अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » संसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान

संसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान

पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ ऑगस्ट –

Pm Modi In Loksabha

Pm Modi In Loksabha

संसदेचे कामकाज सतत रोखून धरण्यात येत असल्याने सरकारचे नव्हे तर देशाचेच सर्वाधिक नुकसान होत आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी विशद केली.
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रभावीपणे चालायला हवे. आपण ज्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या समस्यांवर संसदेत आवाज उठविणे आणि त्यांच्या कल्याणाकरिता सरकारला पावले उचलण्यास बाध्य करणे, हे प्रत्येकच खासदाराचे कर्तव्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले. २०१४ ते २०१७ या कालावधीकरिता सर्वोत्कृष्ठ खासदार पुरस्काराचे वितरण पंतप्रधानांच्या हस्ते आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मत मांडले.
खरे तर, खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गरिबांच्या कल्याणाकरिता आवाज उठवायला हवा, पण दुर्दैवाने सभागृहांमध्ये केवळ ध्वनिप्रदूषणच सुरू असते. निव्वळ गोंधळ निर्माण केला जातो आणि या गोंधळात खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर बोलता येत नाही. यात संसदेचा वेळ तर वाया जातोच, शिवाय देशाचेही प्रचंड नुकसान होत असते, असे त्यांनी सांगितले.
या गोंधळामुळे सरकारचे फार कमी प्रमाणात नुकसान होत असते, पण देशाचे किती नुकसान होत आहे, याचा विचार कुणीच करीत नाही. देशाची ही कधीही भरून न निघणारी हानी आहे, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, संसद हे चर्चेचे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरून सरकारवर टीका करण्याचाही खासदारांना अधिकार आहे. पण, हे सर्व करीत असताना, संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.
संसदेत आपण जे शब्द वापरतो, त्याची रेकॉर्डवर नोंद केली जाते आणि तो रेकॉर्ड इतिहासाच्या पुस्तकाचा भाग बनत असतो. यामुळेच संसदेचे कामकाज सुरळीत होणे आवश्यक असते. भारताच्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न आणि आकांक्षा घेऊन येत असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तर विरोधकांनी संयुक्तपणे घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे वाया गेले. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांवरून विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक दिवसही संसदेचे कामकाज होऊ दिले नव्हते. असे असतानाही विरोधकांनी संसदेच्या झालेल्या कोंडीकरिता सरकारला जबाबदार धरले. सभागृहात गोंधळ घालण्यासाठी सरकारच आपल्या मित्रपक्षांचा वापर करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही, विरोधकांना जबाबदारीने वागण्याचा आणि सरकारला अधिकाधिक उत्तरदायी बनविण्याचा सल्ला दिला.
हे आहेत उत्कृष्ट खासदार
पंतप्रधानांच्या हस्ते आज ज्यांना उत्कृष्ट खासदार म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यात नझमा हेपतुल्ला, हुकुमदेव नारायण यादव, गुलाम नबी आझाद, दिनेश त्रिवेदी आणि भर्तृहरी महताब यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Posted by : | on : Aug 2 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (73 of 1864 articles)

Law
►केंद्राने दिले पुरावे ►जोसेफ यांची शिफारस पुन्हा फेटाळली, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ ऑगस्ट - [caption id="attachment_48239" align="alignleft" width="300"] Law[/caption] उत्तराखंड ...

×