ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर –

Dr Mohanji Bhagwat2

Dr Mohanji Bhagwat2

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वाधिक लोकशाही संघटना आहे आणि संघाचे कामकाज सर्वसामान्य स्वयंसेवकांच्या विवेक आणि सहमतीवरच चालत असते. संघ समजून घ्यायचा असेल, तर केवळ बाहेरून नव्हे, तर संघात येऊन पाहा, नंतरच तुम्हाला संघ समजेल, असे स्पष्ट प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज सोमवारी येथे केले.
संघाच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत ‘भविष्यातील भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर सरसंघचालक उद्बोधन करीत होते. या व्याख्यानमालेत डॉ. मोहनजींचे विचार ऐकण्यासाठी सुमारे ६० देशांमधून तीन हजारावर मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाच्या स्थापनेपासून तर संघ; संघटनेत परिवर्तीत होण्यापर्यंतच्या सर्व बाबी विस्तारपूर्वक विशद केल्या. संघाची स्थापना झाल्यानंतर तीन-साडेतीन महिन्यांत शाखा सुरू करण्याचा विचार समोर आला होता. स्वयंसेवकांच्या विवेकावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. यानंतर संघात पथसंचलनाची सुरुवात झाली. पथसंचलनात गणवेश आणि बॅण्डची गरज भासू लागली. यानंतर तेदेखील समाविष्ट करण्यात आले, अशी माहिती सरसंघचालकांनी दिली.
संघात आतापर्यंत जे काही निर्माण करण्यात आले आहे, ते स्वयंसेवकांशी चर्चा करून आणि त्यांच्या सहमतीनेच झाले आहे. या काळात संघटनेचे नाव काय असावे, यावरही चर्चा झाली. मतदान घेण्यात आले आणि सर्वसहमतीने, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामूहिक सहमती प्राप्त करणे, हा आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचाही स्वभाव होता आणि संघाचाही आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
संघ एक खुली संघटना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक खुली संघटना आहे आणि यात प्रत्येक स्वयंसेवकाचे विचार काळजीपूर्वक ऐकले जातात. निर्णयांत प्रत्येक स्वयंसेवकाच्या विवेकाचा समावेश असतो. संघ ही सर्वसमावेशक संघटना आहे. ती कोणत्या एका विशिष्ट वर्गाची संघटना नाही. संघ पूर्णपणे स्वावलंबी संघटना आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी जो काही खर्च येतो, तो खर्च संघ स्वत:च करतो. हा खर्च स्वयंसेवकांच्या गुरूदक्षिणेतून पूर्ण होत असतो. आम्ही कुणाकडूनही निधी स्वीकारत नाही आणि एखाद्याने दिला तरी तो आम्ही त्याला परत करीत असतो, अशी माहितीही सरसंघचालकांनी दिली.
स्वयंसेवकांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीकरिता संघ काम करीत असतो. स्वयंसेवकांकडून आम्ही एवढीच अपेक्षा करीत असतो की, ते जिथे कुठे जातील, संपूर्ण समाजाला आपले मानून शिस्तीचे पालन करतील, असेही ते म्हणाले.
भगवा ध्वज धर्मगुरू, तिरंग्याचाही सन्मान
स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टींशी स्वयंसेवक भावनात्मकदृष्ट्या जोडला गेला आहे, त्यामुळे तिरंगा आमच्यासाठी सन्मानजनकच आहे. भगव्या ध्वजाला आम्ही आपला धर्मगुरू मानतो, असे सांगताना मोहनजी म्हणाले की, संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी संघाची स्थापना झाली आहे.
हिंदुत्वाच्या पतनाचा उल्लेख करताना, मोहनजी भागवत म्हणाले की, सर्वात मोठी समस्या येथील हिंदूंची आहे. भारताच्या पतनाची सुरुवात हिंदूंच्या पतनानेच सुरू झाली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे, जी मूल्यावर आधारित आचरणाची बाब आहे, संस्कृती आहे, ती हिंदुत्वच आहे. हिंदुत्वच आपल्या परस्परांशी जोडत असतो.
विविधतेचा सन्मान व्हायलाच हवा
भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा सन्मान व्हायलाच हवा. समाजात अशांतता पसरविण्यासाठी ही विविधता कारणीभूत ठरायला नको, असेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधी यांच्या काँगे्रसनेही मोठे योगदान दिले आहे. या चळवळीने अनेक मोठ्या नेत्यांना जन्म दिला आहे, असेही मोहनजी म्हणाले.
संघ समजण्यासाठी डॉ. हेडगेवार समजून घ्यावे लागतील
संघाला समजून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना समजून घ्यावे लागेल. संघाला जवळून पाहिल्यानंतर डॉ. हेडगेवार यांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब त्यात दिसून येते. आम्ही हेडगेवार यांना जन्मजातच देशभक्त मानतो. संघाच्या कामाची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही, असे मोहनजी म्हणाले.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (457 of 1935 articles)

India's Pm Narendra Modi Greets Myanmar's State Counselor Aung San Suu Kyi Before Their Meeting In The Presidential Palace In Naypyitaw
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - पक्षभेद आणि राजकीय वैर विसरून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, ...

×