतांच्या उच्चाधिकार समितीची बेठक झाली होती, त्यात मंदिर उभारणीसाठी अनंतकाळपर्यत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता, याकडे लक्ष वेधत विहिंपचे कार्याध्यक्ष आलोककुमार म्हणाले की, त्यामुळे सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राममंदिर उभारण्याबाबत कायदा केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
राममंदिर उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात देशातील सर्व राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे, त्यानंतर विहिंप कार्यकर्ते आपल्या भागातील जनतेसह खासदारांना निवेदन देतील, असे स्पष्ट करत आलोककुमार म्हणाले की, डिसेंबर महिन्यात देशातील सर्व मंदिरात यज्ञ, पूजा, होमहवन केले जाईल. त्यानंतर प्रयाग येथे होणार्‍या कुंभमेळाव्यात रामजन्मभूमी आंदोलनाची पुढील भूमिका निश्‍चित केली जाईल.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (86 of 1770 articles)

Ravishankar Prasad5
प्रसाद यांचे प्रतिपादन, रायपूर, २९ ऑक्टोबर - केंद्र सरकारचा देशातील न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्‍वास आहे आणि न्यायव्यवस्थेचा सरकारने नेहमीच सन्मानही केला ...

×