ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » संपुआने अर्थव्यवस्था दारुगोळ्यावर बसवली होती

संपुआने अर्थव्यवस्था दारुगोळ्यावर बसवली होती

तिला उद्ध्वस्त होण्यापासून आम्ही वाचवले : पंतप्रधान
►इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे लोकार्पण,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ सप्टेंबर –

Pm Narendra Modi

Pm Narendra Modi

एनपीएची समस्या ही संपुआ सरकारची देण असून, थकित कर्जाचा एकएक पैसा आम्ही कर्जबुडव्यांकडून वसूल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी स्पष्ट केले. काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले होते, दारुगोळ्याच्या कोठारावर देशाची अर्थव्यवस्था बसवली होती, कोणत्याही क्षणी ती उद्ध्वस्त झाली असती, पण आम्ही ती तिथून बाहेर काढत केवळ सावरलीच नाही, तर तिला जगातील मजबूत अशी अर्थव्यवस्था बनवली, असे मोदी यांनी सांगितले.
तालकटोरा स्टेडियममध्ये इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे (आयपीपीबी) लोकार्पण करताना देशाच्या खस्ता अर्थव्यवस्थेसाठी मोदी यांनी संपुआवर जोरदार हल्ला चढवला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २००८ पर्यंत देशातील सर्व बँकांनी मिळून १८ लाख कोटीचे कर्ज दिले होते, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, मात्र २००८ नंतरच्या ६ वर्षांत कर्जाचा आकडा ५२ लाख कोटींवर गेला. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षांत बँकांनी जेवढे कर्ज दिले, त्याच्या दुप्पट कर्ज या सहा वर्षांत काँग्रेसनेत्यांच्या दूरध्वनीवर बँकांनी उद्योगपतींना बुडवण्यासाठी दिले. मोदी आल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळणार नाही, त्यामुळे आताच पाहिजे तितके घेऊन घ्या, असे त्यांना सांगण्यात आले.
‘तुझेही भले आणि माझेही भले’ या धर्तीवर फोन बँकिंगने हे कर्ज देण्यात येत होते. ज्या उद्योगपतींना कर्ज हवे असेल ते नामदारांना हाताशी पकडत आणि नामदार बँकेत दूरध्वनी करून उद्योगपतींना कर्ज द्यायला सांगत होते. या पद्धतीने अब्जावधी रुपयांचे कर्ज सर्व नियम धाब्यावर बसवून देण्यात येत होते. बँकांनी अशा कर्जावर आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो, पण नामदारांनी नियुक्त केलेले अधिकारीच बँकांमध्ये तैनात होते. त्यामुळे मुकाटपणे बँका असे देत होत्या. उद्योगपतींना दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढत असल्याची तक्रार बँकेच्या अधिकार्‍यांनी या नामदारांकडे करताच त्यांना पुन्हा कर्ज देण्यास सांगण्यात आले. म्हणजे पहिल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दुसर्‍यांदा कर्ज देण्यात आले.
कधी ना कधी ही बाब उघडकीस येईल, असे या गोरखधंद्यात अडकलेल्यांना माहीत होते. त्यामुळे यात किती पैसा अडकला, हे देशापासून लपविण्यात आले. दोन लाख कोटींचा खोटा आकडा सांगण्यात आला. आम्ही सत्तेत आल्यानंतर बँकांना एनपीएचे खरे आकडे मागितले, तेव्हा ९ लाख कोटींचा आकडा समोर आला. या रकमेवरील व्याज सतत वाढत आहे. या नामदारांनी २०१४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था दारुगोळ्याच्या कोठारावर बसवली होती, त्याचवेळी याची माहिती दिली असती, तर स्फोट झाला असता, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असती, त्यामुळे आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळावी लागली, असे मोदी म्हणाले.
एनपीएच्या समस्यातून बँकांना बाहेर काढण्यासाठी आमच्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या, नियमात सुधारणा केल्या, बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला, ५० कोटींपेक्षा जास्त रकमांच्या कर्जाची नव्याने चौकशी सुरू केली, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, कर्ज बुडवणार्‍यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. ज्यांनी मोठे कर्ज घेतले, त्यांच्या बँक खात्यांची माहिती सरकारने आपल्याकडे घेतली. २०१४ च्या आधी १२ मोठ्या लोकांना कर्ज देण्यात आले होते, त्यांच्या एनपीएची राशी पावणेदोन लाख कोटींवर गेली, आणखी २७ जणांकडील एनपीए एक लाख कोटी रुपयांचा आहे. या सगळ्यांकडून त्यांची कर्जाची वसुली सुरू झाली आहे. आधी कर्जवसुलीसाठी बँका मोठ्या लोकांच्या मागे धावत होत्या, आम्ही नियमात सुधारणा केल्यामुळे आता हे मोठे लोक कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांच्या मागे धावत आहेत. आम्ही बँकिग प्रणाली मजबूत बनवली, बँकांची दिशा आणि दशा बदलली. आधी नामदारांच्या आशीर्वादाने मोठ्या लोकांना कर्ज मिळत होते, नव्या बँकेमुळे आता पोस्टमनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना बँकांचे कर्ज मिळू शकणार आहे, असेही मोदी म्हणाले.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून खेड्यातील, दुर्गम भागातील लोकांपर्यंत बँक पोहोचविण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग खुला झाला आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे, गरिबांसाठी प्रगतीचे आणि विकासाचे दरवाजे उघडे होणार आहे, असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (403 of 1770 articles)


२०१३ मध्येच केले होते मान्य!, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ सप्टेंबर - नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून देशात हिंसक कारवायांचे कारस्थान रचणार्‍या काही ...

×